पत्रकारिता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोजच्या दैनदिन जीवनात घडणाऱ्या घटना, काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळी घडलेली माहिती गोळा करून, त्यावर योग्य ते संपादन करून ती माहिती वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, रेडीओ, मासिके, साप्ताहिके यामाध्यमातून लोकापर्यंत पोहचवणे म्हणजे पत्रकारिता होय. आज ची पत्रकारिता आपण बघितली तर ति पूर्वीच्या पत्रकारीते पेक्षा फार बदलली आहे. आज लोकांनी या कार्याला व्यवसाय बनवून टाकला आहे. या क्षेत्रातल्या लोकांनी अस समजूत केलं आहे कि जणू माहिती देण्या पेक्षा पैसा कमावणे महत्व आहे. आणि त्यामध्ये पेड बातम्या या जास्त प्रमाणात चालवल्या जातात.