आळवार
Jump to navigation
Jump to search
![]() |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
आळ्वार (तमिळ: ஆழ்வார்கள் अर्थ: देवात विसर्जीत झालेले) सहाव्या आणि नवव्या शतकातील तमिळ संत ,जे प्रामुख्याने विष्णुचे भक्त (काव्यभक्तीमार्ग) किंवा हिंदु वैष्णव होते.वैष्णव संप्रदायानुसार त्यांची संख्या १० होती परंतु काहींच्या मते संतकवी आंडाळ आणि मधुरकवी धरुन त्यांची संख्या १२ आहे. आळवार हे संतकवी असल्याने त्यांनी विष्णु-कृष्ण ह्यांच्यावर अनेक काव्य केली आहेत जी दिव्य प्रबंधम (நாலாயிர திவ்ய பிரபந்தம் : नालायिर दिव्य प्रबंदम) ह्या नावाने प्रसिद्ध आहेत,जी संस्कृत भाषेतील वेदांसमान आहेत.इथे नालायिर म्हणजे चारहजार असा अर्थ होतो,प्रबंधनात एकुण ४००० ओव्या आहेत.
बारा आळ्वार[संपादन]
बारा आळ्वारांची (पन्निर आळ्वारगळ् तमिळः பன்னிரு ஆழ்வார்கள்) नावे खालीलप्रमाणे.
- पोय्गैयाळ्वार् (பொய்கையாழ்வார்)
- पुत्तदाळ्वार् (பூதத்தாழ்வார்)
- पेयरळ्वार् (பேயாழ்வார்)
- तिरुमळिसैयाळ्वार् (திருமழிசையாழ்வார்)
- नम्माळ्वार् (நம்மாழ்வார்)
- मदुरकवि आळ्वार् (மதுரகவி ஆழ்வார்)
- कुलसेकर आळ्वार् (குலசேகர ஆழ்வார்)
- पेरियाळ्वार् (பெரியாழ்வார்)
- आंडाळ (ஆண்டாள்)
- तोण्डरडिप्पोडियाळ्वार् (தொண்டரடிப்பொடியாழ்வார்)
- तिरुप्पाणाळ्वार् (திருப்பாணாழ்வார்)
- तिरुमंगैयाळ्वार् (திருமங்கையாழ்வார்)