बी. रघुनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भगवान रघुनाथ कुळकर्णी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ फुलारी ऊर्फ बी.रघुनाथ (१५ ऑगस्ट, इ.स. १९१३ - ७ सप्टेंबर, इ.स. १९५३) हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी आणि लेखक होते.

जीवन[संपादन]

बी. रघुनाथ यांचा जन्म १५ ऑगस्ट, इ.स. १९१३ रोजी मराठवाड्यात परभणी जिल्ह्यातील सातोना या गावी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर ते वयाच्या १४व्या वर्षी शिक्षणासाठी हैदराबादला गेले. तिथे ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण शक्य नव्हते. त्यामुळे ते सरळ इ.स. १९३२ साली परभणीत सरकारी बांधकाम विभागात कारकून म्हणून लागले.

बी.रघुनाथ यांनी इ.स. १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला. त्यांची पहिली कविता हैदराबाद येथील "राजहंस" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिद्ध झाली. नंतर मात्र त्यांनी बी.रघुनाथ या नावाने लेखन केले.

मृत्यू[संपादन]

आपल्या कार्यालयात काम करीत असतानाच बी.रघुनाथ यांचे ७ सप्टेंबर, इ.स. १९५३ रोजी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले.

प्रकाशित साहित्य[संपादन]

बी.रघुनाथ यांनी इ.स. १९३० ते इ.स. १९५३ या तेवीस वर्षाच्या काळात एकूण १५ पुस्तके लिहिली.

काव्यसंग्रह[संपादन]

 • आलाप आणि विलाप(१९४१)
 • पुन्हा नभाच्या लाल कडा(१९५५)

कथासंग्रह[संपादन]

 • साकी (इ.स. १९४०)
 • फकिराची कांबळी (इ.स. १९४८)
 • छागल (इ.स. १९५१)
 • आकाश (इ.स. १९५५)
 • काळीराधा (इ.स. १९५६)

कादंबऱ्या[संपादन]

 • ओ॓ (इ.स. १९३६)
 • हिरवे गुलाब (इ.स. १९४३)
 • बाबू दडके (इ.स. १९४४)
 • उत्पात (इ.स. १९४५)
 • म्हणे लढाई संपली (इ.स. १९४६)
 • जगाला कळले पाहिजे (इ.स. १९४९)
 • आडगांवचे चौधरी (इ.स. १९५४)

संकीर्ण[संपादन]

 • अलकेचे प्रवासी (स्फुट लेख-संग्रह, इ.स. १९४५)

गाजलेले साहित्य[संपादन]

कविता[संपादन]

 • अन्‍नदेवा
 • आज कुणाला गावे?
 • उन्हात बसली न्हात
 • कशाला मुखी पुन्हा तांबुल?
 • घन गरजे
 • चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली
 • ज्वार
 • टिचकी
 • ती तुमच्यावर हसली रे
 • तुजवर लिहितो कविता साजणी
 • ते न तिने कधि ओळखले
 • दुपार
 • नेस नवी साडी
 • पडली बघ झाकड
 • पांढर्‍या पार्‍या या
 • पानझड
 • पुन्हा नभाच्या लाल कडा
 • मुद्रिका
 • मुलीस आला राग
 • या जगताची तृषा भय़ंकर
 • रस्ता नागर झाला
 • राव अधिकारी झाले
 • लहर
 • सांज
 • स्वस्त्धान्याचे दुकान

लघुकथा[संपादन]

 • आकाश
 • काळी राधा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.