Jump to content

संगीत स्वयंवर (नाटक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संगीत स्वयंवर या पानावरून पुनर्निर्देशित)

सं. स्वयंवर हे नाटकाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले मराठी संगीत नाटक आहे. तसेच या नाटकाचे संगीत दिग्दर्शन श्री भास्करबुवा बखले यांनी केले आहे.भास्करबुवा बखले यांना 'देवगंधर्व'ही उपाधी बहाल केलेली आहे. नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १० डिसेंबर, १९१६ रोजी मुंबई येथे झाला. या प्रयोगात रुक्मिणीची भूमिका बालगंधर्वांनी केली होती, तर गणपतराव बोडस कृष्णाच्यारघुवीर सावरकर हे महाराणीच्या भूमिकेत होते. या नाटकासाठी भरजरी शालू, सोन्याचे दागिने तसेच पॅरिसहून मागवलेले अत्तर वापरण्यात आले होते. या नाटकात २५हून अधिक गीते होती.

संगीत स्वयंवर या नाटकाचे मुख्य कथानक हे देवी रुक्मिणी व श्री कृष्णाच्या लग्नावर(स्वयंवर) आधारित आहे. यामध्ये श्री कृष्णाला कधीही न पहिलेली रुक्मिणी श्री कृष्णाच्या केवळ केलेल्या रूपाच्या वर्णनावर श्री कृष्णाच्या प्रेमात अखंड बुडून जाते.आणि श्रीकृष्णा बरोबर च लग्न करण्याचा निश्चिय करते. श्री कृष्णाने केलेल्या कंस वधाने रुक्मिणी चा भाऊ रुक्मी हा श्री कृष्णावर प्रचंड संतापून श्री कृष्णाच्या वधासाठी सुडाने संतापलेला असतो.त्यामुळे रुक्मिणी चा विवाह हा रुक्मी चा परम मित्र शिशुपाल याच्याशी च लावून देण्याच वचन रुक्मि णे शिशुपाला ला दिलेला असत. श्री कृष्णाच्या यादव कुळाने १७ वेळा युद्ध करून शिशुपाला च्या सेनेला युद्धात धूळ चारून पराजय केलेला असतो. रुक्मिणी चा शिशुपाल सोबत होणारा विवाह रोखण्यासाठी श्री कृष्णाने केलेले नाटक व झालेला संघर्ष तसेच रुक्मिणीचा श्री कृष्णाच्या प्रेमासाठी केलेले प्रयत्न या नाटकामध्ये कथानक केले आहे.