काकासाहेब खाडिलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर हे मराठी नाटककार होते. पारतंत्र्याच्या काळात पत्रकार म्हणून ते आपले विचार 'केसरी'च्या द्वारे लोकांसमोर मांडू लागले होते. पण त्याच काळात खाडिलकरांनी 'स्वयंवर' 'मानापमान' सारखी ललित नाटके लिहिली.

खाडिलकर हे ध्येयवादी होते. उदात्त गुणांचे त्यांना आकर्षण होते. काही जीवनमूल्यांवर त्यांची निष्ठा होती. एक प्रकारे त्यांच्या मनाची घडण आध्यात्मिक होती. त्यांच्या नाटकांतील अनेक पात्रे या गुणांचे दर्शन घडवितात. खाडिलकरांच्या सगळ्या नाटकांत तात्यासाहेब केळकरांनी म्हटल्याप्रमाणे 'ओज हा गुण आहे'; त्यांचे शृंगाररस आणि करुणरससुद्धा ओजगुणान्वित असतात; व त्यामुळे त्या रसाभोवती एक प्रकारचे उदात्त वातावरण निर्माण होते.

मराठ्यांच्या इतिहासातही हेच कारुण्य-नाट्य आहे. खाडिलकरांनी 'स्वयंवर', 'भाऊबंदकी' किंवा 'सवाई माधवराव यांचा मृत्यु' हे नाटकांचे विषय त्याचसाठी निवडले.

काकासाहेब खाडिलकरांवरील पुस्तके[संपादन]

  • काकासाहेब खाडिलकर यांचे चरित्र (का.ह. खाडिलकर)

पहा : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर - विकीवरील मराठी लेख.