Jump to content

"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३९: ओळ ३९:

== जीवन ==
== जीवन ==
गडकऱ्यांचा जन्म [[मे २६]], [[इ.स. १८८५]] रोजी तत्कालीन [[मुंबई प्रांत|मुंबई प्रांतातील]] [[नवसारी]] येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांचे वडील निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकऱ्यांचे कुटुंब [[पुणे|पुण्यात]] स्थायिक झाले. गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ात झाले.
गडकरींचा जन्म [[मे २६]], [[इ.स. १८८५]] रोजी तत्कालीन [[मुंबई प्रांत|मुंबई प्रांतातील]] [[नवसारी]] येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांचे वडील निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकरींचे कुटुंब [[पुणे|पुण्यात]] स्थायिक झाले. गडकर्‍यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ात झाले.

महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी '[[किर्लोस्कर नाटक मंडळी]]'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या ''रंगभूमी'' नावाच्या मासिकातून, तसेच [[शिवराम महादेव परांजपे]] यांच्या [[काळ (वृत्तपत्र)|काळ]] वृत्तपत्रातून व [[हरीभाऊ आपटे|हरीभाऊ आपट्यांच्या]] 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविताा व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.

==नाटके==
==नाटके==
गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत.त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.
गडकर्‍यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकर्‍यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकर्‍यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.

* [[एकच प्याला]]
* [[एकच प्याला]]
ओळ ५५: ओळ ५५:

==काव्य==
==काव्य==
[[वाग्वैजयंती]] हा गडकऱ्यांचा एकमेव [[काव्यसंग्रह]]. त्यातील कवितांचे वैविध्य लक्ष वेधून घेणारे आहे. [[मुक्तछंद|मुक्तच्‍छंदापासून]] ते [[छंदबद्ध कविता|छंदबद्ध कवितेपर्यंत]], आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसऱ्या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करण्याची त्यांची पद्धत वाचकाच्या मनात कवितेला अधिक खोलवर नेते. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती 'राजहंस माझा निजला' ह्या कवितेत गडकऱ्यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितालेखनासाठी गडकऱ्यांनी [[गोविंदाग्रज]] हे टोपण नाव घेतले होते.
[[वाग्वैजयंती]] हा गडकरींचा एकमेव [[काव्यसंग्रह]]. त्यातील कवितांचे वैविध्य लक्ष वेधून घेणारे आहे. [[मुक्तछंद|मुक्तच्‍छंदापासून]] ते [[छंदबद्ध कविता|छंदबद्ध कवितेपर्यंत]], आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसर्‍या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करण्याची त्यांची पद्धत वाचकाच्या मनात कवितेला अधिक खोलवर नेते. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती 'राजहंस माझा निजला' ह्या कवितेत गडकर्‍यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितालेखनासाठी गडकर्‍यांनी [[गोविंदाग्रज]] हे टोपण नाव घेतले होते.

==विनोदी लेखन==
==विनोदी लेखन==
गडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. [[नाट्यछटा|नाट्यछटेपासून]] ते [[संवाद]] आणि [[विडंबन|विडंबनापर्यंत]] विविध प्रकारांतून गडकऱ्यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकऱ्यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.
गडकर्‍यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. [[नाट्यछटा|नाट्यछटेपासून]] ते [[संवाद]] आणि [[विडंबन|विडंबनापर्यंत]] विविध प्रकारांतून गडकर्‍यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकर्‍यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.

==अन्य साहित्य==
==अन्य साहित्य==
नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.
नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकर्‍यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकर्‍यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.

याशिवाय, गडकऱ्यांनी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत. राम गणेश गडकरी यांचे अन्य साहित्य :-
याशिवाय, गडकर्‍यांनी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत. राम गणेश गडकरी यांचे अन्य साहित्य :-

* [[चिमुकली इसापनीती]]
* [[चिमुकली इसापनीती]]
ओळ ७४: ओळ ७४:
* गडकरी करंडक स्पर्धा : [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद|अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची]] पिंपरी-चिंचवड शाखा ही स्पर्धा भरवते. या करंडकासाठीची १५वी स्पर्धा चिंचवड येथे २० ते २२ जानेवारी २०१४ या दिवसांत होणार आहे.

* गडकरी नाट्यलेखन स्पर्धा : या स्पर्धा देवयानी प्रकाशन, [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]] (नागपूर शाखा), अंकुर वाचनालय, चांदूर (अकोला जिल्हा), [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]] (मुंबई शाखा) वगैरे संस्था घेतात.

==सन्मान==
राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ त्यांचा एक अर्धपुतळा पुण्याच्या संभाजी बागेत उभा करण्यात आला. २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर ३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेड नावाच्या एका उपद्व्यापी संघटनेच्या गुंडांनी पुतळ्याची मोडतोड करून तो मुठा नदीत फेकला. या गुन्ह्यासाठी प्रदीप भानुदास कणसे (वय २५, रा. रामोजी रानोजी बिल्डिंग, नर्‍हे आंबेगाव), हर्षवर्धन महादेव मगदूम (वय २३, रा. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट, बालाजीनगर), स्वप्निल सूर्यकांत काळे (वय २४, रा. अलंकापूरम सोसायटी, वडमुखवाडी, चर्‍होली, आळंदी), गणेश देविदास कारले (वय २६, रा. चांदुस, रौंदळ वस्ती, ता. खेड) यांना अटक करण्यात आली.

== हेही पाहा ==
== हेही पाहा ==
ओळ ८०: ओळ ८३:
== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* [http://ramganeshgadkari.com/egadlari/ राम गणेश गडकरी समग्र साहित्याचे संकेतस्थळ]
* [http://ramganeshgadkari.com/egadlari/ राम गणेश गडकरी समग्र साहित्याचे संकेतस्थळ]
* {{Webarchivis | url=https://archive.is/20100329124559/www.khapre.org/portal/url/mr/etc/sahitya/gaani/gadkari/index(%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE.%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6.%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80).aspx | archive-is=20100329124559/www.khapre.org/portal/url/mr/etc/sahitya/gaani/gadkari/index(%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE.%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6.%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80).aspx | text=राम गणेश गडकऱ्यांच्या कविता}} (मराठी मजकूर)
* {{Webarchivis | url=https://archive.is/20100329124559/www.khapre.org/portal/url/mr/etc/sahitya/gaani/gadkari/index(%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE.%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6.%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80).aspx | archive-is=20100329124559/www.khapre.org/portal/url/mr/etc/sahitya/gaani/gadkari/index(%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE.%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6.%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80).aspx | text=राम गणेश गडकर्‍यांच्या कविता}} (मराठी मजकूर)
* [http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=49774:2010-02-21-19-29-51&catid=47:2009-07-15-04-02-02&Itemid=58 लोकसत्ता - 'स्मरण राम गणेशांचे'; ले.: श्रीराम रानडे] (मराठी मजकूर)

२२:५२, १५ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

राम गणेश गडकरी
जन्म नाव राम गणेश गडकरी
टोपणनाव गोविंदाग्रज, बाळकराम
जन्म मे २६, इ.स. १८८५
नवसारी, (गुजरात)
मृत्यू जानेवारी २३, इ.स. १९१९
सावनेर
कार्यक्षेत्र नाटककार, कवी, लेखक
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, नाटके, विनोदी कथा
प्रसिद्ध साहित्यकृती नाटके:' एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन
वडील गणेश गडकरी
पत्नी रमाबाई

राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते.

विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्‍नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत.

नागपूरला ’राम गणेश गडकरी’ या नावाचा एक साखर कारखाना आहे.

जीवन

गडकरींचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी तत्कालीन मुंबई प्रांतातील नवसारी येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांचे वडील निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकर्‍यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.

महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविताा व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.

नाटके

गडकर्‍यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकर्‍यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकर्‍यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.

काव्य

वाग्वैजयंती हा गडकरींचा एकमेव काव्यसंग्रह. त्यातील कवितांचे वैविध्य लक्ष वेधून घेणारे आहे. मुक्तच्‍छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसर्‍या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करण्याची त्यांची पद्धत वाचकाच्या मनात कवितेला अधिक खोलवर नेते. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती 'राजहंस माझा निजला' ह्या कवितेत गडकर्‍यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितालेखनासाठी गडकर्‍यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव घेतले होते.

विनोदी लेखन

गडकर्‍यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकर्‍यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकर्‍यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.

अन्य साहित्य

नाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या बाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकर्‍यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकर्‍यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.

याशिवाय, गडकर्‍यांनी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत. राम गणेश गडकरी यांचे अन्य साहित्य  :-

स्पर्धा

राम गणेश गडकरी यांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांतल्या काही या :-

सन्मान

राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ त्यांचा एक अर्धपुतळा पुण्याच्या संभाजी बागेत उभा करण्यात आला. २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर ३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेड नावाच्या एका उपद्व्यापी संघटनेच्या गुंडांनी पुतळ्याची मोडतोड करून तो मुठा नदीत फेकला. या गुन्ह्यासाठी प्रदीप भानुदास कणसे (वय २५, रा. रामोजी रानोजी बिल्डिंग, नर्‍हे आंबेगाव), हर्षवर्धन महादेव मगदूम (वय २३, रा. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट, बालाजीनगर), स्वप्निल सूर्यकांत काळे (वय २४, रा. अलंकापूरम सोसायटी, वडमुखवाडी, चर्‍होली, आळंदी), गणेश देविदास कारले (वय २६, रा. चांदुस, रौंदळ वस्ती, ता. खेड) यांना अटक करण्यात आली.

हेही पाहा

बाह्य दुवे