गगनगिरी महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.
गगनगिरी
GaganagiriMaharaj 014.jpg
जन्म १० जुन १९१८
निर्वाण ४ फेब्रुवारी २००८
भाषा मराठी
संबंधित तीर्थक्षेत्रे खोपोली,गगनगड,दाजीपूर,नागार्जुनसागर,मनोरी,राजापूर,सोलगाव,आंबोळगड

जीवन[संपादन]

गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिला पुलकेशीच्या घराण्यातील होते, असे सांगितले जाते. श्रीपाद बाळासाहेब पाटणकर (साळुंखे) हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मणदुरे येथे १९०६ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव व आईचे नाव विठाबाई. महाराजांचे वय तीन वर्षे असतानाच त्यांचे आईचे व महाराज पाच वर्षाचे असतानाच वडिलांचे निधन झाले.

लहानपणापासूनच त्यांना ईश्वरप्राप्तीची ओढ होती. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी घर सोडले. सुरुवातीपासूनच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले, नाथसंप्रदायींबरोबर ते बत्तीसशिराळा येथे आले. तेथे वयाच्या सातव्या वर्षी नाथसंप्रदायाची दीक्षा मिळाली. पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांनी चित्रानंदस्वामी यांची भेट झाली.

एकदा बद्रीनाथजवळील व्यासगुंफेत महाराज अतिशय दमूनभागून पहुडले होते. तेव्हा पर्वतावरून एक कफनीधारी साधू आले. साधूंनी त्यांच्या कमंडलूतील पाणी श्रीपाद यांच्या तोंडावर शिंपडले व कमंडलूतील हिरवेगार कोथिंबिरीसारखे गवत खायला दिले. त्या साधूंनी श्रीपाद यांना सांगितले आजपासून तुला सर्वसिद्धावस्था प्राप्त होईल. सर्व मानवांचे कल्याण तुझ्या हातून होईल. तू आता दक्षिणेकडे चालत रहावे. त्याप्रमाणे श्रीपाद हे त्या खोऱ्यातून चालत हालअपेष्टा भोगत भोगत ऋषीकेशला येऊन पोहोचले. नंतर त्यांनी सर्व भारतभर एकट्यानेच फिरण्याचे ठरवले त्याप्रमाणे त्यांनी प्रवास सुरू केला.

थोड्याच दिवसांत श्रीपाद यांना लोक स्वामी किंवा महाराज या नावांनी ओळखू लागले. महाराज हरिद्वारपासून दिल्लीपर्यंत पायी प्रवास करत आले. तसेच ते पुढे भोपाळपर्यंत पायी गेले. तेथे एका तलावाच्या काठी स्नान करून स्थिर बसले होते. त्या वेळी त्यांच्याजवळच कोल्हापूरचे राजे व काही सरदार सहज येऊन थांबले होते. त्यांची मायबोली मराठी असल्याने हे बालयोगी (गगनगिरी महाराज) त्यांच्याशी मराठीत बोलू लागले. कोल्हापूरचे महाराज बालयोगी (गगनगिरी महाराज) यांना कोल्हापूरला घेऊन आले. पुढे त्यांनी दाजीपूर येथे अनेक वर्षे तप केले.

सुरुवातीला महाराज एका धनगरवाड्याच्या कडेला थोड्या अंतरावर झोपडी बांधून राहिले. त्या अरण्यात कंदमुळे, झाडपाला, वनस्पती भरपूर असल्याने त्यांचे मन तेथे रमले. पुढे-पुढे ते झाडांच्या ढोलीत राहून तप करू लागले. भूतविद्या, जारण-मारण-उच्चाटन विद्या, बहुरंगी विद्या अशा नाना प्रकारच्या विद्यांचे शोध व तप करू लागले. या तपात त्यांनी झोपण्यासाठी जी गवताची गादी केली होती, ती गादी झाडासारखी वाढू लागली व त्याला अंकुर येऊ लागले; त्यामुळे त्यांना विद्या पक्क्या झाल्याचा अनुभव येऊ लागला. त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा कायाकल्प करून ते निरनिराळया विद्यांचे शोध लावू लागले व ते सिद्ध होऊ लागले. महाराज त्या जंगलातच एका झाडाच्या ढोलीत निवारा बांधून रहात. पाऊस पडण्याअगोदर अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कुंभ्याच्या सालीचा वाक, आपट्याच्या झाडाच्या सालीचा वाक व पळसाच्या पानाचे इरले करून पावसापासून बचावासाठी डोक्यावर चालते घर तयार करीत असत. वरील झाडांच्या वाकापासून लंगोट्या, टॉवेल, अंगावर घेण्याच्या शाली, अंथरूण, पांघरूण अशा प्रकारची नवीन नवीन वल्कले धारण करून पावसाळयाच्या दिवसांत या इरल्याखाली रहायचे आणि तप करायचे. असे जीवन जगणे त्यांना आवडत होते. पुढे भ्रमण करीत करीत महाराज गगनगडावर पोहोचले. तिथे त्यांनी जलतपश्चर्या केली.

नाथ संप्रदायातील महंताबरोबर ते संपूण भारतभर फिरले, नेपाळ, भूतान,मानससरोवर, गौरीशंकर, गोरखदरबार, गोरखपूर, पशुपतीनाथ येथून ते अल्मोडा येथे गेले. गंगा नदीच्या खोरे, हिमाचल प्रदेश येथूनही त्यानी आध्यात्मिक ज्ञान संपादण्यासाठी प्रवास केला.

गगनगिरी महाराजांना विश्वगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

तपसाधना[संपादन]

महायोगी गगनगिरी महाराजांची इतर वैशिष्ट्ये सध्याच्या कलीयुगामध्येही योगशास्त्रातील अनेकविध अवघड सिद्धी व चमत्कार प्रत्यक्ष आत्मसात केलेले असे ते महायोगी होते. योगशास्त्रातील विमलज्ञान, शिवयोग, उन्मनी विद्या, गोरक्षनाथी विद्या अशा अनेक विद्या त्यांना आत्मसात होत्या. निसर्गाच्या सान्निध्यात अनेक प्रकारची खडतर तपे करून त्यांनी हे अत्यंत अवघड व वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आत्मसात केले होते. प.पू. महाराजांनी योगसामर्थ्यांचा संदेश सर्वत्र पोहोचवला. प.पू. महाराजांनी हिमालय व गंगेचे खोरे येथेही तपश्चर्या केली. १९३२ ते १९४० सालापर्यंत महाराजांनी दाजीपूर येथील पाटाचा डंक या भागात राहून अरण्यनिवासी तप केले. १९६५ पासून त्यांची कीर्ती जगभर पसरली. निर्मनुष्य व अनेक हिंस्त्र श्वापदे असणाऱ्या गगनगडावरील ५२ तळी व सांगलीतील वाटार येथील ५ ते ६ डोहांत त्यांनी दीर्घकाळ जलतपश्चर्या केली. त्यासाठी ते पाण्याच्या तळाशी जाऊन योगिक क्रियांच्या साहाय्याने तेथे ध्यान लावून कित्येक तास बसत असत.

अनुयायी[संपादन]

गगनगिरी महाराजांचे अनुयायी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक अशा अनेक राज्यांमध्ये पसरले आहेत. संपूर्ण देशभरात, तसेच जगातही ठिकठिकाणी त्यांचे शिष्य व अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत.


समाधी[संपादन]

सिद्धयोगी गगनगिरी महाराज यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील गगनगिरी महाराज योगाश्रम पाताळगंगा तीर्थक्षेत्र' आश्रमातील पर्णकुटीत ४ फेब्रुवारी २००८ रोजी पहाटे ३.३० वाजता देह ठेवला. महानिवार्णाच्या समयी महाराजांचे वय 90 वर्षांचे होते.

मठ[संपादन]

पुण्यामध्ये धनकवडिला एक आणि तळवडे रोडवर एक असे महाराजांच्या नावाचे दोन ‘गगनगिरी महाराज मठ’ आहेत. संगमनेर तालुक्यातील निंमगावजाळी दुधेश्वरगड येथे गगनगिरी महाराजांचा आश्व आश्रम आहे

बाह्य दुवे[संपादन]


Unbalanced scales.svg
या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.