वैजापूर
वैजापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे.एका दंतकथेनुसार एक राजकुमारीने संत वायाजा मुहममद ह्यांच्या थडग्यामध्ये आराम करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता.त्या संतच्या नावावरून गावाचे नाव बैजापूर वा वैजापूर देण्यात आले . वैजापूर हे छत्रपती संभाजीनगर शहरापासून अदमासे ७३ कि.मी. अंतरावर नारंगी-सारंगी नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.वैजापूर शहर नारंगी नदिकिनारी वसलेले आहे .वैजापूर डेक्कन पठाराच्या पश्चिम घाटावर स्मुद्रसापातीपासून ५१४ मी.(१६६६फुट) लांब आहे .वैजापूर शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी नारंगी-सारंगी जंक्शन आहे.वैजापूर शहराच्या पश्चिमेला नाशिक जिल्हा आहे. तर उत्तरेस कन्नड तालुका आहे. पूर्वेस गंगापूर तालुका आहे.आणि दक्षिणेस अहमदनगर जिल्हा आहे.
भौगोलिक[संपादन]
- अक्षांश १९.९२° उ.
- रेखांश ७४.७३° पू.
- समुद्रसपाटीपासून साधारण उंची ५१४ मी. (१६८६ फूट)
== सामाजिक == छत्रपती संभाजीनगर २००१च्या जनगणनेनुसार वैजापुराची एकूण लोकसंख्या ३७,००२ आहे. तिचे विभाजन खालील प्रमाणे:
- पुरुष: ५२%
- स्त्रिया: ४८%
- साक्षरता: ७०% (राष्ट्रीय सर्वसाधारण ५९.५%)
- पुरुष साक्षरता: ७७%
- स्त्रीसाक्षरता: ६२%
वैजापूर तालुकात १६४ गाव आहे.त्यातील शिऊर हे गाव भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठे आहे. वैजापूर शहराला एकूण सात मार्ग जोडतात. छत्रपती संभाजीनगर - शिऊर- वैजापूर, गंगापूर-वैजापूर, येवला- वैजापूर, श्रीरामपूर-वैजापूर, चाळीसगाव- कन्नड-वैजापूर, कोपरगाव-वैजापूर या मार्गाला जोडलेले आहे. तसेच हे शहर औरंगाबाद-मुंबई राज्य महामार्गावर वसलेले आहे, प्रसिद्ध धार्मिक ठिकाण साईबाबांची 'शिर्डी' हे वैजापूरपासून ४० कि.मी. अंतरावर आहे.वैजापूर तालुक्यात रोटेगाव येथे रेल्वे स्टेशन आहे.हे रेल्वे स्टेशन भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड विभागात सिकंदराबाद मनमाड विभागात रेल्वे स्टेशन आहे.
वैजापूरमधील शिक्षण संस्था[संपादन]
- Late Bharat patil madhyamik vidyalay chandgaon.
- रामेश्वर माध्यमिक विद्यालय बिलोनी
- विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर तालुकात आहे
- संत बहिणाबाई कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय
- मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
- जे के.जाधव आर्ट कॉमर्सआणि सायन्स महाविद्यालय
- मनुबाई माध्यमिक विद्यालय,मनेगाव
- Raje sambhaji college agoor
- संजीवनी जूनियर कॉलेज वैजापुर
- भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भटाणा Udise 27190801902
- swami vivekand vidhyalya garaj