पैठण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
  ?पैठण
महाराष्ट्र • भारत

१९° २८′ ४८″ N, ७५° २२′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ४५८ मी
लोकसंख्या ३०,००० (२००१)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४३११०७
• +०२४३१
• MH - २०

मराठी

पैठण {{{1}}} [[:Media:|उच्चार]] हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे. औरंगाबादेपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे. पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.

कसे याल-- पैठण येथे येण्यासाठी औरंगाबादहून अनेक वाहने उपलब्ध आहेत. http://santeknath.org/kase%20yal.html[मृत दुवा]

इतिहास[संपादन]

साडीप्रकाराचे पैठणी हे नाव ज्या ठिकाणावरून पडले ते पैठण महाराष्ट्राच्या इतिहासात गेली २५०० वर्ष स्वतःचे वेगळेपण राखून आहे. हे गाव प्राचीन कालापासून 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. पूर्वी (मूळ नाव "प्रतिष्ठान") ही सातवाहन राजाची राजधानी होती. त्या काळापासून अगदी आतापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा मानला जाई. याशिवाय पैठणचे आणखी एक महत्त्व म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६ व्या शतकात झालेल्या एकनाथ महाराजांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे.

एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असे गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे.

फाल्गुन वद्य षष्ठीला नाथषष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो.

गोदावरीच्या काळावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे.

ब्रिटिश अंमलात पैठण हे शहर हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होते.[१]

उद्योगधंदे[संपादन]

तालुक्यात उद्योगधंदे मध्यमगतीचे आहेत व वाढत आहे. पैठण शहराजवळ एमआयडीसी आहे, पण तेथील अनेक उद्योग बंद आहेत. तालुक्यातील चितेगाव येथे विडिओकॉन सारखे काही उद्योग सुरू आहेत. रोजगाराचे प्रमुख साधन शेतीच आहे.

पण यंदा (DMIC) दिल्ली मुंबई औद्योगिक केंद्र पैठण प्रकल्प बिडकीन येथे सुरू होणार असल्यामुळे तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न नक्कीच सुटेल.

पैठणमध्ये आकर्षक पैठणी साडी सध्या बाजारात खूप प्रसिद्ध आहे. अनेक लांब राज्यातील पर्यटक पैठणमध्ये काही खास सुट्यांचा महिन्यात भेट देतात. पर्यटकांची खास सोय व्हावी यासाठी पैठण नगरप्रशासन व व्यापारी दर वेळेस प्रयत्न  करतात.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

 • संत एकनाथ महाराजांचे समाधिस्थान : संत एकनाथ महाराज समाधी मंदिर हे पैठणमधील मुख्य मंदिर आहे. अनेक भाविक भक्त एकनाथ महाराजांचा दर्शनास येत, एकनाथ षष्ठी, एकादशी, दीपावली या दिवशी मोठ्या संख्येने भाविक दर्शनास येतात.
 • संत एकनाथ महाराजांचा वाडा : नाथ महाराजांचा वाडा म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण समाधी मंदिराचा काही अंतरावर आहे. मुख्यतः हे एकनाथ महाराजांचे निवास स्थान आहे.
 • सातवाहन राजांच्या महालाच्या खाणखुणा, कोरीव खांब वगैरे असणाऱ्या या प्रासादाच्या आवारात एक विहीर आहे. या विहिरीला शालिवाहनाची विहीर म्हणतात.
 • जायकवाडी धरण : गोदावरी नदीवरील जायकवाडी हे धरण पैठण जवळच आहे. महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी हे प्रसिद्ध धरण आहे. या जलाशयास नाथसगर असे नाव दिले आहे. नाथसागर पर्यटकांचे खास आकर्षण आहे.
 • जांभुळ बाग
 • संत ज्ञानेश्वर उद्यान
 • नागघाट : नागघाट हे अतिशय सुंदर असे ठिकाण गोदावरी नदीच्या काठावर आहे. येथेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविले होते. तसेच येथे सिद्ध वरूण पेशवे गणपती, हनुमान मंदिर, नाग देवता मंदिर, नागेश्वर व इन्द्रेश्वर महादेव मंदिर आहेत. नागपंचमीनिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्सव साजरा होतो.
 • लद्दू सावकाराचा वाडा
 • जामा मशीद
 • तीर्थ खांब
 • मौलाना साहब दर्गा
 • जैन मंदिर पैठण : दिगंबर जैन मंदिर हे पैठणमधील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण असून अतिशय पवित्र क्षेत्र आहे. देशाचा कानाकोपऱ्यातून लांब ठिकाणांहून जैन बांधव व धार्मिक लोक येथे भेट देतात.
 • सातबंगला पैठणी साडी केंद्र
 • वीज प्रकल्प, जुने कावसान नाथसागर धरण
 • नवनाथ मंदिर, पालथी नगरी पैठण
 • छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक
 • महाराणा प्रताप चौक
 • मराठा क्रांती भवन (महाराष्ट्रातील पहिले क्रांती भवन)

प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]

१. संत भानुदास महाराज

२. संत एकनाथ, संत एकनाथांचा जन्म पैठणला झाला.

३. संत गावबा

४. कृष्णदयार्णव

५. कवी अमृतराय

६. शंकरराव चव्हाण

७. भय्यासाहेब महाराज गोसावी

८. बाळासाहेब पाटील (इतिहास संशोधक)


९. सरदारबुवा गोसावी (नाथवंशज)

१०. योगीराज महाराज गोसावी, (नाथवंशज)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "पैठण". ३१ जुलै २०१४ रोजी पाहिले.


बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.