राम मराठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राम मराठे

पं. राम मराठे
आयुष्य
जन्म ऑक्टोबर २३, १९२४
जन्म स्थान पुणे,भारत
मृत्यू ऑक्टोबर ४, १९८९
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
अपत्ये सुशीला ओक (कन्या)
संगीत साधना
गुरू पं. मनोहर बर्वे
पं यशवंतबुवा मिराशी
मास्तर कृष्णराव
उस्ताद विलायत हुसेन खॉं
पं. जगन्नाथबुवा पुरोहीत
गजाननबुवा जोशी
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
कार्य मराठी संगीतकार, गायक व नट
पेशा गायकी

रामचंद्र पुरुषोत्तम मराठे (जन्म : पुणे, ऑक्टोबर २३, १९२४ - - ऑक्टोबर ४, १९८९) हे मराठी संगीतकार, गायक व नट होते.

जीवन[संपादन]

राम मराठे हे पं. मनोहर बर्वे, पं. यशवंतबुवा मिराशी, मास्तर कृष्णराव, आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत हुसेन खॉं व पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकले. पं गजाननबुवा जोशी यांच्या गायकीचाही त्यांच्यावर प्रभाव पडला.

त्यांच्या कन्या सुशीला ओक व नात पल्लवी पोटे या त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी एका संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात.

कारकीर्द[संपादन]

नाटके[संपादन]

नाटक वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
मदनाची मंजिरी १९६५ मराठी संगीत
मंदारमाला १९६३ मराठी संगीत, गायन
मेघमल्हार १९६७ मराठी संगीत

पंडित राम मराठे यांची गाजलेली ध्वनिमुद्रित गीते[संपादन]

 • अगा वैकुंठीचा राणा (नाटक - संत कान्होपात्रा)
 • कशि नाचे छमाछ्म्
 • कांता मजसि तूचि
 • कोण अससि तू न कळे
 • गुरू सुरस गोकुळीं
 • जय शंकरा गंगाधरा (नाटक - मंदारमाला)
 • जयोस्तु ते हे उषादेवते
 • तारिल हा तुज गिरिजाशंकर
 • ती सुंदरा गिरिजा
 • दुनियेच्या अंधेर नगरीचा
 • दे चरणि आसरा
 • धनसंपदा न लगे मला ती
 • निराकार ओंकार साकार
 • नुरले मानस उदास
 • बसंत की बहार आयी
 • मधुर स्वरलहरी या
 • विश्वनाट्य सूत्रधार
 • सप्‍तसूर झंकारित बोले
 • सुख संचारक पवन
 • सूरगंगा मंगला
 • हरिहरा ओंकार मनोहर
 • हरी मेरो जीवनप्राण-अधार
 • हे सागरा नीलांबरा

पंडित राम मराठे यांच्या प्रसिद्ध बंदिशी[संपादन]

गौरव[संपादन]

 • मोघुबाई कुर्डीकर यांनी राम मराठ्यांना यांना जोड आणि अनवट रागांचा बादशहा म्हणून गौरवले.
 • राम मराठ्यांना महाराष्ट्र शासनाने 'संगीतभूषण' किताबाने गौरविले.
 • १९८७ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला.
 • जून १९८५ पासून पासून तळेगाव दाभाडे येथे पं. राम मराठे यांच्या नावाची संगीत स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी सुगम संगीत, नाट्य संगीत, शास्त्रीय संगीत, पेटी वादन, तबला वादन, पखवाज वादन यांपैकी कोणताही एक प्रकार निवडता येतो. विजेत्याला रोख पुरस्कार, सन्मान चिन्ह आणि प्रामाणपत्र देण्यात येते. तळेगावचे श्रीरंग कला निकेतन ही स्पर्धा घेते.

बाह्य दुवे[संपादन]