अध्यात्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काळ आणि जडविश्व यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्त्वाचा अभ्यास करणारे शास्त्र. या विश्वात. हे दृष्य विश्व पंचमहाभूतांचे आहे. १)पृथ्वी, २) आप (पाणी),३)तेज (उष्णता) ४)वायू, ५) आकाश, या पंचभौतिक प्रकृतीत तीन गुण १) सत्व,२) रज, ३) तम यांची मिळून अष्टधाप्रकृती निर्माण झाली व ती ब्रम्हस्वरुपात विलसली. प्रत्येक प्राणी मात्रांचे शरीर हे ह्या अष्टधाप्रकृती ने बनलेले आहे. त्याच अष्टधाप्रकृतीचे विस्तार केला तर अनेक तत्वे निर्माण झालेली दिसतील. हा झाला जडवस्तु जी डोळ्यानां दिसते तीचा अभ्यास व जे अनंत ब्रम्हांडी, जो परमात्मा जो अनेक वर्षे तपश्चर्या करूनही समजत नाही. जो अदृष्य आहे. पण त्याच्याच सत्तेने हे जग चालते. तो ब्रम्हाडनायक परमात्मा, ईश्वर ,भगवान जो चराचरात भरला आहे, जो प्रत्येक प्राणीमात्रांच्या ह्रदयात विराजमान आहे. त्याचा अभ्यास म्हणजेच अध्यात्म होय ज्ञानेश्वरी पिंडी ते ब्रह्मांडी.

बाह्य दुवे[संपादन]