"एकनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ८७: | ओळ ८७: | ||
* [http://www.aathavanitli-gani.com/Santvani/Sant_Ekanath एकनाथांची ’आठवणीतली गाणी’ या संकेतस्थळावरची गीते] |
* [http://www.aathavanitli-gani.com/Santvani/Sant_Ekanath एकनाथांची ’आठवणीतली गाणी’ या संकेतस्थळावरची गीते] |
||
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Sant%20Details/Ekanath.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर संत एकनाथ यांचे अभंग]...'''.हा दुवा चालत नाही.''' |
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Sant%20Details/Ekanath.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर संत एकनाथ यांचे अभंग]...'''.हा दुवा चालत नाही.''' |
||
* [http://www.aathavanitli-gani.com/Santvani/Sant_Ekanath ’आठवणीतली-गाणी.कॉम’या संकेतस्थळावर एकनाथ यांचे काव्य] |
|||
* [https://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=2&id=366 संत एकनाथ महाराज] |
* [https://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=2&id=366 संत एकनाथ महाराज] |
||
* [http://satsangdhara.net/ebh/e_bh.htm एकनाथी भागवत] |
* [http://satsangdhara.net/ebh/e_bh.htm एकनाथी भागवत] |
१७:४३, ११ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
एकनाथ | |
---|---|
चित्र:Eknath.jpg एकनाथ | |
जन्म |
इ.स. १५३३ पैठण, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र |
मृत्यू | इ.स. १५९९ |
भाषा | मराठी |
वडील | सूर्यनारायण |
आई | रुक्मिणी |
पत्नी | गिरिजा |
अपत्ये | गोदावरी, गंगा व हरी |
जीवन
संत एकनाथ(१५३३-१६००) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला.
शांतिब्रह्म, ‘संत’पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ’ज्ञानाचा एका’ या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ. आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल.
एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव.
एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चकपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती.
एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले, असे म्हणतात. आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रेय यांचे दर्शन यांमुळे नाथांचे जीवन धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.
नाथांनी एका सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित या नावाने प्रख्यात झाला. तो परंपरेचा अतिशय अभिमानी होता. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.
कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत.
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज कर्तव्यच्युत झालेला होता. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.
अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे (व्यासकृत) काव्य अतिशय प्रासादिक आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय होते. नाथांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ.स. १६००) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य ष्ष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.
गुरुपरंपरा
एकनाथांची गुरुपरंपरा :
- नारायण (विष्णू)
- ब्रह्मदेव
- अत्री ऋषी
- दत्तात्रेय
- जनार्दनस्वामी
- एकनाथ
कार्य व लेखन
- १. एकनाथी भागवत: भागवत पुराणातील अकराव्या स्कंधावर ओवीबद्ध मराठी टीका
- २. समाजाच्या जागृतीसाठी अभंग व भारुडे यांची रचना.
- ३. ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण (ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ २५० वर्षांनंतर) ज्ञानेश्वरी च्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके १५०६ मध्ये पूर्ण केले.
- ४.रुक्मिणीस्वयंवर
- ५. भावार्थ रामायण (४० हजार ओव्या)हिंदीसह अनेक भाषांत भाषांतरे)
- ६. संत ज्ञानेश्वरांचे आळंदी येथील समाधिस्थळाचा शोध
एकनाथांच्या काव्यरचनेचा नमुना
येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥ महाराजाचे राऊळी । वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥ लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥ एका जनार्दनी नाम । पाहता मिळे आत्माराम ॥४॥
संदर्भ
एकनाथ, त्यांचे कार्य आणि त्यांची ग्रंथरचना यांवर अनेक पुस्तके लिहिली गेली, आणि अजूनही लिहिली जात असतात. त्यांतली काही ही :
- एकनाथ गाथा (संपादन साखरे महाराज)
- भागवतोत्तम संत एकनाथ - (शंकर दामोदर पेंडसे)
- संत एकनाथांचा धर्मविचार (डॉ. सुरेखा आडगावकर)
- संतश्रेष्ठ एकनाथ (दीपक भागवत)
बाह्य दुवे
- एकनाथ महाराज
- मराठीचे मानदंड संत एकनाथ महाराज
- एकनाथांची ’आठवणीतली गाणी’ या संकेतस्थळावरची गीते
- 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर संत एकनाथ यांचे अभंग....हा दुवा चालत नाही.
- ’आठवणीतली-गाणी.कॉम’या संकेतस्थळावर एकनाथ यांचे काव्य
- संत एकनाथ महाराज
- एकनाथी भागवत
- [१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |