Jump to content

वसंतराव देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वसंत बाळकृष्ण देशपांडे

वसंतराव देशपांडे
आयुष्य
जन्म २ मे १९२० (1920-05-02)
जन्म स्थान सावळापूर, ता. मूर्तिजापूर, अकोला, ब्रिटिश भारत
मृत्यू ३० जुलै, १९८३ (वय ६३)
मृत्यू स्थान पुणे, महाराष्ट्र
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
भाषा मराठी (मातृभाषा)
पारिवारिक माहिती
आई राधाबाई बाळकृष्ण देशपांडे
संगीत साधना
गायन प्रकार हिंदुस्तानी संगीत,
मराठी नाट्यसंगीत
संगीत कारकीर्द
पेशा संगीत (गायन, वादन),
अभिनय (नाटके)
गौरव
विशेष उपाधी पंडित

डॉ. वसंतराव देशपांडे (मे २, १९२० ; मूर्तिजापूर - जुलै ३०, १९८३ ; पुणे) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते.

देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी अकोला जिल्ह्यातील, मूर्तिजापूर मध्ये एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला.[१] वयाच्या आठव्या वर्षी देशपांडे यांची क्षमता भालजी पेंढारकर यांनी हेरली आणि त्यांना 'कालिया मर्दन' (१९३५) या हिंदी चित्रपटात कृष्णाची भूमिका दिली.[२] त्यांनी संगीत विषयात पीएचडी केली होती.

देशपांडे यांनी शंकरराव सप्रे, असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ, अंजनीबाई मालपेकर, रामकृष्णबुवा वझे अशा विविध गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेतले.[३][४][५] प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण विभागात हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी अफ्रिकेचा दौरा केला. तसेच पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि तबला, संवादिनी या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. इ.स. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी गायक राहुल देशपांडे हे वसंतरावांचे नातू आहेत.

संस्था

[संपादन]

डॉ.वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात अनेक संस्था निघाल्या आहेत. त्यांतल्या काही अश्या :

 • डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशन , चिंचवड (पुणे) (अध्यक्ष डॉ. रवींद्र घांगुर्डे) : ही संस्था इ.स. १९८९ सालापासून, दरवर्षी मेच्या पहिल्या आठवड्यात संगीत महोत्सव साजरा करते. या संस्थेने आजवर अनेक गुणी कलाकारांना संधी दिली व त्यांना घडविले.

वारसा

[संपादन]

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान,[६] त्यांच्या स्मरणार्थ पुण्यात वसंतोत्सव हा वार्षिक संगीत महोत्सव आयोजित करतो. हा उत्सव जानेवारी महिन्यात तीन दिवस चालतो.[७] या महोत्सवादरम्यान, होनहार कलाकारांसाठी "वसंतोत्सव युवा पुरस्कार" आणि दिग्गज कलाकारांसाठी "वसंतोत्सव पुरस्कार" असे दोन पुरस्कार दिले जातात.[८][९]

२०११ मध्ये, देशपांडे यांच्या स्मरणार्थ भारत सरकारच्या दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने (SCZCC) नागपुरात तीन दिवसीय संगीत आणि नृत्य महोत्सव आयोजित केला होता.[१०]

देशपांडे यांच्या जीवनावर आधारित मी वसंतराव नावाचा चित्रपट १ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु कोविड-19 महामारीमुळे तो १ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला.[११]

डाॅ. वसंतराव देशपांडे यांच्यावरील पुस्तके

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]
 • वसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशन(चिंचवड) ही संस्था दरवर्षी तरुण उभरत्या गायकांना वसंतराव देशपांडे युवा पुरस्कार देते. मे २०१३ मध्ये झालेल्या २५व्या वर्षीच्या महोत्सवात नाट्यसंगीतासाठी लीलाधर चक्रदेव याला, आणि शास्त्रीय संगीतासाठी आर्या आंबेकर हिला ’डॉ. वसंतराव देशपांडे युवा पुरस्कार’ देण्यात आले. २५०० रुपये रोख, स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

संदर्भ

[संपादन]
 1. ^ The Illustrated Weekly of India, Volume 95. Bennett, Coleman & Company, Limited, at the Times of India Press. 1974. p. 31. ARATHI literature is strewn with the names of Deshastha writers. The popular classical and light musician, Dr Vasantrao Deshpande, is also from this community.
 2. ^ "Dr. Vasantrao Deshpande Hall". 2022-04-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-08-18 रोजी पाहिले.
 3. ^ Mathur, Barkha (3 July 2016). "Vidarbha has rich tradition of Hindustani classical music". The Times of India.
 4. ^ Misra, Susheela (January 1990). Some immortals of Hindustani music. ISBN 9788185151144.
 5. ^ Jeffrey Michael Grimes (2008). The Geography of Hindustani Music: The Influence of Region and Regionalism on the North Indian Classical Tradition. pp. 160–. ISBN 978-1-109-00342-0. 17 July 2013 रोजी पाहिले.
 6. ^ Pranav Kulkarni (23 December 2008). "Vasantotsav to kick off from January 9". The Indian Express. 17 July 2013 रोजी पाहिले.
 7. ^ "Celebrating the five elements of nature". Pune Mirror. 23 December 2008. 17 July 2013 रोजी पाहिले.
 8. ^ "Vasantotsav to start on Jan 18". The Times of India. 6 January 2013. 11 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2013 रोजी पाहिले.
 9. ^ "Season of Music". The Indian Express. 21 January 2012. 17 July 2013 रोजी पाहिले.
 10. ^ "Music festival in memory of Vasantrao Deshpande in Nagpur". IBN Live News. 28 July 2011. 17 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2013 रोजी पाहिले.
 11. ^ "Mee Vasantrao (2020) - IMDb". IMDb.

बाह्य दुवे

[संपादन]