इंदिरा संत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
इंदिरा संत
जन्म नाव इंदिरा नारायण संत
जन्म जानेवारी ४, १९१४
इंडी, कर्नाटक, भारत
मृत्यू जुलै १३, २०००
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यापन
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
पती ना.मा. संत
अपत्ये प्रकाश नारायण संत

इंदिरा संत (जानेवारी ४, १९१४, इंडी - जुलै १३, २०००, पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.

कौटुंबिक[संपादन]

पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संत यांचा जन्म जानेवारी ४, १९१४ रोजी कर्नाटकातील इंडी या गावी झाला. कोल्हापूरपुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए., बी.टी.डी.बी.एड या पदव्या प्राप्त केल्यानंतर बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजात अध्यापिका म्हणून काम पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी १९५६ ते १९७४ या काळात प्राचार्यपद देखील भूषवले. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात सहाध्यायी ना.मा.संत यांच्याशी त्या १९३५ साली विवाहबद्ध झाल्या.

प्रकाशित साहित्य[संपादन]

इंदिरा संत यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे:

कवितासंग्रह[संपादन]

कथासंग्रह[संपादन]

  • कदली
  • चैतू
  • श्यामली

ललितलेख संग्रह[संपादन]

पुरस्कार[संपादन]