ज्ञानेश्वर कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


ॲडव्होकेट ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी (जन्म : १३ जून १९३०; - १६ मार्च २०१३) हे पुण्यातले एक नामवंत वकील, इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि विद्वान गृहस्थ होते. त्यांचे अनेक ग्रंथ मृद्‌‍गंध प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत. त्यांतले काही ग्रंथ :

  • अजिंक्य हे ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी लिहिलेले आत्मकथनात्मक पुस्तक, त्यांच्या ८१व्या वाढदिवसाच्या दिवशी प्रकाशित झाले. त्याच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी अभय बंग यांचे ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’ हे पुस्तक वाचले, आणि आपणही याच विषयावर आपले विचार मांडावेत असे वाटू लागल्यामुळे हे पुस्तक लिहिले. ते लिहितात, "आज मी ८२व्या वर्षात पदार्पण करीत आहे, आणि आजही मी ठणठणीत आहे. माझ्या नखांतही रोग नाही. या माझ्या सुदृढ तब्येतीचे रहस्य काय असावे या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्‍न मी या पुस्तकात करीत आहे."
  • A New Perspective To The Language Of Indus Script (इंग्रजी)
  • आकाशगंगा (अनुवादित, मूळ लेखक कालिदास)
  • उन आणि पाऊस (ललित)
  • ऋतुराज (मूळ लेखक कालिदास; अनुवादित)
  • ऋग्वेदाचे प्राचीनत्व : इतिहासविषयक पुस्तक
  • कविराज
  • कश्चित्कांता
  • काल कालिदासाचा, मार्ग मेघाचा
  • कोठे आहे कालिदासाचा रामगिरी ?
  • सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य? : ही एक ऐतिहासिक विषयावरची कादंबरी आहे.
  • तिलांजली (ललित)
  • श्रीनृसिंह सरस्वती : काल आणि समाज (दत्त संप्रदायावरील पुस्तक)
  • ब्राम्हणांची कैफियत : या पुस्तकाबद्दल पुरेशी माहिती येथे आहे
  • मालविका
  • मालविका (खंड -१४)
  • मी लंकापती रावण बोलतोय
  • मृगनयनी (कवितासंग्रह)
  • रोमन आणि देवनागरी लिप्यांची जननी : सिंधू लिपी
  • वामनाची तीन पावले (दोन-खंडी आत्मचरित्र)
  • विचका (कादंबरी)
  • श्रीपाद श्रीवल्लभ : दत्त संप्रदायावरील पुस्तक.
  • सिंधू संस्कृती : सिंधू संस्कृतीच्या इतिहासावरचे पुस्तक
  • हडप्पा संस्कृती? नव्हे, महाभारतकालीन हिंदू राज्येच!  : भारतात ब्रिटिश काळात इतिहासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू झाल्यानंतर भारताचा इतिहास पाश्चात्त्य संशोधक तसेच भारतीय संशोधक या सर्वांच्याच दृष्टिकोनातून अभ्यासला जाऊ लागला. आजदेखील प्रस्थापित इतिहास संशोधनाला छेद देणारे विविध विचार नव्याने मांडण्यात येत आहेत. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांचा 'हडप्पा संस्कृती? नव्हे महाभारतकालीन हिंदू राज्येच!' हा ग्रंथ म्हणजे अशाच ग्रंथांपैकी एक आहे. या ग्रंथातून ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी हडप्पा संस्कृती आणि महाभारत काळाच्या समकालीनतेचे तौलनिक दाखले देऊन हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळलेली नगरे ही महाभारत काळातील विविध नगरे होती असे सिद्ध करण्याचा प्रयत्‍न केला आहे.
  • हे मेघा

निधन[संपादन]

८१व्या वाढदिवसाच्या दिवशी आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगणाऱ्या ॲडव्होकेट ज्ञानेश्वर कुलकर्णी यांना त्यांचा ८३वा वाढदिवस पाहता आला नाही; त्यांचे त्यापूर्वीच वृद्धापकाळामुळे निधन झाले. मात्र, कुलकर्णी यांची वकिली शेवटपर्यंत चालू होती.