रंगनाथस्वामी निगडीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रंगनाथ स्वामी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
श्री रंगनाथ स्वामी


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

रंगनाथस्वामी निगडीकर(जन्म-१६१२; मृत्यू-१६८४) हे समर्थ पंचायनातले एक सत्पुरुष होते. ते दिसायला अतिशय सुंदर आणि मोहक होते. मनाने विरक्त असूनही त्यांचा थाट एखाद्या मोठ्या सरदारासारखा असे. ते स्वतः घोड्यावर बसून प्रवास करीत. त्यांच्याबरोबर मोठा लवाजमा असे. वैभवशाली राहण्यामुळे त्यांच्या विरक्तीबद्दल लोकांना नेहमीच शंका वाटत असे. अशा शंकेखोरांनी दोन वेळा शिवाजी महाराजांचे मन रंगनाथस्वामींबद्दल कलुषित करण्याचा प्रयत्‍न केला होता. पण रंगनाथस्वामींनी शिवाजी महाराजांच्या मनात निर्माण झालेला किंतू काही चमत्कार दाखवून क्षणार्धात दूर केला, अशी आख्यायिका आहे. त्याचे जन्म स्थान हे सांगोला तालुक्यातील नाझरे गाव हे आहे.

पूर्वायुष्य[संपादन]

रंगनाथस्वामींचे पूर्ण नाव रंगनाथ बोपजी देशपांडे. त्यांच्या आईचे नाव बयाबाई. बोपजी हे नाझरा गावचे देशपांडे होते. त्यांच्या तीन मुलांपैकी रंगनाथ हे मधले चिरंजीव होत. कल्याणी गावचे पूर्णानंद हे सहजानंदांचे शिष्य होते. रंगनाथांच्या वडिलांनी या पूर्णानंदांकडून संन्यासदीक्षा घेतली. तेव्हा त्यांचे नाव निजानंद ठेवण्यात आले. रंगनाथांना निजानंदांकडून अनुग्रह झाला. पुढे निजानंदांनी शके १५६४मध्ये मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी कऱ्हाड येथे जिवंत जलसमाधी घेतली.

संन्यासी झालेले रंगनाथस्वामी शेवटपर्यंत ब्रह्मचारी राहिले. घोड्यावरून तीर्थयात्रा करताना सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील निगडी गावाजवळ एका ओढ्याकाठी त्यांच्या घोड्याचा खूर दगडात रुतला, म्हणून ते घोड्यावरून खाली उतरले आणि दैवी संकेत समजून निगडीत राहू लागले.

लेखन[संपादन]

रंगनाथस्वामींची लेखनशैली आणि निरूपणशैली ही रामदासांसारखी सुस्पष्ट आणि रोखठोक आहे. त्यांनी हजारो पदे, पंचके आणि अष्टके लिहिली. समर्थ रामदासांचे वर्णन त्यांनी ‘राजाधिराज अवतरला हा या जगदोद्धारा’ या शब्दांत केले आहे. कल्याणस्वामी यांना फार अद्वैतचर्चा केलेली आवडत नसे. त्यांनी रंगनाथस्वामींना ‘अद्वैतचर्चा कंटाळवाणी सांडूनि वर्णा कोदंडपाणी’ (अद्वैतावर चर्चा करण्यापेक्षा श्रीरामाची उपासना करा) असा सल्ला दिला. त्यावर रंगनाथस्वामींनी ‘अद्वैतचर्चा जंव हे कळेना, तो पूर्ण रामीं मन हे वळेना’ असे जोरदार उत्तर दिले.

धाडसी रंगनाथस्वामी[संपादन]

माघातील रामदासांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी रंगनाथस्वामींनी वडगावी येण्याचे जयरामस्वामींना कबूल केले होते, पण ही गोष्ट ते विसरून गेले. त्यावेळी ते भागानगरला होते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी त्यांना ते आठवले. त्वरित त्यांनी घोडा दौडवला. वाटेत झालेल्या रामोश्यांच्या हल्ल्याचा त्यांनी न घाबरता प्रतिकार केला आणि सायंकाळी ते वडगावला पोचले. त्यांच्या या धाडसाचे साऱ्यांनीच आश्चर्यमिश्रित कौतुक केले.

शके १६०६च्या मार्गशीर्ष वद्य दशमीला रविवारी रंगनाथस्वामींनी देहत्याग केला (इसवी सन १६८४). त्यांची समाधी निगडी येथे आहे.

हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप आदी सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय ग्रंथांचे कर्ते श्रीधर हे या रंगनाथस्वामींचे पुतणे होत.