संदीप खरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
संदीप खरे
Sandeep Khare side shot
जन्म मे १३, १९७३
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र साहित्य, चित्रपट
भाषा मराठी
साहित्य प्रकार गीतकार, कविता

संदीप खरे (मे १३, १९७३ - हयात) हे प्रसिद्ध मराठीकवीगायक आहेत. त्यांचे 'दिवस असे की' आणि 'आयुष्यावर बोलू काही' या गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. सलील कुलकर्णींबरोबर त्यांनी बरेच गीतसंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या व्यासपीठावरील आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमांमुळे ते सुरुवातीला प्रसिद्धी झोतात आले. त्याचे १००० च्या वर प्रयोग झाले आहेत. आजही त्यांचे कार्यक्रम हाउसफुल असतात. आयुष्यावर बोलू काही बरोबरच, ते कवी वैभव जोशी ह्यांच्यासोबत 'इर्शाद' हा कवितांचा कार्यक्रम देखील करतात. 

जीवन[संपादन]

संदीपने इयत्ता चौथीत असताना पहिली कविता केली. अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्याने कविता आणि कथा या विषयात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजलेल्या 'उमलते अंकुर' या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या कविता ही कवी म्हणून ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरली.

पुस्तके[संपादन]

गीतसंग्रह[संपादन]

कार्यक्रम[संपादन]

पुरस्कार[संपादन]

पुरस्कार तारीख कारण
पुण्य गौरव पुरस्कार मार्च १३, इ.स. २००७ कला आणि संस्कृतीमधील योगदानासाठी
झी गौरव पुरस्कार फेब्रुवारी १७, इ.स. २००८
आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार मार्च ११, इ.स. २०१०
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या वतीने - कै. बालगंधर्व पुरस्कार ऑगस्ट १४, इ.स. २०११
विशेष व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार - रोटरी पुरस्कार ऑक्टो १०, इ.स. २०११
साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे काव्यदीप पुरस्कार]] फेब्रुवारी, इ.स. २०१६

बाह्यदुवा[संपादन]

माणिक मोती वरील संदीप खरे यांची गाणी