Jump to content

दासू वैद्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


दासू वैद्य
जन्म नाव dasu vaidya
टोपणनाव dasu
जन्म १० डिसेंबर १९६७
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, लेखन, व्याख्याता
साहित्य प्रकार balsahitya lalit sangraha
विषय balyasahitya
चळवळ sahityawadi
प्रसिद्ध साहित्यकृती kay rav pustakrao
प्रभाव ek hai sakhargao v nal
पुरस्कार bhaulmitra sahitya puraskar


दासू वैद्य  : मराठीतले आघाडीचे कवि आणि साहित्यकार. त्यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 'दासू'ची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत

जन्म आणि जीवन

[संपादन]

दासू वैद्य यांचे बालपण नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड येथे गेले.शाळेत असताना ग्रामीण जीवन जवळून अनुभवता आले. गणितासारख्या विषयाशी त्याकाळात कधी जमले नाही तरी लहानपणापासून सगळ्या कविता तोंडपाठ असायच्या. "आई-वडील, भावाने तुला जे काय करायचे आहे ते कर अशी मुभा दिली, त्यामुळे चौकटीत राहून स्वैराचारासारखे मिळवत गेलो," असेही दासू यांनी स्वतः बाबत सांगितले आहे[१]. पुढे पदव्यूत्तर शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले. ते या विद्यापीठात मराठी विभागात अध्यापन करतात.

साहित्यिक कारकीर्द

[संपादन]

दासू वैद्य १९८७ पासून विविध वाङ्मयीन नियतकालिकांत नियमित लेखन करीत आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवर एकांकिका स्पर्धातून त्यांनी लिहीलेल्या आणि दिसाहित्य अकादमीची तरुण लेखकांसाठी असलेली सन्मानवृत्ती त्यांना मिळाली आहे. अकादमीच्या राष्ट्रीय महोत्सवात त्यांनी कवितांचे वाचन केले आहे. त्यांच्या काही कवितांचे हिंदी इंग्रजी मल्याळम तेलुगू आणि उर्दू भाषांत भाषांतर झाले आहे.अल्फागौरव, मटा सन्मान आणि महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या बालकवितांचे वाचन केले आहे[2]. दूरचित्रवाणी मालिका आणि सावरखेड एक गाव सारख्या काही चित्रपटांसाठीही त्यांनी गीतलेखन केले आहे.त्यांची तीन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

प्रकाशित पुस्तके

[संपादन]

दासू वैद्य यांची पुढील पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत [३]

१) तूर्तास (कवितासंग्रह) जानेवारी २००३ पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

२) क कवितेचा (बालकवितासंग्रह) जुलै २००९ पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

३) भुर्र (बालकुमार वाङ्मय) साकेत प्रकाशन प्रा. लि. औरंगाबाद

४) "आजूबाजूला" (ललित लेखसंग्रह) जानेवारी २०१०, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.

५) "तत्पूर्वी" (कवितासंग्रह) फेब्रुवारी २०१४, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

६) "मेळा" (ललित लेखसंग्रह) ऑगस्ट २०१९, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

संदर्भ

[संपादन]

१. गावातल्या संस्कारांनी दिले जगाचे ज्ञान - प्रा. दासू वैद्य [मृत दुवा]

२. दासू वैद्य [मृत दुवा]

३. प्रकाशित पुस्तकांची यादी [permanent dead link]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "आठवणीतली गाणी". January 23, 2012 रोजी पाहिले.