रामदास कामत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रामदास शांताराम कामत (जन्म: १८ फेब्रुवारी, १९३१, मृत्यू: ८ जानेवारी २०२२, विलेपार्ले [१]) हे संगीत नाटकांत काम करणारे एक मराठी गायक नाट्य‍अभिनेते आणि संगीत शिक्षक होते. नाट्यगीतांखेरीज त्यांनी अनेक भक्तिगीते, स्तोत्रे आणि भावगीतेही गायली आहेत. इ.स. २००९ साली बीड येथे भरलेल्या ८९व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद रामदास कामत यांनी भूषविले होते.

रामदास कामत मूळचे गोव्यातील साखळी गावातले. १९३८ साली पुराचा फटका गावाला बसला, तेव्हा मदतनिधीसाठी गोवेकरांनी 'बेबंदशाही' नाटक करावयाचे ठरवले. त्यात कामतांनी आपल्या आयुष्यातली पहिली भूमिका करताना दोन पदेही सादर केली. पुढे कामत मुंबईला येऊन अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. पण त्यांच्या मनात गाणे कायम रुंजी घालत होते. तरी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही. नोकरी सांभाळूनच ते आकाशवाणीवर गात आणि जमेल तेव्हा संगीत नाटकांत कामे करीत.

कारकीर्द[संपादन]

१९६४मध्ये आलेल्या 'मत्स्यगंधा' नाटकाने रामदास कामत यांचे नाव घराघरांत पोहोचले आणि पुढे ते गायक अभिनेते म्हणूनच प्रसिद्धीस आले. पाठोपाठ नाटक 'ययाती देवयानी' आले आणि 'सर्वात्मका सर्वेश्वरा...' ही त्यांची प्रार्थना अजरामर झाली. पुढे 'धन्य ते गायनी कळा', 'मीरामधुरा', 'हे बंध रेशमाचे' अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका व पदे गाजली. पण 'मुंबईचा जावई' चित्रपटातील 'प्रथम तुज पाहता...' या त्यांच्या गीताने मात्र लोकप्रियतेचा कळस गाठला.

१९६०च्या दशकात वसंत कानेटकर यांचे 'मत्स्यगंधा' नाटक आले आणि त्या पाठोपाठ वि. वा. शिरवाडकरांचे 'ययाती देवयानी'. या दोन नाटकांत कामत यांनी महत्त्वाच्या भूमिका तर केल्याच; 'नको विसरू संकेत मीलनाचा', 'देवाघरचे ज्ञात कुणाला', 'साद देती हिमशिखरे' व 'गुंतता हृदय हे...' ही त्यांची नाट्यगीते आकाशवाणीच्या प्रसिद्ध झाली. पण त्याचवेळी श्रीमती वीणा चिटको यांनी संगीतबद्ध केलेली 'पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव', 'अंबरातल्या निळ्या घनाची' आणि 'सखी सांज उगवली' अशी भावगीते गाऊन त्यांनी आपण केवळ शास्त्रीय संगीताची बैठक असलेली नाट्यगीतेच गाऊ शकतो, हा समज पुसून टाकला.

वयोपरत्वे १९९७ मध्ये त्यांनी रंगभूमीवरून 'निवृत्ती घेतली.

रामदास कामत यांची नाटके आणि त्यांत त्यांनी वठविलेल्या भूमिका[संपादन]

  • एकच प्याला (रामलाल)
  • कान्होपात्रा (विलासराव
  • धन्य ते गायनी कळा (तानसेन)
  • सं. मत्स्यगंधा (पराशर)
  • मदनाची मंजिरी (सारंगधर)
  • सं. मानापमान (धैर्यधर)
  • मीरा मधुरा (भोज)
  • मृच्छकटिक (चारुदत्त)
  • ययाती आणि देवयानी (कच)
  • सं. शारदा (कोदंड)
  • संन्याशाचा संसार (डेव्हिड)
  • संशयकल्लोळ (अश्विनशेठ, साधू)
  • सं. सौभद्र (अर्जुन, कृष्ण, नारद)
  • स्वरसम्राज्ञी (गंगाधर)
  • होनाजी बाळा (होनाजी)

रामदास यांच्या आवाजातली भावगीते, चित्रपटगीते आणि नाट्यगीते[संपादन]

चित्रपट - थापाड्या)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचे निधन". Loksatta. 2022-01-09 रोजी पाहिले.

(अपूर्ण)