Jump to content

सेक्किळार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेक्किऴार् तथा चेक्किऴार हे १२व्या शतकात जगलेले एक महान शिवभक्त होत. हे १२व्या शतकातील तमिऴ महाकवी होत. ह्यांची इतर नांवे "उत्तमचोळ पल्लवन्", "तोण्डैमान्", "देय्वप्पुलवर्", "देय्वच्चेक्किऴार्" होत. हे दुसऱ्या कुलोत्तुंग चोळ राजाच्या राज्यसभेतील प्रथम मंत्री देखिल होत. चोळराजा ’सीवकचिन्तामणि’ म्हणून कामरस आधिक्य असलेले एक जैन ग्रंथास प्रशस्ति केला त्यामुळे चोळासही, जनतेसही सुमार्गावर स्थित करणेकरितां म्हणून भगवान महादेवांचे परमभक्त असलेल्या ६३ नायन्मारांचे इतिहासास वर्णिणार ग्रंथ "तिरुत्तोण्डर् पुराणा"चा निर्मितिकर्ता चेक्किऴार झालेत. पॆरिय पुराणम् हे तमिऴ साहित्यात कंब रामायणा खालोखाल श्रेष्ठ मानले जाते.

शिवभक्तीचे कारणे म्हणा, सारासारविवेकाचे दूरदर्शी कारणे म्हणा, हे "उत्तमचोळ पल्लवन्, तोण्डैमान्, देय्वप्पुलवर्, देय्वच्चेक्किऴार्" सारखे पदव्या प्राप्त झाले. एक उमापति शिवाचार्य म्हणून होते त्यांच्याकडून "चेक्किऴार पुराणम्" म्हणून ग्रंथही, आणि एक मीनाक्षीसुंदरम् पिळ्ळै म्हणून होते ह्यांच्याकडून "चेक्किऴार पिळ्ळैत्तमिऴ्" म्हणून ग्रंथही चेक्किऴारास पुढे ठेवून निर्मिले गेले आहेत.

नांवाचे कारण[संपादन]

चेक्किऴार म्हणून वेळ्ळाळर् परंपरेत प्रस्तुत येत एक प्रसिद्ध नांव म्हणून आहे. "चे" म्हण्टल्यास "बैल" म्हणून "चेक्किऴार" म्हण्टल्यास तो शब्द "बैलास धनी" असा अर्थ देणारा होतो. वेळ्ळाळरांत बैलास जुम्पून शेती करित येत असलेल्यांचे मंत्री, शिवभक्त म्हणून विशेष प्रसिद्धी प्राप्तकर्ते झाल्याने, ह्यांचे मूळ नांव "अरुण्‌मोऴित्तेवर्" हे मागे पडून पुढे चेक्किऴार ह्याच नांवाने जाणले गेले.

जन्म[संपादन]

ख्रि.न्ं. १२व्या शतकांत तोण्डैनाडूच्या कक्षेतील पुलियूर्‌कोट्टम् मधील कुऩ्ऱत्तूर म्हणून गावांत वेळ्ळाळर् परंपरेत वेळ्ळियंगिरि मुदलियार आणि अऴगाम्बिका दंपतीस प्रथमपुत्ररूपाने चेक्किऴार उजवलें. ह्यांना पालकांनी "अरुण्‌मोऴित्तेवर्" म्हणून नांव ठेविले. ह्यांस पालऱावायर् म्हणून एक धाकला बंधू देखील होता.

तारुण्यकाळ[संपादन]

चोळसाम्राज्याचे महाराज दुसरे कुलोत्तुंग अनपाय चोळास मनांत समुद्राहून मोठे काय, विश्वाहून मोठे काय, असे प्रश्न आले. अनपाय चोळाचे मंत्री होते ते चेक्किऴाराचे पिता ह्या प्रश्नांना उत्तरे काय की माहिती नाहीत म्हणून सांगितले तेंव्हा हे चेक्किऴार उत्तरे दिलेत. ते राजाकडे सांगितलेवर चेक्किऴारांस मंत्री पदवी अनपाय चोळांनी दिलेत.

मंत्री कार्य[संपादन]

चोळसाम्राज्याचे महाराज दुसरे कुलोत्तुंग चोळ युद्धांमध्ये पडणेविना, मनोरंजनात मनास रंजवित असल्याचेही त्याकारणे जैन मुनिवर तिरुत्तक्कदेवरांकडून लिहिवलेले सीवकचिन्तामणि म्हणून ग्रंथास वाचून त्यात रममाण झाल्याचेही दिसते. सीवकचिन्तामणि म्हणून ग्रंथात कामरस अधिक असले कारणाने ते ग्रंथ इहपरलोकांत मर्य्यादापालनासही पुनरुत्थानासही कामी येणार नाही असा विचार करून चेक्किऴार चिंतित होवून राजास उपदेश केले.

पुनरुत्थानास सहाय्य करू शकणार भगवान महादेवाचे भक्तगण इतिहासास सुन्दरमूर्त्ति नायनाराने गायलेले तिरुत्तॊण्डर् तॊहै मधून चोळ राजास चेक्किऴाराने उपदेशिले. त्याचसह नम्बियाण्डार् नम्बि ह्यांने गायलेले तिरुत्तॊण्डर् तिरुवन्दादिही सांगितलेत. हे ऐकून चोळराजा नायनमारांचे इतिहासास विश्लेषित करून सांगा म्हणून चेक्किऴारास प्रार्थिला. त्याकारणे सुन्दरमूर्त्ति नायनारासही त्यांच्या ग्रंथांत उल्लेखलेले ६२ शिवभक्तांचे इतिहासासही ग्रामोग्रामी जाऊन त्यातील माहिती सांगितलेत चेक्किऴार.

तिरुत्तॊण्डर् पुराणम् निर्मिती[संपादन]

पॆरियपुराणम् म्हणून बोलविले जाणारे शैवत्तमिऴ्‌ग्रंथ असलेले तिरुत्तॊण्डर् पुराणास निर्मिणारे हेच होत. सुन्दरमूर्त्ति नायनाराने रचिलेले तिरुत्तॊण्डर् तॊहै, त्याचसह नम्बियाण्डार् नम्बि ह्यांने रचिलेले तिरुत्तॊण्डर् तिरुवन्दादि ह्यांस आधार म्हणून घेऊन ६३ शिवभक्तांच्या बद्दल विवरण लिहून पॆरियपुराणम् ग्रंथ म्हणून सादर केले. ह्या ग्रंथास निर्मिण्याचे कारण मनीं धरून चिदंबरम् मंदिरास गेले असता ह्यांस स्वतः भगवान महादेवाने विश्वरूपदर्शन देऊन त्यांकडून ग्रंथ करविला अशी शैवमत श्रद्धा आहे. एकाच वर्षात ४२८६ गीतांसह तिरुत्तॊण्डर् इतिहासास पुराणस्वरूपांत लिहून दिलेत. ते दिवसापर्यंत शैवमतसाहित्यांत आकरा तिरुमुऱै होते. ते दिवसापासून बारावे तिरुमुऱै म्हणून पॆरियपुराणम् मिळविले गेले.

निर्मित ग्रंथसंपदा[संपादन]

१) पॆरियपुराणम् २) तिरुत्तॊण्डर् पुराणसारम् ३) तिरुप्पदिगक्कोवै

म्हणून तीन ग्रंथ चेक्किऴाराने रचलेले ग्रंथ होत.

संदर्भ[संपादन]

  • मराठी विश्वकोश : भाग १७

हेसुद्धा पहा[संपादन]