Jump to content

शंकर केशव कानेटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गिरीश या पानावरून पुनर्निर्देशित)
कवी गिरीश
जन्म नाव शंकर केशव कानेटकर
टोपणनाव गिरीश
जन्म ऑक्टोबर २८, इ.स. १८९३
सातारा
मृत्यू डिसेंबर ४, इ.स. १९७३
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
वडील केशव कानेटकर
अपत्ये नाटककार वसंत कानेटकर व मुंबई आकाशवाणीवरील भूतपूर्व अधिकारी आणि गायक मधुसूदन कानेटकर

शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश (ऑक्टोबर २८, इ.स. १८९३:सातारा, महाराष्ट्र, भारत - डिसेंबर ४, इ.स. १९७३) हे मराठी कवी होते. साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत.[१] कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते.

कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनची प्रत संपादित केली.

लेखन

[संपादन]
  • कांचनगंगा (काव्यसंग्रह)
  • चंद्रलेखा (काव्यसंग्रह)
  • फलभार (काव्यसंग्रह)
  • बालगीत (काव्यसंग्रह)
  • सोनेरी चांदणे (काव्यसंग्रह)
  • कवी यशवंत आणि गिरीश यांच्या एकत्रित कवितांचे ‘वीणाझंकार’ व ‘यशो-गौरी’ या नावांचे दोन कवितासंग्रह आहेत.[२]
  • माधव ज्यूलियन यांचे ‘स्वप्नलहरी’ तसेच रेव्हरंड ना.वा. टिळक यांचे ‘ख्रिस्तायन’ या ग्रंथांचे संपादन.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "फलटणवासीय कल्याणनिधी संकेतस्थळ". 2013-09-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०११-०३-१७ रोजी पाहिले.
  2. ^ संजय वझरेकर (२८ ऑक्टोबर २०१३). "नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.