Jump to content

"शांता शेळके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६५: ओळ १६५:
{{Multicol-break}}
{{Multicol-break}}



* काय बाई सांगू
* किलबिल किलबिल पक्षि
* कुणीतरी सांगा हो सजणा
* खोडी माझी काढाल तर
* गगना गंध आला
* गजानना श्री गणराया
* गणराज रंगी नाचतो
* गणराज रंगी नाचतो
* गाव असा नि माणसं अशी
* जाईन विचारीत रानफुला
* गीत होऊन आले सुख माझे
* जीवलगा राहिले रे दूर घर
* गोंडा फुटला दिसाचा
* तोच चंद्रमा नभात
* घन रानी साजणा
* मी डोलकर डोलकर
* घर परतीच्या वाटेवरती
* मागे उभा मंगेश
* चित्र तुझे हे सजीव होऊन
* रेशमांच्या रेघांनी
* चंद्र दोन उगवले
* वादळ वारं सुटलं ग
* चांदणं टिपूर हलतो वारा
* ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
* चांदण्या रात्रीतले ते
* छेडियल्या तारा
* जय शारदे वागीश्वरी
* जा जा रानीच्या पाखरा
* जा जा जा रे नको बोलु
* जाईन विचारित रानफुला
* जायचे इथून दूर
* जिवलगा राहिले रे दूर
* जीवनगाणे गातच रहावे
* जे वेड मजला लागले
{{Multicol-end}}
{{Multicol-end}}



१८:४६, २१ जून २०१५ ची आवृत्ती

शांता शेळके
जन्म ऑक्टोबर १२, १९२२
इंदापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जून ६, २००२
,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण
भाषा मराठी
साहित्य प्रकार

कथा, कादंबरी, कविता,

चरित्र लेखन, वृत्तपत्रांत सदरलेखन

शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार, एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या.

जीवन

त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, तसेच शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय) झाले. आचार्य अत्र्यांच्या "नवयूग" मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापक म्हणून काम केले.

अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही त्यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे [].

त्या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या.

शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली. []

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अंगतपंगत मेहता प्रकाशन
अनोळख मेहता प्रकाशन
अलौकिक उत्कर्ष प्रकाशन
आंधळी अनुवाद (हेलन केलरच्या चरित्राचा) मेहता प्रकाशन
आंधळ्याचे डोळे मेहता प्रकाशन
इतस्तत: उत्कर्ष प्रकाशन
इतार्थ मेहता प्रकाशन
एक गाणे चुलीचे काव्यसंग्रह स्नेहवर्धन प्रकाशन
कविता स्मरणातल्या काव्यसंग्रह मेहता प्रकाशन
कळ्यांचे दिवस फुलांच्या राती सुरेश एजन्सी
काही जवळ काही दूर
किनारे मनाचे मेहता प्रकाशन
गोंदण काव्यसंग्रह मेहता प्रकाशन
चौघीजणी अनुवाद (लिटल विमेन, गुड वाइव्ह्‌ज) मेहता प्रकाशन
जन्मजान्हवी काव्यसंग्रह
जाणता अजाणता उत्कर्ष प्रकाशन
तोच चंद्रमा काव्यसंग्रह सुरेश एजन्सी
त्रिवेणी : गुलजार मेहता प्रकाशन
धूळपाटी ललित सुरेश एजन्सी
पत्रम्‌ पुष्पम्‌ ज्ञानदा पब्लिकेशन्स
पावसाआधीचा पाऊस ललित मेहता प्रकाशन
पूर्व संध्या काव्यसंग्रह मेहता प्रकाशन
बासरी
मधुसंचय परचुरे प्रकाशन
मनातले घर
मेघदूत अनुवाद मेहता प्रकाशन
रंगरेषा
रूपसी काव्यसंग्रह
रेशीमरेघा मेहता प्रकाशन
ललित नभी मेघ चार ज्ञानदा पब्लिकेशन्स
लेकुरवाळी उत्कर्ष प्रकाशन
वडीलधारी माणसं ललित सुरेश एजन्सी
वर्षा मेहता प्रकाशन
शांतस्मरण मधुश्री प्रकाशन
श्रावण शिवरा उत्कर्ष प्रकाशन
सतीचा वाडा उत्कर्ष प्रकाशन
संस्मरणे ललित
सांगावेसे वाटले म्हणून मेहता प्रकाशन
सुवर्णमुद्रा मेहता प्रकाशन

प्रसिद्ध गीते

  • अजब सोहळा
  • अपर्णा तप करिते काननी
  • अशीच अवचित भेटून जा
  • असता समीप दोघे हे
  • असेन मी नसेन मी
  • अहो जाईजुईच्या फुला
  • आई बघ ना कसा हा
  • आज चांदणे उन्हात हसले
  • आज मी आळविते केदार
  • आज मी निराधार एकला
  • आज सुगंध आला लहरत
  • आधार जिवा
  • आला पाऊस मातीच्या वासात
  • आली सखी आली प्रियामीलना
  • आले वयात मी बाळपणाची
  • ऋतु हिरवा, ऋतु बरवा
  • एक एक विरते तारा
  • कर आता गाई गाई
  • कशि गौळण राधा
  • कशी कसरत दावतुया न्यारी
  • कळले तुला काही
  • कळ्यांचे दिवस फुलांच्या
  • का धरिला परदेश
  • काटा रुते कुणाला
  • कान्हू घेउन जाय
  • काय आणितोसी वेड्या


  • काय बाई सांगू
  • किलबिल किलबिल पक्षि
  • कुणीतरी सांगा हो सजणा
  • खोडी माझी काढाल तर
  • गगना गंध आला
  • गजानना श्री गणराया
  • गणराज रंगी नाचतो
  • गाव असा नि माणसं अशी
  • गीत होऊन आले सुख माझे
  • गोंडा फुटला दिसाचा
  • घन रानी साजणा
  • घर परतीच्या वाटेवरती
  • चित्र तुझे हे सजीव होऊन
  • चंद्र दोन उगवले
  • चांदणं टिपूर हलतो वारा
  • चांदण्या रात्रीतले ते
  • छेडियल्या तारा
  • जय शारदे वागीश्वरी
  • जा जा रानीच्या पाखरा
  • जा जा जा रे नको बोलु
  • जाईन विचारित रानफुला
  • जायचे इथून दूर
  • जिवलगा राहिले रे दूर
  • जीवनगाणे गातच रहावे
  • जे वेड मजला लागले

पुरस्कार

  • गदिमा गीतलेखन पुरस्कार १९९६
  • सुरसिंगार पुरस्कार (’मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ या गीतासाठी)
  • केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग)
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (२००१) साहित्यातील योगदानाबद्दल

गौरव

  • १९९६ या वर्षी आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

शांता शेळके यांच्यावर लिहिलेली पुस्तके

  • शान्ताबाईंची स्मृतिचित्रे (संपादक - यशवंत किल्लेदार)

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ शांता शेळके १
  2. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4326101.cms. २१ ऑक्टोबर २०११ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)