मोरया गोसावी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोरया गोसावी यांचे कल्पनाचित्र

मोरया गोसावी हे १४व्या शतकातील गाणपत्य समाजातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते. ते संत एकनाथ यांचे समकालीन होते. त्यांनी पुण्यातील चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली. असे म्हटले जाते की,गणपतीने मोरयास असा सक्षात्कार करुन दिला की "मी (गणपती) तुझ्या पूजे करीता चिंचवड येथे प्रकट होणार आहे.मोरया गोसावी यांना कऱ्हा नदीच्या पात्रात तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती प्राप्त झाली.त्यानंतर मोरया गोसावी मोरगावहून चिंचवड येथे जाऊन स्थायिक झाले.तेथे त्यांनी गणपती मंदीर उभारले व त्यात कर्हेत प्राप्त झालेल्या गणेशमुर्तीची स्थापना केली काही कळाने मोरया गोसावींनी संजीवन समाधी घेतली. मोरयाला चिंतामणी नावाचा मुलगा होता,तो गणेशावतार होता. चिंचवड येथील मोरया गोसावीची समाधी आणि त्यांनी ऊभारलेले गणेश मंदीर गणेशभक्तांचे प्रमुख आकर्षण आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.