मुक्तेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुक्तेश्वर म्हणजे चिंतामणीसुत मुदगल. पंडिती परंपरेतील कवींमध्ये प्रथम मुक्तेश्वरांचा विचार करावा लागतो. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात व १७ व्या शतकाच्या पूर्वार्धातील कलाकवी. संत एकनाथ यांच्या मुलीचा मुलगा, अर्थात एकनाथांचा नातू होय. यांचा जन्म, मृत्यू व गुरुपरंपरेबाबत संशोधकांत मतभिन्नता आहे. मुक्तेश्वर हे त्यांच्या आराध्यदैवतचे नाव असून त्यालाच तो लीला विश्वंभर संबोधतो. मुक्तेश्वरांचे गोत्र अत्रि आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी ही कुलदेवतासोनारीचा भैरव हे कुलदैवत आहेत.

मुक्तेश्वरांनी विविध प्रकारच्या रचना केल्या आहेत. संत आणि पंडित यांच्यातील दुवा म्हणून मुक्तेश्वरांचे लेखन उल्लेखनीय आहे.

ग्रंथ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]