Jump to content

बाळकृष्ण भगवंत बोरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बा.भ. बोरकर या पानावरून पुनर्निर्देशित)

बा.भ. बोरकर (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (जन्म : बोरी-गोवा, ३० नोव्हेंबर १९१०; - ८ जुलै १९८४) हे मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते. ते मराठी साहित्यप्रेमीही होते. बा.भ,बोरकर हे गोमंतकाचे भूषण होते.

बालकृष्ण भगवंत बोरकर यांचे स्मारक

जीवनकाल

[संपादन]

बोरकर मॅट्रिक झाल्यावर काॅलेजात गेले, पण अभ्यास न झेपल्याने त्यांनी कॉलेजला रामराम ठोकला. पुढे गोव्यात वास्कोला इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकीपेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात 'प्रतिभा' या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. इ.स. १९३४ साली त्यांना बडोद्यातील वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनात 'तेथे कर माझे जुळती' या काव्यगायनाने कवी म्हणून त्यांना ख्याती प्राप्त झाली. इ.स. १९४६ साली त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्‌मयविभागाचे संचालक म्हणून काम केले, आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले.

बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे. 'फुलत्या लाख कळ्या', 'सरीवर सरी आल्या गं' या त्यांच्या प्रेमकविता आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.

काव्यलेखनाबरोबर बोरकरांनी ललित लेख, कादंबरी, कथा, चरित्रात्मक प्रबंध यावरही लेखन केले. स्टीफन युविंग (Ewing) यांच्या कादंबऱ्याचे तसेच महात्मा गांधीजींच्या काही पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत. त्यांच्या सासाय या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.

मराठी साहित्य विश्वात आनंदयात्री कवी अशी बोरकरांची ओळख होती. बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे.[१]

८ जुलै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले.

बोरकरांच्या कवितांवरील कार्यक्रम

[संपादन]
 • शास्त्रीय संगीत गायिका डाॅ. सुहासिनी कोरटकर या बा.भ. बोरकर यांच्या हिंदी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’ हा कार्यक्रम करीत असत.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
शीर्षक प्रकाशन प्रकाशन दिनांक (इ.स.) भाषा साहित्यप्रकार
अनुरागिणी इ.स. १९८२ मराठी कवितासंग्रह
आनंदभैरवी इ.स. १९५० मराठी कवितासंग्रह
कांचनसंध्या इ.स. १९८१ मराठी कवितासंग्रह
गितार इ.स. १९६५ मराठी कवितासंग्रह
चित्रवीणा इ.स. १९६० मराठी कवितासंग्रह
चिन्मयी इ.स. १९८४ मराठी कवितासंग्रह
चैत्रपुनव इ.स. १९७० मराठी कवितासंग्रह
जीवनसंगीत इ.स. १९३७ मराठी कवितासंग्रह
दूधसागर इ.स. १९४७ मराठी कवितासंग्रह
प्रतिभा इ.स. १९३० मराठी कवितासंग्रह
कागदी होड्या इ.स. १९३८ मराठी लघुनिबंध
मावळता चंद्र इ.स. १९३८ मराठी कादंबरी
अंधारातील वाट इ.स. १९४३ मराठी कादंबरी
जळते रहस्य इ.स. १९४५ मराठी कादंबरी (भाषांतरित, मूळ The Burning Secret. लेखक - स्टीफन झ्वायग)
भावीण इ.स. १९५० मराठी कादंबरी
बापूजींची ओझरती दर्शने इ.स. १९५० मराठी भाषांतर
आम्ही पाहिलेले गांधीजी इ.स. १९५० मराठी भाषांतर
काचेची किमया इ.स. १९५१ मराठी भाषांतर
गीता-प्रवचनां इ.स. १९५६ कोेकणी (विनोबांच्या गीताप्रवचनांचे कोंकणी भाषांतर)
संशयकल्लोळ इ.स. १९५७ कोेकणी भाषांतर
बोरकरांची कविता इ.स. १९६० मराठी कवितासंग्रह (आरंभापासूनच्या पाच कवितासंग्रहांचे संकलित प्रकाशन)
प्रियदर्शनी इ.स. १९६० मराठी कथासंग्रह
माझी जीवनयात्रा इ.स. १९६० मराठी भाषांतर
गीताय इ.स. १९६० कोंकणी भाषांतर (भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद)
पांयजणां इ.स. १९६० कोेकणी कवितासंग्रह
आनंदयात्री रवींद्रनाथ : संस्कार आणि साधना इ.स. १९६४ मराठी चरित्रपर
चांदणवेल (बोरकरांच्या निवडक मराठी कविता) इ.स. १९७२ मराठी कवितासंग्रह (संपादित)
वासवदत्ता : एक प्रणयनाट्य इ.स. १९७३ कोंकणी भाषांतर
संशयकल्लोळ (मूळ ले. मोलियर, मराठी रूपांतर : गो. ब. देवल ) इ.स. १९७६ कोंकणी भाषांतर
पैगंबर (ले. खलील जिब्रान) इ.स. १९७६ कोंकणी भाषांतर
मेघदूत इ.स. १९८० मराठी समश्लोकी, समवृत्त, सयमक भाषांतर
सासाय इ.स. १९८० कोंकणी कवितासंग्रह
बामण आनी अभिसार इ.स. १९८१ कोंकणी भाषांतर
चांदण्याचे कवडसे इ.स. १९८२ मराठी ललित लेखसंग्रह
समुद्राकाठची रात्र इ.स. १९८२ मराठी लघुकथासंग्रह
पावलापुरता प्रकाश इ.स. १९८३ मराठी ललित लेखसंग्रह
प्रियकामा इ.स. १९८३ मराठी कादंबरी
भगवान बुद्ध (ले. धर्मानंद कोसंबी) इ.स. १९८३ कोंकणी भाषांतर
कौतुक तू पाहे संचिताचे इ.स. २०१० मराठी आत्मचरित्र (अपूर्ण) (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित)
बा. भ. बोरकरांचे अप्रकाशित साहित्य इ.स. २०१० मराठी लेखन-संग्रह (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित)
अप्रकाशित बाकीबाब इ.स. २०१० कोंकणी लेखन-संग्रह (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित)
महात्मायन मराठी महाकाव्य (अपूर्ण)

बोरकरांच्या निवडक कविता संकलित वा संपादित पद्धतीने खालील पुस्तकांतून प्रकाशित झाल्या आहेत.

शीर्षक प्रकाशन प्रकाशन दिनांक (इ.स.) संपादक भाषा साहित्यप्रकार
कैवल्याचे झाड सुरेश एजन्सी, पुणे इ.स. १९८७ मराठी काव्यसंग्रह
चांदणवेल कॉंटिनेॅंटल प्रकाशन इ.स. १९७२ गो.म. कुलकर्णी मराठी काव्यसंग्रह
बोरकरांची कविता मौज प्रकाशन इ.स. १९६० मंगेश पाडगावकर मराठी काव्यसंग्रह
बोरकरांची प्रेमकविता सुरेश एजन्सी, पुणे इ.स. १९८४ रा.चिं. ढेरे मराठी काव्यसंग्रह
बोरकरांची निवडक कविता साहित्य अकादमी इ.स. १९९६ डॉ. प्रभा गणोरकर मराठी काव्यसंग्रह

बोरकरांच्या साहित्यावर उपलब्ध असलेले समीक्षणात्मक ग्रंथ

 • बा.भ.बोरकर व्यक्ती आणि वाङ्मय - मनोहर हि.सरदेसाई, गोमंतक मराठी अकादमी, फेब्रु १९९२.
 • कविवर्य बा.भ.बोकरकर-समीक्षा - डॉ.वासन्ती इनामदार जोशी, रूक्मिणी प्रकाशन,कोल्हापूर, जून २००४.
 • बा.भ.बोकरकर जन्मशतसांवत्सरिक - संपादक: डॉ.सु.म.तडकोडकर, प्रतिमा प्रकाशन, पुणे, फेब्रु.२०१२.
 • भारतीय साहित्याचे निर्माते बा.भ.बोरकर- प्रभा गणोरकर, साहित्य अकादमी


बोरकरांची काव्येतर साहित्यनिर्मिती

[संपादन]
 • अनुवाद ६
 • कथासंग्रह २
 • कादंबऱ्या ४ ('मावळता चंद्र','अंधारातली वाट', 'भावीण','प्रियकामा')
 • कोंकणी साहित्यकृती १०
 • चरित्रात्मक प्रबंध २
 • ललितलेख संग्रह ४
 • संपादित कवितासंग्रह १ कुसुमाग्रजांची निवडक कविता रसयात्रा

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
 1. ^ PRABHA GANORKAR. BALKRISHNA BHAGWANT BORKAR - MARATHI.

बाह्य दुवे

[संपादन]