नामदेव धोंडो महानोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ना.धों. महानोर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
ना.धों. महानोर
जन्म १६ सप्टेंबर १९४२
पळसखेड (औरंगाबाद जिल्हा)

नामदेव धोंडो महानोर (जन्म : पळसखेड-कन्नड तालुका-औरंगाबाद जिल्हा, १६ सप्टेंबर १९४२) हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर २४ मार्च २०१४ रोजी सुरू झालेल्या दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

जीवन[संपादन]

महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले[ संदर्भ हवा ]. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले[ संदर्भ हवा ].मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून प्रसिद्ध आहेत.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अजिंठा (कवितासंग्रह) दीर्घ कविता पॉप्युलर प्रकाशन १९८४
कापूस खोडवा) शेतीविषयक
गंगा वाहू दे निर्मळ कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
जगाला प्रेम अर्पावे कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
त्या आठवणींचा झोका साकेत प्रकाशन
दिवेलागणीची वेळ कविता संग्रह साकेत प्रकाशन
पळसखेडची गाणी लोकगीते पॉप्युलर प्रकाशन
पक्षांचे लक्ष थवे पॉप्युलर प्रकाशन
पानझड पॉप्युलर प्रकाशन
पावसाळी कविता कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
यशवंतराव चव्हाण साकेत प्रकाशन
रानातल्या कविता कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
शरद पवार आणि मी साकेत प्रकाशन
शेती, आत्मनाश व संजीवन शेतीविषयक साकेत प्रकाशन

नामदेव धोंडो महानोर हे गीतकार असलेले चित्रपट[संपादन]

चित्रपट वर्ष (इ.स.)
अबोली इ.स.१९९५
एक होता विदूषक इ.स.१९९२
जैत रे जैत इ.स.१९७७
दोघी इ.स.१९९५
मुक्ता इ.स.१९९४
सर्जा इ.स.१९८७

राजकीय कारकीर्द[संपादन]

महानोर हे १९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे नियुक्त सदस्य झाले.

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.