कृष्ण गंगाधर दीक्षित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कृष्ण गंगाधर दीक्षित
जन्म नाव कृष्ण गंगाधर दीक्षित
टोपणनाव कवी संजीव
जन्म एप्रिल १४, १९१४
वांगी, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू फेब्रुवारी २८, १९९५
सोलापूर
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
वडील गंगाधर गोविंद दीक्षित

कृष्ण गंगाधर दीक्षित ऊर्फ कवी संजीव (एप्रिल १४, १९१४ - फेब्रुवारी २८, १९९५) हे मराठी कवी व गीतकार होते.

जीवन[संपादन]

कवी संजीवांचा जन्म एप्रिल १४, १९१४ रोजी महाराष्ट्रात सोलापुराजवळील 'वांगी' या गावी झाला. लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले संजीव त्यांच्या चुलत्यांच्या घरी वाढले. त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात झाले. पुढे कलाशिक्षणाकरता त्यांनी मुंबईच्या 'बाँबे स्कूल ऑफ आर्ट' या संस्थेत प्रवेश घेतला. तेथून १९३९ साली ते जी.डी. आर्ट पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले.
संजीव व्यवसायाने छायाचित्रकारमूर्तिकार होते. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कलाशिक्षकाची नोकरी केली. तात्यासाहेब श्रोत्रिय यांच्या संपर्कात संजीवांना काव्यशास्त्राची, वृत्तछंदांची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाच्या मेळ्यांकरता त्यांनी पुष्कळ गाणी लिहिली. १९३०-३२ च्या सुमारास 'माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना' हे संजीवांनी लिहिलेले आणि लोकप्रिय गायिका मेहबूबजान हिने गायलेले गाणे अतिशय लोकप्रिय झाले. १९३५ साली 'दिलरुबा' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९५०-६० सालांच्या दशकांत संजीवांनी मराठी चित्रपटांची गीतेही लिहिली.

कारकीर्द[संपादन]

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
दिलरुबा कवितासंग्रह १९३५
प्रियंवदा कवितासंग्रह १९६२
माणूस कवितासंग्रह १९७५
अत्तराचा फाया कवितासंग्रह १९७९
गझलगुलाब कवितासंग्रह १९८०
रंगबहार कवितासंग्रह १९८३
आघात कवितासंग्रह १९८६
देवाचिये द्वारी कवितासंग्रह १९८६

चित्रपट[संपादन]

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग
१९५६ सासर माहेर मराठी गीतरचना
१९५७ भाऊबीज मराठी गीतरचना
१९५७ चाळ माझ्या पायात मराठी गीतरचना
१९६७ पाटलाची सून मराठी गीतरचना

कृ.गं. दीक्षित यांची गाजलेली गीते[संपादन]

  • अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया
  • असा कसा खट्याळ तुझा
  • आवाज मुरलीचा आला
  • कधी शिवराय यायचे
  • खुलविते मेंदी माझा रंग
  • चाळ माझ्या पायात
  • झुळझुळे नदी ही बाई
  • तो शूरपणा आता रणात कसा नाही। इतिहास मराठ्यांचा स्मरणात कसा नाही।।
  • पडला पदर खांदा
  • वेड्या बहिणीची रे वेडी

बाह्य दुवे[संपादन]