Jump to content

किर्लोस्कर संगीत मंडळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किर्लोस्कर संगीत मंडळीची स्थापना ता. ३१ ऑक्टोबर १८८० या तारखेस झाली. स्वतः बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, शंकरराव मुजुमदार, भाऊराव कोल्हटकर, बाळकोबा नाटेकर हा पहिल्या अमदानीतला नटवर्ग - नंतर केशवराव भोसले, बालगंधर्वदीनानाथ मंगेशकर. हे तिघेही नट-गायक ‘स्वदेश हितचिंतक’ व किर्लोस्कर संगीत मंडळीच्या अंकावर वाढले. हे तीन चिरस्मरणीय झालेले कलावंत म्हणजे महाराष्ट्राच्या नाट्य-नटेश्वराचे त्रि-नेत्रच होत.

या कलावंतांनी किर्लोस्कर संगीत मंडळीली या संस्थेतर्फे अनेक चांगली नाटके रंगभूमीवर आणली. नाट्यक्षेत्रात किर्लोस्करांनी नवेनवे प्रयोग केले. पूर्वी विष्णूदासी परंपरेने नाटकातील प्रयोग होत असत. पण ही पद्धत बदलून त्यांनी सूत्रधार, परिपार्श्वक आणि नटी ही संस्कृत नाटकाची परंपरा मराठी रंगभूमीवर आणली. तसेच नाटकातल्या दर्जेदार संगीतामुळे उच्चवर्गाचा ओढा नाटकाकडे वाढला. त्यावेळी नाटक व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना समाजात चांगले स्थान नसे पण दर्जेदार नाटके देऊन समाजाचा हा समज बदलावा यासाठी किर्लोस्करांनी प्रयत्न केले.