विठ्ठल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंढरपूरचा पांडुरंग
विठ्ठल-रखुमाईच्या सजविलेल्या मूर्ती

विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्रकर्नाटक ह्या राज्यात वंदिली जाते. विठोबा हा प्रामुख्याने श्रीहरी चा द्वापार युगातिल दुसरा आणि दशावतारातिल नववा अवतार आहे. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठठलाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे.गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला,तेजस्वी नेत्रांचा,मौन धारण केलेला,कटि कर ठेवून उभा असा आहे जे पुर्णपणे विठ्ठ्लाचे वर्णन आहे. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळां पत्नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते.

विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ पंढरपूर येथे आहे. जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत 1४ लाख भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे चंद्रभागा म्हणतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.[१]

विठोबाशी निगडित कथा[संपादन]

विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो.त्याचा अवतार हा गयासुर नावाच्या अधर्म संस्थापक ,नष्ट क्रिया भ्रष्ट राक्षसाच्या समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगांत झाला होता . त्यावेळी गयासुर अरीने सत्यश्रेष्ठ हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी देव गणांना भूलवण्याचे तथा गो-ब्राम्हण हत्येचे अखंड सत्र चालवले होते . यास्तव श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या आज्ञेने श्रीहरीने बौध्य नामे अवतार घेऊन गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केले होते . नंतर त्याचा परमभक्त जो कुंडलिक मुनी त्यास भेटून स्व स्वरूप दाखविले होते आणि मातापित्याची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते . संत नामदेव,संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३ ते १७ व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. हरिनी कानडी श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्त्रोत्र रचिले आहे. विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशीप्रबोधिनी एकादशी आहेत.

दशावतार origional photo

संदर्भ[संपादन]

  1. "सोलापूर ज़िल्ह्याच्या संकेतस्थळावरील पंढरपूर वरील पान". एन. आई. सी. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १९ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). २००७-०९-३० रोजी पाहिले. 

हेही पहा[संपादन]