अनिल बाबुराव गव्हाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अनिल बाबुराव गव्हाणे (जन्म: ५ डिसेंबर १९६४-हयात) हे ग्रामीण भागातील साहित्यिक आहेत. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यात त्यांचे बोरगाव (बु.) हे गाव. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते बी.ए. झाले आहेत. त्यांचा बळीराजा हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून, त्यांच्या काही कविता, कथा आणि एकांकिका पुण्याच्या किशोर मासिकातूनही प्रसिद्ध झाल्या आहेत. आकाशवाणीच्या उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आदी केंद्रांवरून गव्हाणे यांचे काव्यवाचन व मुलाखत प्रसारित झाली आहे.[ संदर्भ हवा ]

कवी अनिल गव्हाणे यांची कुणबी माझा ही बळीराजा कवितासंग्रहातील कविता मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्गात जून २०१४ पासून शिकवली जाते..[ संदर्भ हवा ]

त्यांना राज्यस्तरीय यशवंत रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.