बाबाराव मुसळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाबाराव मुसळे
जन्म बाबाराव
जून १० , इ.स. १९४९
मैराळडोह (तालुका मालेगाव जिल्हा वाशीम)
निवासस्थान जुनी आययूडीपी वसाहत, गजानन महाराज मंदिरामागे, वाशीम, ४४४५०५.
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे शांती अरू
नागरिकत्व भारतीय
शिक्षण शिक्षण एमए (मराठी), बीएस्‌सी (जीवशास्त्र), बीएड
प्रशिक्षणसंस्था मराठवाडा विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ औरंगाबाद
पेशा सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक
कारकिर्दीचा काळ (१९७३-२००७)
मूळ गाव ब्रह्मा (तालुका व जिल्हा वाशीम)
ख्याती मराठी साहित्यिक
वडील गंगाराम ग्यानबा मुसळे
आई कै कलावती गंगाराम मुसळे

बाबाराव गंगाराम मुसळे (जून १०, इ.स. १९४९ -हयात) हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. १९८५मध्ये 'हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीने प्रसिद्धीच्या झोतात आले. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली.[ संदर्भ हवा ] त्यांच्या या कादंबरीचे पु.ल. देशपांडे यांनी विशेष कौतुक केले होते.[ संदर्भ हवा ] दरम्यानच्या काळात बाबाराव मुसळे यांची 'झिंगू लुखू लुखू', 'मोहरलेला चंद्र', 'नगरभोजन' हे कथासंग्रह आणि 'पाटीलकी', 'दंश', 'स्मशानभोग'इत्यादि दहा कादंबऱ्या प्रकाशित होत राहिल्या.

पखाल कादंबरीला 1994-95चा आणि वारूळ कादंबरीला 2004-05चा हे महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार प्राप्त झाले.[ संदर्भ हवा ]

वाचक त्यांच्या लेखनशैलीला सरावलेला असतानाच 'इथे पेटली माणूस गात्रे' या कवितासंग्रहाला 'सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील' हा साहित्य पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ]

2017 सालचा प्रवरानगर लोणीचा 51 हजार रूपयांचा कै पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार त्यांच्या झळाळ कादंबरीला प्राप्त झाला.[ संदर्भ हवा ]

कादंबरी आणि कथालेखन करत असतानाच मुसळे यांचे कवितालेखनही समांतरपणे सुरू होते. त्यांच्या कविता, कथा आणि कादंबऱ्या नागर, ग्रामीण, दलित, आदिवासी असा विविध प्रवाहांना आपल्यात सामावून घेत आपल्या पद्धतीने व्यक्त होतात. आर्त ही कादंबरी तर पश्चिम बंगालमधल्या भोई समाजाच्या दामायची तीव्र संघर्षकथा आहे.[ संदर्भ हवा ]

बाबाराव मुसळे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

बाबाराव मुसळे मराठीतील अग्रगण्य साहित्यिक आहेत. त्यांच्या नावावर दहा कादंबऱ्या, तीन कथा संग्रह आणि एक कविता संग्रह आहे. शिवाय त्यांनी दोन पुस्तकांचे संपादन केले आहे.

कादंबऱ्या [ संदर्भ हवा ][संपादन]

 • झुंड -प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे (2023)
 • एक पाऊल पुढं -प्रकाशक -मॅजेस्टिक,मुंबई(2021)
 • नो नाॅट नेव्हर ।प्रकाशक -मेहता पुणे(2020)
 • द लास्ट टेस्ट ।प्रकाशक-विश्वकर्मा ,पुणे(2019)
 • झळाळ-प्रकाशक सायन ,पुणे (2017)
 • आर्त-प्रकाशक-मॅजेस्टिक मुंबई (2013)
 • दंश -प्रकाशक -कीर्ती ,औरंाबाद (2009)
 • पखाल-प्रकाशक -मेहता ,पुणे(तिसरी आवृत्लती वकरच येते)
 • पाटीलकी -प्रकाशक -अरिहंत ,पुणे
 • वारूळ-प्रकाशक-मेहता ,पुणे (2004)
 • स्मशानभोग-प्रकाशक - कीर्ती ,औरंगाबाद(2012)
 • हाल्या हाल्या दुधू दे- प्रकाशक -मेहता ,पुणे

कथासंग्रह[ संदर्भ हवा ][संपादन]

 • झुंगु लुखू लुखू-(1994)प्रकाशक-मेहता, पुणे
 • नगरभोजन-प्रकाशक -जनशक्ती वाचक चळवळ,

औरंगाबाद (2009)

 • मोहोरलेला चंद्र - मेहता,पुणे मार्फत

कवितासंग्रह[ संदर्भ हवा ][संपादन]

 • इथे पेटली माणूस गात्रे (कवितासंग्रह-काव्याग्रह प्रकाशन-जून २०११)

बाबाराव मुसळे यांच्या लेखनाची समीक्षा करणारे ग्रंथ [ संदर्भ हवा ][संपादन]

 • तृतीयरत्न आणि हाल्या हाल्या दुधू दे. (संपादक : तुषार चांदवडकर)।प्रकाशक -बजाज पब्लिकेशन्स ,अमरावती
 • बाबाराव मुसळे नावाचा माणूस आणि त्यांचे साहित्य -डा शिवाजी नागरे।प्रकाशक-अथर्व पब्लिकेशन्स ,धुळे
 • बाबाराव मुसळे :व्यक्ती आणि वा•डमय -डा सोपान सुरवसे ।प्रकाशक एज्युकेशनल पब्लिशर्स अॅंड डिस्ट्रीब्यूटर्स ,औरंगाबाद।मो
 • राजन खान आणि समकालीन कथाकार -डा मछिंद्र नागरे ।परिस पब्लिकेशन्स ,सासवड ,पुणे
 • बाबाराव मुसळेंचे कथाविश्व -डा प्रमोद गारोडे ।अनघादित्य प्रकाशन ,परतवाडा ,अमरावती

संमेलनाचे अध्यक्ष [ संदर्भ हवा ][संपादन]

पुरस्कार/मानसन्मान [ संदर्भ हवा ][संपादन]

 • 'इथे पेटली माणूस गात्रे'साठी अंकुर साहित्य संघ पुरस्कार (२०१२)
 • 'इथे पेटली माणूस गात्रे'साठी श्री. चक्रधर वाचनालय, शेवाळा (तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली) यांचा पुरस्कार (२०१२)
 • 'इथे पेटली माणूस गात्रे'साठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार-सोलापूर (२०१२)
 • ‘पखाल'ला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा वि.स. खांडेकर पुरस्कार (१९९५-९६)
 • राष्ट्रसंत भगवानबाबा युवक संघटना शेलसुरा, (तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली) यांच्याकडून समाजभूषण पुरस्कार (२०१२)
 • महदंबा जीवन गौरव पुरस्कार (२००९)
 • महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (२०१२)
 • ‘मोहरलेला चंद्र'साठी कोपरगावचा भि. ग. रोहमारे पुरस्कार (१९९२)
 • झिंगू लुखू लुखू कथासंग्रहासाठी लोकमत -कामगार साहित्य संमेलन ,सोलापूर पुरस्कार 1994
 • ‘वारूळ'ला पद्मगंधा प्रतिष्ठान (नागपूर) पुरस्कार (२००४)
 • वारूळला शब्दपंढरी ,लातूरचा पुरस्कार ।2004 ।
 • ‘वारूळ'ला ’मराठी अनुवाद परिषद’ (बुलडाणा) या संस्थेचा तुका म्हणे पुरस्कार (२००४)
 • ‘वारूळ'ला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा ह.ना. आपटे पुरस्कार (२००४)
 • ‘वारूळ'ला नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा पु.य. देशपांडे पुरस्कार (२००४)
 • वारूळ'ला लातूरचा यशवंत दाते स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार (२००४)
 • वारूळला 10 वे जनसाहित्य संमेलन पुरस्कार 2005
 • विदर्भ साहित्य संघ ,नागपूरचा नगरभोजन कथा संग्रहास चोरघडे लेखन पुरस्कार -2010/
 • नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट फौंडेशन ,अकोला । निळू फुले स्मृती पुरस्कार ।2013
 • रा ग उर्फ आप्पासॄहेब अनसिंगकर कार्यगौरव पुरस्कार 2014/तर्फे जीवन विकास शिक्षण मंडळ ,केकत उमरात ा जि वाशीम
 • सूर्यकांतादेवी पोटे साहित्यव्रती पुरस्कार ,अमरावती 2016
 • प्रवरानगर लोणी येथील कै विठ्ठलराव विखे पाटील हा 51 हजार रूपयांचा बहुप्रतिष्ठित पुरस्कार झळाळ कादंबरीला ।2018
 • हरिभाऊ प्रतिष्ठान ,वाशीमतर्फे वाशीम जिल्हा समाजभूषण पुरस्कार -2016
 • दुसरे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन,अकोला यांचा वऱ्हाडरत्न पुरस्कार 2019.
 • रा पै समर्थ स्मारक समिती नॄगपूर।विदर्भ रत्न पुरस्कार ।2019
 • डाॅ गिरीश गांधी फौ़डेशन ,नागपूर यांचा स्व मीरादेवी पिंचा स्मृती लेखन पुरस्कार(25 हजार रू )2020

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]