संवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संवाद म्हणजे आदान - प्रदान, देवाण - घेवाण, संप्रेषण, संज्ञापन इत्यादी. थोडक्यात संवाद म्हणजे आपल्या मतांचा केलेला आदान - प्रदान किंवा देवाण - घेवाण होय.

"एका व्यक्तीद्वारे इतर व्यक्तीकडे अथवा व्यक्ती समूहा कडे चिन्हाद्वारे माहितीचे प्रेषण किंवा प्रक्षेपण होय."

"संदेशा द्वारे चालणारी आंतरक्रिया म्हणजे संवाद".

संवाद ही संस्कृतीशी संबधित प्रक्रिया आहे. याचाच अर्थ ज्या व्यक्तीला संवाद साधायचा आहे. तिची आणि ज्या व्यक्तीशी संवाद साधायचा आहे या दोघांचीही संस्कृतिक पार्श्वभूमी एकच असल्यास संवाद अधिक प्रभावी होतो.

ज्यावेळी विविध प्रसार माध्यमांचा वापर करून संवाद केला जातो व तो संदेश खूप लोकापर्यंत पोहोचविला जातो त्यास जनसंज्ञापन म्हणतात.मानवी जीवनामध्ये संवादाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. संवादाला मानवी जीवनामध्ये फार महत्त्वाचे स्यान आहे. संवामुळे विचारांची देवाण घेवाण होते.

संवाद हा परस्परांमध्ये होणे खूपच गरजेचा असतो. कारण कोणताही मनुष्य हा एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय राहूच शकत नाही. [१]

=संवादाचे प्रकार[संपादन]

१) आत्म संवाद - प्रत्येक व्यक्ती दर क्षणाला स्वतःशी एक संवाद साधत असते, म्हणजे प्रत्येक क्षणी त्या-त्या प्रसंगानुसार आपल्या मनात विचार येत असतात. आणि तो आपल्या  विवेक बुद्धीच्या जोरावर त्या-त्या प्रसंगाचे मूल्यमापन करीत असतो, आणि त्या नुसार तो निर्णय घेत असतो. स्वतालाच प्रश्न विचारणे, स्वत उत्तर देणे म्हणजे स्वतःलाच संप्रेषकाची भूमिका आणि श्रोत्याची भूमिका दोन्ही असते. या आत्मसंवादाच्या प्रक्रियेत एक आणि केवळ एकच व्यक्ती सामील होते.
२)द्विव्यक्तीय संवाद - दोन व्यक्तींमधील संवाद यात सहसा तिसरा व्यक्ती सामील नसतो. हा संवाद व्यक्तिगत,थेट आणि निकटता निर्माण करणारा असतो. ज्यात शब्द,हातवारे ए.चा वाव असतो.या संवादामुळे व्यक्तीचे मन वळवणे,तसेच एखाद्यावर प्रभाव निर्माण करणे शक्य होते.या संवादामध्ये मौखिक आणि अमौखिक संवाद शक्य असतो. तसेच तात्काळ प्रतिसादही मिळतो.
३) समूह संवाद - जेव्हा दोन पेक्षा अधिक व्यक्तींचा समूह तयार होतो, यात समूहाच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त संख्या ठरत असते. सदर संवाद हा नियंत्रित वातावरणात पार पडते.द्वीव्य्क्तीय संवादाच्या वैशिष्ट्यांचे कमी प्रमाणात असलेले अस्तित्व हे समूह संवादाच्या ठळक वैशिष्ट्य असते.
४) जनसंवाद - समूह संवादाचे रूप म्हणजे जनसंवाद. यामध्ये संप्रेषक आणि श्रोता यांचा थेट संवाद प्रस्थापित न होता तो एखाद्या जनसंवाद माध्यमाद्वारे प्रस्थापित होतो. हा थेट संवाद नसल्यामुळे संप्रेषक आणि श्रोता एकमेकांना ओळख्त नाहीत, त्यामुळे संवाद म्हणावा तसा प्रभाव श्रोत्यांवर होत नाही आणि  श्रोत्यांची प्रतिक्रिया देखील संप्रेषकाकडे उशिरा पोह्चते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "संवाद कौशल्य". https://maharashtratimes.indiatimes.com. ११ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)