शिव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
शिव
Shiva and Parvati.jpg
शिव व पार्वती यांचे मध्ययुगीन लघुचित्र
मराठी शिव
कन्नड ಶಿವ
तमिळ சிவன்
निवासस्थान कैलास
वाहन नंदी
शस्त्र त्रिशूळ
पत्नी पार्वती
अपत्ये कार्तिकेय, गणपती
अन्य नावे/ नामांतरे शंकर, ईश्वर, महादेव, शंभु, रुद्र, पंचानन, उमेश, त्रिनेत्र, त्र्यंबक, नीलकंठ, शूलपाणि, गंगाधर, सदाशिव, सांब
नामोल्लेख लिंग पुराण

शिव हा हिंदू धर्मातील दुष्प्रवृत्तींचा संहारक देव आहे तसेच संपूर्ण सृष्टी शिवापासुन उत्पन्न झाली असे मानतात. शिव ब्रह्मा, विष्णू यांच्यासह त्रिमूर्तींतील एक देव मानला जातो. वेदांमध्ये त्यांचा 'रुद्र' या नावाने उल्लेख केला आहे. ‘शिव हा तत्त्वरूपाने निर्गुण रूपात आहे, तर त्या तत्त्वाची ध्यान ही सगुण रूपातील स्थिती आहे. भगवान शिव बहुतेक सर्व चित्रांमध्ये योग्याच्या रुपात चित्रित आहेत अणि त्यांची पूजा लिंगाच्या स्वरूपात केली जाते. उत्पत्ती-लय क्षमता, शांत-क्रोधी, चंद्र (शीतलता)-तिसरा डोळा (भस्म करणारे तेज), सात्त्विक-तामसिक इत्यादी एकमेकांच्या विरुद्ध असलेली वैशिष्ट्ये शिवात आहेत.

शिवाची शारीरिक आणि भौतिक वैशिष्ट्ये[संपादन]

राखाडी रंग[संपादन]

शिवाचा रंग कर्पूरासारखा (कापरासारखा) पांढरा आहे; म्हणून त्याला `कर्पूरगौर' असेही म्हणतात. मूळ पांढर्‍या रंगातील स्पंदने साधकाला सहन होणार नाहीत; म्हणून राखाडी रंगाचे आवरण शिवाच्या शरिरावर असते. हे रखाडी रंगाचे आवरण म्हणजे चिताभस्म असते.शिवाला रोज नविन चिताभस्न लागते.Saahil mhatre (चर्चा) १२:४९, २५ जुलै २०१४ (IST)

गंगा[संपादन]

जी (स्नानकर्त्या जिवाला) भगवत्पदाप्रत पोहोचवते ती गंगा’. गंगा स्वर्गात होती. भगीरथाच्या कठोर तपश्‍चर्येमुळे ती पृथ्वीवर आली. त्या वेळी गंगेच्या प्रवाहाचा भयानक वेग अन्य कोणीही थोपवू शकत नव्हता म्हणून शंकराने गंगेला आपल्या जटेत धारण केले,म्हणून शिवाला गंगाधर असे म्हणतात.Saahil mhatre (चर्चा) १३:०८, २५ जुलै २०१४ (IST)

चंद्र[संपादन]

शिवाने भाली, म्हणजे कपाळी चंद्र धारण केला आहे. चंद्रमा ही क्षमाशीलता, ममता आणि वात्सल्य या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे.

नाग[संपादन]

शिवाने हलाहल हे समुद्रमंथनामधून नीघालेले विश प्राशन केले,या विशाचा दाह कमी व्हावा यासाटी वासुकी नाग शिवाने धारण केला. नागाला शिवाचे आयुधही समजले जाते,यामुळे शिवाला नागेंद्र असे संबोधले जाते.Saahil mhatre (चर्चा) १३:०८, २५ जुलै २०१४ (IST)

तिसरा डोळा[संपादन]

शिवाचा भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्मरूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय. हा डोळा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो.

व्याघ्रांबर[संपादन]

वाघ हा रज-तमांचे प्रतीक आहे. अशा वाघाला (रज-तमांना) मारून शिवाने त्याचे आसन केले आहे.

गजचर्म[संपादन]

शिवाने गजचर्म सूद्धा परिधान केले आहे,म्हणुन त्याला पशुपती असे म्हणतात.Saahil mhatre (चर्चा) १३:०८, २५ जुलै २०१४ (IST)

शिवाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये[संपादन]

उत्तम गुरुसेवक[संपादन]

शंकराची महाविष्णूवर फार श्रद्धा आहे. त्याने महाविष्णूच्या पायाखालची गंगा आपल्या मस्तकी धारण केली आहे.

महातपस्वी आणि महायोगी[संपादन]

सतत नामजप करणारा शिव हा एकच देव आहे. हा नेहमी बंध-मुद्रा करून आसनस्थ असतो.

वैरागी[संपादन]

ज्याचे चित्त अविकारी आहे असा शिव खरा जितेंद्रिय होय.

दुसर्‍याच्या सुखासाठी कोणताही त्रास भोगण्यास सिध्द (तयार) असलेला[संपादन]

समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले हालाहल विष सर्व जगाला जाळीत होते. त्या वेळी शिवाने हालाहल प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचविले.

महाकालीचा आवेग शांत करणारा[संपादन]

राक्षसांचा संहार करतांना महाकाली सुसाट वादळासारखी भयंकर झाली. तिला आवरणे असंभव झाले ! तेव्हा शंकराने प्रेतरूप घेतले आणि तिच्या कालनृत्याच्या वाटेत ते शिवाचे शव पडले. राक्षसांची प्रेते तुडवीत ती कालरात्री शंकराच्या शवावर आली. त्या शवाचा स्पर्श होताच कालरात्रीच्या नृत्याचे भयंकर वादळ शांत झाले, आवेग शांत झाला.

भुतांचा स्वामी[संपादन]

शिव हा भुतांचा स्वामी असल्याने शिवोपासकांस भूतबाधा बहुधा होत नाही.

देव आणि दानव दोघेही उपासक असलेला[संपादन]

स्वतः श्रीविष्णु हे शिवाचे उपासक आहेत. केवळ देवच नाही, तर बाणासुर, रावण इत्यादी दानवही शिवाचे उपासक आहेत.

शिवाचा परिवार[संपादन]

शिवाच्या परिवारात पत्‍नी पार्वती, पुत्र कार्तिकेय आणि श्री गणपति, तसेच शिवगण, शिवाचे वाहन नंदी आदींचा समावेश आहे.

संदर्भ[संपादन]

हे ही पाहा[संपादन]

सार्वजनिक गणेशोत्सव[संपादन]

प्रसिद्ध गणपती मंदिरे[संपादन]