वामनराव पै

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सद्​गुरू श्री. वामनराव पै
जन्म २१ ऑक्टोबर १९२३
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यू २९ मे २०१२ (वय ८९)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यात्म
भाषा मराठी
साहित्य प्रकार अध्यात्मिक लेखन
चळवळ अध्यात्म
संकेतस्थळ www.jeevanvidya.org

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले वामनराव पै मुंबई विद्यापीठाचे पदवीधर होते. जीवन विद्येचे शिल्पकार सद्​गुरू श्री. वामनराव पै, सेवानिवृत्त उपसचिव, फायनान्स डिपार्टमेंट, मंत्रालय, मुंबई. हे गेली ५४ वर्षे सातत्याने व निरपेक्षपणे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून व नाम संप्रदाय मंडळातर्फे प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादी द्वारा समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.

कारकीर्द[संपादन]

सदगुरू श्री. वामनराव पै हे दादर व इतर मध्यमवर्गीय विभागात प्रवचने करीत असत तेव्हा त्यांना हा संकल्प स्फ़ुरला की, कामगार विभागात कार्य करावे. कामगार विभागातील तळमळीचे व प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते श्री. सहदेवराव कदम यांनी सदगुरूंची प्रवचने आयोजित करण्यात पुढाकार घेतला व त्यांना श्री. वसंतराव मुळे आणि श्री. भास्करराव यादव यांनी सुरेख साथ दिली.

वयाच्या 25 वर्षी त्यांचे गुरू नाना महाराज शिरगावकर यांनी त्यांना अध्यात्माची प्रेरणा दिली. अध्यात्मसाधनेतील प्रगतीनंतर 1952 पासून ते अध्यात्मावर प्रवचने देऊ लागले. साध्या सोप्या शिकवणुकीमुळे त्यांचे अनुयायी वाढत गेले. या सर्वांच्या सहकार्याने चिंचपोकळी येथील कामगार वेल्फ़ेअर सेंटर येथे श्री. सदगुरूंची प्रवचने सुरू झाली. परंतु ते सेंटर नंतर बंद झाल्यामुळे काळाचौकी येथील हनुमान मंदिरात नियमितपणे प्रवचने करण्यास सुरूवात झाली.त्याचवेळी नाम संप्रदाय मंडळ (जीवन विद्या मिशन) स्थापनेचा संकल्प श्री. सदगुरूंना स्फ़ुरला व तो संकल्प विजयादशमी च्या सुमुहुर्तावर इ. स. १९५५ साली साकार झाला.त्या दिवशी श्री.सदगुरूंनी जीवनविद्येचा ज्ञानरूपी दीप प्रज्वलित केला. त्या प्रकाशात आज अज्ञान व अंधश्रध्देच्या अंधारात चाचपडणाऱ्या लाखो दुःखी जीवांचे जीवन सुख, समाधान व शांती ह्यांनी उजळून निघत आहे.

नाम संप्रदाय मंडळ (जीवन विद्या मिशन)ची नोंदणी इ. स. १९८० साली झाली. कार्याचे नियोजन करण्यासाठी विश्वस्त नेमले गेले. कार्यकारी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. इ. स. १९८० साली २५ वर्षे पूर्ण झाली व त्या निमित्त मोठा समाज प्रबोधन महोत्सव आयोजित केला गेला. तसेच इ. स. २००६ साली जीवनविद्येच्या परिसस्पर्शी क्रांतीला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून ६ ते ८ जानेवारीला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भव्य दिव्य सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला. वामनराव पै यांचे मंगळवारी २९ मे २०१२ रात्री आठच्या सुमारास मुंबईत निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.

वामनराव पै यांनी सोप्या भाषेत जीवनविद्येची शिकवण देणारी 25 हून अधिक पुस्तके लिहिली. याच विषयावर त्यांनी जगभर व्याख्यानेही दिली. त्यांच्या प्रेरणेतूनच मुंबईजवळ कर्जत येथे "जीवनविद्या ज्ञानपीठ' स्थापन करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन एप्रिल महिन्यात करण्यात झाले. जीवनविद्येचे खास वर्ग चालविण्याबरोबरच मनःशांती मिळावी, असे वातावरण तेथे खास निर्माण करण्यात आले आहे.

वामनराव पै यांचे मंगळवारी २९ मे २०१२ रात्री आठच्या सुमारास मुंबईत दीर्घ आजारानंतर निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

कार्य[संपादन]

हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे , आरोग्य दे ,
सर्वांना सुखात , आनंदात , ऐश्वर्यात ठेव ,
सर्वांच भल कर , कल्याण कर , रक्षण कर ,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ||

या श्लोकातून ' सर्वेत्र सुखिन सन्तु ' चे मंत्रसार लोकांच्या भाषेतून लोकांपर्यंत पोहचवत त्यांनी जीवनविद्या मिशनची मांडणी केली.

अधिक वाचन[संपादन]

पुस्तके[संपादन]

मराठी[संपादन]

 • तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
 • अमृत मंथन
 • अंधार अंधश्रद्धेचा
 • ज्ञानेशांचा संदेश
 • नामाचा नंदादीप
 • जीवनविद्या दर्शन
 • विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे
 • शांति सुखाचा राजमार्ग
 • मानसाचा जन्म कशासाठी
 • तुमचे भाग्य तुमच्या विचारात
 • हीच खरी मुर्तिपूजा, हाच खरा धर्म
 • जीवनविद्येचा मंगल कलश
 • सुखाचा शोध आणि बोध
 • सुखी जीवनाचे पंचशील
 • सुगंध जीवनविद्येचा
 • परिस जीवनविद्येचा
 • जीवनविद्या स्मरणी
 • सार्थ हरिपाठ
 • शरीर साक्षात परमेश्वर
 • तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात
 • आदर्श पालक आदर्श विद्यार्थी
 • धर्म समज-गैरसमज
 • जीवनविद्या समज-गैरसमज
 • क्रांतिकारक जीवनविद्या दृष्टिक्षेपात
 • पाप पुण्य
 • परमेश्वर समज-गैरसमज
 • सद्​गुरू समज-गैरसमज
 • स्त्रियांशी हितगूज जीवनविद्येचे

हिंदी[संपादन]

 • आदर्श अभिभावक - आदर्श विद्यार्थी
 • आपका भाग्य आपके विचारों में
 • आपका उत्कर्ष आपके हाथ में
 • क्रांतिकारी जीवनविद्या एक नज़र में
 • मनुष्य का जन्म किस लिए?
 • शरीर साक्षात परमेश्वर
 • सुखःशांति का राजमार्ग
 • सुखी जीवन के पंचशील
 • विद्यार्थियों के लिए जीवन का मार्गदर्शन

गुजराती[संपादन]

इंग्रजी[संपादन]

 • Gift of Wisdom
 • Your Destiny in Your Thoughts
 • The Purpose of Life
 • Towards the Goal of Beautiful Life
 • The Royal Road to Peace and Happiness
 • Search for Happiness
 • Human Body - God Incarnate
 • Ideal Parent - Ideal Student
 • Jeevanvidya's Guidance to Students
 • Master Key to Happy Life
 • Road To Prosperity
 • Shape your Destiny

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]