दिनकर स्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


दिनकर स्वामी' अहमदनगर जवळील तिसगाव मठाचे मठपती होत.

दिनकर स्वामी अहमदनगर जवळील तिसगाव मठाचे मठपती होत.त्यांनी 'स्वानुभव दिनकर ' नावाचा ग्रंथ लिहिला .

नगर जिल्ह्यात भिंगर येथे दिवाकर पथक नावाचा तरुण साधक होता.त्याचे लग्न झाले होते.त्याला मुले-बाळे होती.तथापि त्याचे संसारात फार लक्ष नव्हते.तासंतास तो ध्यान-धारणा करीत असे.अनेकदा घरातील वस्तू गोर-गरीबांना देऊन टाकी.त्यामुळे त्याचे आईशी आणि पत्नीशी कधी पटले नाही.एक दिवस संसारातील कटकटीना कंटाळून त्याने घर सोडले आणि तिसगाव जवळच्या वृद्धेश्वराच्या डोंगरात सिद्धेश्वर मंदिरात त्याने अनुष्ठान सुरू केले.एक दिवस त्याला पाहते स्वप्न पडले.स्वप्नात भगवे वस्त्र परिधान केलेला एक तेजस्वी साधू आला आणि त्याने दिवाकरला स्वप्नात अनुग्रह दिला.या घटनेनंतर दिवाकर इतका व्याकूळ झाला की स्वप्नात दिसलेला साधू प्रत्यक्ष भेटल्या खेरीज अन्न ग्रहण करावयाचे नाही, असे त्याने ठरविलेतीन दिवस तो उपाशी होता.सारंगपूरहून समर्थ तीसगावजवळ सिद्धेश्वर मंदिरात आले. समर्थांना पाहताच दिवाकरने ओळखले, की आपल्याला स्वप्नात अनुग्रह देणारा महात्मा हाच. समर्थांनीदेखील दिवाकरला ओळखले. प्रथम भेटीतच त्यांनी त्याल अनुग्रह दिला.दिवाकर सुर्योपासक असल्याने समर्थांनी त्याचे दिनकर ठेवलं. तीसगावला मठ स्थापन करून त्याला तेथील मठपती केले.एवढेच नव्हे तर समर्थांनी त्याला बायका-मुलांचा सांभाळ करायला सांगितलं.त्याने भिंगारपुरहून आपले कुटुंब तीसगावला आणले. 'आधी प्रपंच करावा नेटका | मग घ्यावे परमार्थविवेका |' ही समर्थांची शिकवण दिनकर स्वामींनी आचरणात आणली. याच दिनकर स्वामींनी समर्थांच्या निर्वाणानंतर १२ वर्षांनी म्हणजेच १६९४ साली 'स्वानुभव दिनकर' नावाचा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला

तसेच त्यांनी रामदासस्वामी वर श्रीराम करुणा नावाचा ग्रंथ लिहिला .[१]