केशिराज बास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केशिराज बास यांना केसोबास नावानेही ओळखले जाते. हे महानुभव पंथातील ज्येष्ठ ग्रंथकार, व संस्कृत पंडित होत. महानुभाव पंथाचे दुसरे आचार्य नागदेवाचार्य यांचे हे पट्टशिष्य. यांच्या सूचनेवरून केशीराज बास यांनी मराठी भाषेत ग्रंथ रचना केली.

महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी रचलेल्या लीळाचरित्र या ग्रंथातील उपदेश केशीराज बास यांनी इ.स. १२८५च्या सुमारास संकलीत केला. याचा प्रथम सूत्र, दृष्टांत व दार्ष्टांतिक असा रचनाक्रम आहे. दृष्टांत पाठात अनेक लोककथा गुंफल्या आहेत. प्रकार1अंशग्राह्य 2 समग्रांश 3 अन्वय 4 अप्रत्यान्वय 5 योगज 6 वास्तव

मराठी ग्रंथ लेखन[संपादन]

  • श्री चक्रधरोक्त सूत्रपाठ
  • मूर्तिप्रकाश
  • लापणिक
  • दृष्टांतपाठ

संस्कृत ग्रंथ लेखन[संपादन]

  • रत्नमाला स्तोत्र
  • ज्ञानकलानिधीस्तोत्र
  • दृष्टांतस्तोत्र