रामदेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्वामी रामदेव हे योगाचा प्रसार करणारे योगगुरू आहेत. हा प्रसार करताना केलेल्या वक्तव्यांवरून भारताचे सुराज्यात रूपांतर व्हावे असा त्यांचा प्रयत्‍न असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या मते प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि उत्तम आरोग्य या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.

स्वामी रामदेव बाबा टीव्ही आणि सीडीजच्या माध्य्मांतून जगभरातील लोकांना योगविद्येची शिकवण देतात.

रामदेव बाबा आयुर्वेदिक औषधांचा एक कारखाना चालवितात. तेथे बनलेल्या औषधांची विक्री केवळ त्यासाठीच गावोगाव सुरू झालेल्या खास दुकानांमार्फत होत असते..

कार्य[संपादन]

आपले कार्य पार पाडण्यासाठी यांनी चार विश्‍वस्त संस्था स्थापन केल्या आहेत.

 • दिव्य योग मंदिर ट्रस्ट
 • पतंजली योग विद्यापीठाची स्थापना (पतंजली योग पीठ ट्रस्ट)
 • भारत स्वाभिमान या संघटनेची स्थापना (भारत स्वाभिमान ट्रस्ट)
 • आचार्यकुल शिक्षा संस्थान

सत्याग्रह[संपादन]

भारतातील भ्रष्टाचार आणि काळ्या संपत्तीच्या विरोधात योगगुरू स्वामी रामदेव यांनी दिल्ली येथे ४ जून २०११ रोजी सत्याग्रह केला. त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे होत्या.

 • 'टॅक्स हेवन' देशांमध्ये ठेवलेल्या भारतीयांचा काळा पैसा परत आणून त्याचा समावेश राष्ट्रीय संपत्तीमध्ये करावा.
 • काळा पैसा परकीय बॅंकांमध्ये साठवणार्‍यांना राजद्रोही म्हणून जाहीर करावे आणि तो राष्ट्रीय गुन्हा मानण्यात यावा.
 • भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्यांना फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी.
 • देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल विधेयक.
 • भ्रष्टाचाराचे खटले चालवण्यासाठी सर्व राज्यांमध्ये जलद न्यायालये सुरू करण्यात यावीत. तरच कोट्यवधी खटले मार्गी लागू शकतील
 • मोठ्या रकमेच्या चलनी नोटा अर्थव्यवहारातून काढून टाकण्यात याव्यात. कारण १०० लाख कोटी रुपयांचा काळा पैसा देशात आहे तो केवळ एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांमुळे. देशातील ८० कोटी लोकांचे रोजचे उत्पन्न जेमतेम २० रुपये असताना अशा नोटांची गरजच काय?
 • इंजिनिअरिंग, वैद्यकशास्त्र आणि शेतकी या विषयांचा अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये असावा.
 • भूसंपादनाचा कायदा रद्द करावा. गरीब शेतकर्‍यांची लुट करणारा ब्रिटीशांनी आणलेला हा कायदा बदलून शेतकऱ्यांच्या हिताचा व्हावा.
 • देशाच्या पंतप्रधानांची निवड थेट लोकांमधून करण्यात यावी. त्यामुळे देशहिताचे प्रश्न मार्गी लागून पक्षीय राजकारणाला चाप बसेल.
 • जनतेला सरकारी सेवा मिळणे हा त्यांच हक्क आहे. एखाद्या व्यक्तीला सरकारी अधिकार्‍याने विशिष्ट काळात आवश्यक ती सेवा दिली नाही, तर संबंधित अधिकारी दंडास पात्र ठरावा.

रामदेवाबाबांचे आधुनिक हिंदुत्व[संपादन]

‘भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे, पण काही लोकांनी तिला बदनाम केले. ज्यांना धर्माचे काही माहीत नाही असे लोक धर्माचा प्रचार करतात. मी धर्म मानतो, पण पाखंड मानत नाही. अनेक लोक राशीभविष्य आणि हस्तरेखांना फार महत्त्व देतात. मी आजवर कधीही मुहूर्त पाहिला नाही. जे केले तोच शुभमुहूर्त होता,’ असे ते म्हणतात.

‘सकाळच्या राशीभविष्याला सर्वाधिक टीआरपी असतो. राम आणि रावण, कृष्ण आणि कंस यांच्या राशी एक होत्या. तसेच रामदेव आणि राहुल गांधी यांचीही राशी एक आहे. माझ्या हातावर भाग्यरेखा नसूनही मी अनेकांचे भाग्य बदलले आहे. भूत-प्रेत, शनी, राहू, केतू हे फक्त आपल्यालाच का, आणि चीन, अमेरिका, पाकिस्तान यांना ते का नाहीत? ते असतीलच तर सीमा सुरक्षा दलाऐवजी भुताखेतांचाच वापर करायला हवा. आपण फार अंधविश्वासी असतो. धर्माच्या नावावर याचा धंदा केला जातो. पृथ्वी, सूर्य, चंद्र देवाने बनवले आहे मग त्यांच्यामुळेच बनलेला काळ हा अशुभ कसा असेल! भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे, पण काही बाबा कृपा करण्याचा धंदा चालवतात. धर्मात कधीही अवैज्ञानिकता नव्हती.’ संपूर्ण जीवन हाच योग असून आपण एकाग्रतापूर्वक जे करू तो योग’, असेही रामदेव बाबांनी एका भाषणात सांगितले.

रामदेवबाबांचे भारत-पाकिस्तान संबंधांवर विचार[संपादन]

‘पाकिस्तानमध्ये गरिबी आहे. ही गरिबी दूर झाली तर भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्वही नष्ट होईल,’ असे मत रामदेव बाबा यांचे मत आहे. पाकिस्तानमध्ये योग शिकवण्यासाठी जाणाण्याचा त्यांचा विचार आहे. त्याचप्रमाणे ‘यापुढे पाकिस्तानबरोबरच नेपाळ, बांगलादेश आणि आफ्रिका या देशांमध्येही पतंजलीची उत्पादने उपलब्ध होतील,’ अशी घोषणाही त्यांनी केली. रामदेवबाबा म्हणाले, ‘पतंजलीची जीन्स देखील येणार का असा प्रश्न हल्ली मला विचारला जातो. पतंजलीची जीन्स का नसावी? विदेशी कंपन्या भारतात येऊन १ रुपया गुंतवतात आणि शंभर रुपये घेऊन जातात. परदेशी कंपन्या त्यांच्याकडे तंत्रज्ञान असल्याचे सांगून आपल्याला मूर्ख बनवतात. तेल, शाम्पू, साबण तयार करण्यासाठी असे काय तंत्रज्ञान लागते? त्यांच्याकडे तंत्रज्ञान असेलच तर ते घेऊ पण उत्पादन भारतातच करू. पतंजलीने आतापर्यंत १ लाख तरुणांना रोजगार दिला असून पुढील पाच वर्षांत १ लाख कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे.’

पतंजली उद्योग[संपादन]

सुरुवातीला फक्त आयुर्वेदिक औषधे बनवणार्‍या पतंजली उद्योगाने आता घरोघरी वापररल्या जाणार्‍या साबण, दंतमंजन यांसारख्या सर्वच वस्तूंचे उत्पादन करायला सुरुवात केली. इ.स. २०१२ ते २०१६ या ४ वर्षांमध्ये पतंजली उद्योगसमूहाने सतत वार्षिक १०० टक्क्यांची वाढ केली आहे. पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये हे उत्पादन ५० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढून २०२० सालापर्यंत ते एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

पतंजली उद्योगसमूहाने बाजारात आणलेल्या गृहोपयोगी वस्तू (१००हून अधिक)[संपादन]

 • पतंजली कपडे धुण्याचा साबण
 • पतंजली भांडी घासायचा साबण
 • पतंजली ॲलो व्हेरा (कोरफड वापरून बनवलेला अंगाचा साबण)
 • पतंजली ॲलो व्हेरा जेल-Gel (जेलीसारखा अंगाचा साबण)
 • पतंजली हळदी-चंदन कांति (अंगाचा साबण)
 • पतंजली नीम कांति (अंगाचा साबण)
 • पतंजली लेमन हनी (अंगाचा साबण)
 • पतंजली पंचगव्य (अंगाचा साबण)
 • पतंजली रोज-गुलाब (अंगाचा साबण)
 • पतंजली मोगरा (अंगाचा साबण)
 • पतंजली ॲलो व्हेरा ॲप्रिकॉट स्क्रब
 • पतंजली दंतकांति नावाची टूथपेस्ट (नियमित वापरासाठी)
 • पतंजली दंतकांति नावाची टूथपेस्ट (औषधी)
 • पतंजली दंतकांति (ॲडव्हान्स)
 • पतंजली दंतकांति (ज्युनिअर)
 • पतंजली हर्बल (शेव्हिंग क्रीम)
 • पतंजली ॲंटी रिंकल क्रीम
 • पतंजली मध
 • पतंजली दिव्य (गुलाबपाणी)
 • पतंजली गिलोय घनवटी
 • पतंजली शिलाजीत (कॅपसूल्स)
 • पतंजली अश्वशिला (कॅपसूल्स)
 • पतंजली अश्वगंधा (कॅपसूल्स)
 • पतंजली इसबगोल (चूर्ण)
 • पतंजली पाचक अनारदाणा गोळी
 • पतंजली च्यवनप्राश
 • पतंजली स्पेशल केशरयुक्त च्यवनप्राश
 • पतंजली बदामपाक
 • पतंजली दृष्टी (डोळ्यात घालायचे थेंब)
 • पतंजली खोबरेल तेल
 • पतंजली बदाम केशतेल
 • पतंजली आवळा केशतेल
 • पतंजली केश कांति (केशतेल)
 • पतंजली कलर प्रोटेक्शन हेअर कंडिशनर
 • पतंजली केश कांति (शांपू)
 • पतंजली केश कांति (दूध-प्रथिनयुक्त शांपू)
 • पतंजली केश कांति (कोंडानाशक शांपू)
 • पतंजली ॲलो व्हेरा (शांपू)
 • पतंजली बदाम केशर (शांपू)
 • पतंजली आवळा रस
 • पतंजली ॲलो व्हेरा प्लेन रस
 • पतंजली ॲलो व्हेरा संत्रा रस
 • पतंजली नीम ॲलो व्हेरा ककुंबरसह (फेस पॅक)
 • पतंजली नीम-तुलसी (फेस वॉश)
 • पतंजली सौंदर्य (फेस वॉश)
 • पतंजली ऑरेंज ॲलो व्हेरा (फेस वॉश)
 • पतंजली मुलतानी मिट्टी
 • पतंजली बिस्किटे (नमकीन मेरी, दूध, आरोग्य, इलायची डिलाईट, ऑरेंज डिलाईट, नटी डिलाईट, चॉको डिलाईट)
 • पतंजली नवरत्‍न सोनपापडी
 • पतंजली नमकीन मूगडाळ
 • पतंजली चणा डाळ, राजमा (चित्रा), काबुली चणा, काळा चणा, तुरीची डाळ, आख्खे (शाबूत) मूग, मुगाची सालपटासहित डाळ, सालपटाविरहित मूग डाळ, मिश्र डाळ, मलका मसूर, वगैरे)
 • अधिक सुमारे ५० उत्पादने.

संदर्भ[संपादन]