Jump to content

चर्चा:एकनाथ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१. देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यावरचे किल्लेदार जनार्दनस्वामी हे संत एकनाथ महाराजांचे गुरु होते. एकदा गुरू साधनेत ध्यान लावून बसलेले असतांना अचानक शत्रूने किल्ल्यावर स्वारी केली. गुरूंच्या सेवेत असणार्‍या एकनाथ महाराजांना कोणतेही शस्त्र अथवा युद्धकला येत नसतांनाही गुरूंचे कार्य म्हणून हातात तलवार घेऊन त्यांनी युद्ध केले आणि गुरुकृपेने शत्रूला पळवून लावले. गुरूंनी ध्यानात राहूनही शिष्याकडून युद्ध करवून घेतले.[]

एकनाथांच्या निधनाचा दिवस

[संपादन]

"फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (इ.स.१५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला."..इति MvKulkarni(19-2-2011)
इसवी सन आणि शके यांच्या आकड्यांची वजाबाकी एरवी ७८ येते. परंतु, जेव्हा पौष महिन्याच्या सुरुवातीला जानेवारी महिना येतो आणि इसवी सनाचे नवीन वर्ष सुरू होते, तेव्हा हिंदू पंचांगातील शक दाखवणारा आकडा बदलेला नसतो. त्यामुळे पौष महिन्याचे शेवटचे २-३ आठवडे, आणि त्या पुढील माघ-फाल्गुन महिन्यांच्या ६० दिवसांत इसवी सनाच्या आकड्यातून शके वजा केले तर वजाबाकी ७९ येते.
एकनाथांचे निधन फाल्गुन महिन्यात शके १५२१ला झाले,तेव्हा इसवी सन १५२१+ ७९ =१६०० असणार, १५९९ नाही.
चुकीची दुरुस्ती केली आहे. ....J (चर्चा) २२:१४, १३ जून २०१३ (IST)[reply]

  1. ^ सनातन डॉट ऑर्ग