आत्माराम रावजी देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अनिल या पानावरून पुनर्निर्देशित)
आत्माराम रावजी देशपांडे
Deshpande AR.jpg
जन्म नाव आत्माराम रावजी देशपांडे
टोपणनाव अनिल
जन्म सप्टेंबर ११, १९०१
मुर्तीजापूर, महाराष्ट्र
मृत्यू मे ८, १९८२
नागपूर, महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र काव्य, साहित्य, समाजशिक्षण
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार

आत्माराम रावजी देशपांडे (सप्टेंबर ११, १९०१ - मे ८, १९८२) हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी - १० चरणांची कविता - हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.

जीवन[संपादन]

कवी अनिलांचा जन्म सप्टेंबर ११, इ.स. १९०१ रोजी मुर्तिजापूर ह्या गावी झाला. तेथेच शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते इ.स. १९१९ पुणे शहरास आले. फर्गसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा पदवी अभ्यासक्रम करीत असतानाच कुसुम जयवंत ह्या तरुणीशी परिचय, त्याचे पुढे प्रेमात रूपांतर आणि ऑक्टोबर ६, १९२९ ला विवाहात परिणती.

पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे प्रयाण. ह्याबाबत अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसु ह्यांचे मार्गदर्शन. त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी. सनद घेतल्यावर वकिलीचा व्यवसाय. १९४८ साली मध्यप्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून नेमणूक. १९५६ साली राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र, दिल्ली इथे मुख्याधिकारी या, आणि पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाचे सल्लागार ह्या पदांवर नेमणुका.

असा मार्गक्रम करत असताना मराठी वाङ्मयात महत्त्वाचे योगदान. कवी अनिलांना इ.स. १९७९ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली.

मे ८, इ.स. १९८२ रोजी नागपूरला निर्वाण.

काव्यसंग्रह[संपादन]

  • फुलवात १९३२
  • भग्नमूर्ती (दीर्घकाव्य) १९३५
  • निर्वासित चिनी मुलास (दीर्घकाव्य) १९४३
  • पेर्ते व्हा १९४७
  • सांगाती १९६१
  • दशपदी १९७६

गौरव[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]