Jump to content

महाराष्ट्र विधान परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Consell Legislatiu de Maharashtra; महाराष्ट्र विधान परिषद; మహారాష్ట్ర శాసనమండలి; মহারাষ্ট্র বিধান পরিষদ; Maharashtra Legislative Council; マハーラーシュトラ州議会上院; המועצה המחוקקת של מהאראשטרה; महाराष्ट्र विधान परिषद; upper house legislature of Indian state of Maharashtra; महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह; בית עליון בבית מחוקקים מדינתי; మహారాష్ట్ర శాసనవ్యవస్థలో ఎగువసభ; マハーラーシュトラ州上院
महाराष्ट्र विधान परिषद 
महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह
माध्यमे अपभारण करा
प्रकार
ह्याचा भाग
  • महाराष्ट्र विधानमंडळ
स्थानमहाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र भाग
भाग
  • Member of Maharashtra Legislative Council
अधिकृत संकेतस्थळ
Map१८° ५५′ ३३.९१″ N, ७२° ४९′ २४.७७″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

महाराष्ट्र विधान परिषद हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत ७८ सदस्य आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ६ घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात असून तेथे विधान परिषद अस्तित्वात आहेत. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.[] राज्यघटनेच्या कलम १६९ (१) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास भारतीय संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे राज्यघटनेने निश्चित केलेले नाही. कलम १७१ नुसार विधान परिषदेत किमान ४० सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत (विधानसभेच्या तुलनेत).[]

विधानपरिषदेबद्दल माहिती

[संपादन]

घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सहा घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.

विधानपरिषदेची रचना

[संपादन]

१९५६ च्या ७ व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या १/३ पेक्षा जास्त नसावी आणि ४० पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात ७८ इतकी सदस्य संख्या आहे.[] घटना कलम क्र. १७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात.

विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी

[संपादन]

रचना :
१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.
१/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
१/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
१/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.[]
१/६ राज्यपालाकडून सदस्य नामनिदेशित केले जातात, यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.

सदस्यांची पात्रता

[संपादन]
  1. तो भारताचा नागरिक असावा.
  2. त्याच्या वयाची ३० वर्ष पूर्ण झालेली असावी.[]
  3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल

[संपादन]

सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष इतका असतो.

विधानपरिषदेचा कार्यकाल

[संपादन]

विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.[]

गणसंख्या

[संपादन]

१/१० इतकी गणसंख्या असतो.

अधिवेशन

[संपादन]

दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती

[संपादन]

विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसऱ्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.[]

मतदारसंघ आणि सदस्य (७८)

[संपादन]

महाराष्ट्र विधान परिषदेचे अलीकडील सदस्य खालीलप्रमाणे आहेत[]

विधानसभेच्या सदस्यांनी निवडलेले (३०)

[संपादन]
क्र. आमदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
विधानसभेच्या सदस्यांनी निवडलेले
प्रवीण दरेकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ जुलै २०२२ ७ जुलै २०२८
राम शंकरराव शिंदे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ जुलै २०२२ ७ जुलै २०२८
श्रीकांत भारतीय भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ जुलै २०२२ ७ जुलै २०२८
उमा खापरे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ जुलै २०२२ ७ जुलै २०२८
प्रसाद लाड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ जुलै २०२२ ७ जुलै २०२८
आमश्या फुलजी पाडवी शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ जुलै २०२२ ७ जुलै २०२८ २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राजीनामा (महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले)
चंद्रकांत रघुवंशी शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी २३ नोव्हेंबर २०२४ ते ४ जुलै २०२८ च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ जुलै २०२२ ७ जुलै २०२८
सचिन अहिर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ८ जुलै २०२२ ७ जुलै २०२८
भाई जगताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ८ जुलै २०२२ ७ जुलै २०२८
१० एकनाथ गणपत खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ८ जुलै २०२२ ७ जुलै २०२८
११ पंकजा गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २८ जुलै २०२४ २७ जुलै २०३०
१२ योगेश कुंडलिक टिळेकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २८ जुलै २०२४ २७ जुलै २०३०
१३ परिणय रमेश फुके भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २८ जुलै २०२४ २७ जुलै २०३०
१४ अमित गणपत गोरखे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २८ जुलै २०२४ २७ जुलै २०३०
१५ सदाभाऊ खोत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २८ जुलै २०२४ २७ जुलै २०३०
१६ प्रज्ञा राजीव सातव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २८ जुलै २०२४ २७ जुलै २०३० १५ डिसेंबर २०२५ रोजी राजीनामा (भारतीय जनता पक्षात प्रवेश)
प्रज्ञा राजीव सातव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १५ डिसेंबर २०२५ ते २७ जुलै २०३० च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड (पक्षबदल करून पुन्हा निवडून आल्या)
१७ कृपाल बाळाजी तुमाने शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी २८ जुलै २०२४ २७ जुलै २०३०
१८ भावना पुंडलिकराव गवळी शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी २८ जुलै २०२४ २७ जुलै २०३०
१९ शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २८ जुलै २०२४ २७ जुलै २०३०
२० राजेश उत्तम विटेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २८ जुलै २०२४ २७ जुलै २०३० २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राजीनामा (महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले)
संजय विनायक खोडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २३ नोव्हेंबर २०२४ ते २७ जुलै २०३० च्या उर्वरीत शेष काळासाठी पोटनिवडणूकीद्वारे निवड
२१ मिलिंद नार्वेकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २८ जुलै २०२४ २७ जुलै २०३०
२२ प्रमोद जठार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १४ मे २०२६ १३ मे २०३२
२३ सुनील कर्जतकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १४ मे २०२६ १३ मे २०३२
२४ संजय भेंडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १४ मे २०२६ १३ मे २०३२
२५ माधवी नाईक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १४ मे २०२६ १३ मे २०३२
२६ विवेक कोल्हे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १४ मे २०२६ १३ मे २०३२
२७ ओमप्रकाश बाबाराव बच्चू कडू शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी १४ मे २०२६ १३ मे २०३२
२८ डॉ. नीलम दिवाकर गोऱ्हे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी १४ मे २०२६ १३ मे २०३२
२९ झीशान झियाउद्दीन सिद्दिकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १४ मे २०२६ १३ मे २०३२
३० अंबादास एकनाथराव दानवे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १४ मे २०२६ १३ मे २०३२

स्थानिक प्राधिकरणांच्या मतदारसंघातून निवडून आलेले (२२)

[संपादन]
क्र. मतदारसंघ आमदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
स्थानिक प्राधिकरणांच्या मतदारसंघातून निवडून आलेले
मुंबई I सुनील शिंदे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २ जानेवारी २०२२ १ जानेवारी २०२८
मुंबई II राजहंस धनंजय सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २ जानेवारी २०२२ १ जानेवारी २०२८
धुळे-नंदूरबार अमरीश रसिकलाल पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २ जानेवारी २०२२ १ जानेवारी २०२८
नागपूर चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २ जानेवारी २०२२ १ जानेवारी २०२८ २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राजीनामा (महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले)
२३ नोव्हेंबर २०२४ पासून रिक्त
अकोला-वाशिम-बुलढाणा वसंत खंडेलवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २ जानेवारी २०२२ १ जानेवारी २०२८
कोल्हापूर सतेज ज्ञानदेवराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २ जानेवारी २०२२ १ जानेवारी २०२८
औरंगाबाद-जालना २९ ऑगस्ट २०२५ पासून रिक्त (जागेचा कार्यकाळ संपला व स्थानिक प्राधिकरणांच्या निवडणूका प्रलंबित असल्याने जोवर जिल्यातील सर्व स्थानिक प्राधिकरणांच्या निवडणूका होत नाहीत तोपर्यंत विधान परिषदेची निवडणूक होऊ शकत नाही)
उस्मानाबाद-लातूर-बीड २२ जून २०२४ पासून रिक्त (जागेचा कार्यकाळ संपला व स्थानिक प्राधिकरणांच्या निवडणूका प्रलंबित असल्याने जोवर जिल्यांतील सर्व स्थानिक प्राधिकरणांच्या निवडणूका होत नाहीत तोपर्यंत विधान परिषदेची निवडणूक होऊ शकत नाही)
अमरावती
१० वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
११ नाशिक
१२ परभणी-हिंगोली
१३ रायगड-रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग १ जून २०२४ पासून रिक्त (जागेचा कार्यकाळ संपला व स्थानिक प्राधिकरणांच्या निवडणूका प्रलंबित असल्याने जोवर जिल्यातील सर्व स्थानिक प्राधिकरणांच्या निवडणूका होत नाहीत तोपर्यंत विधान परिषदेची निवडणूक होऊ शकत नाही)
१४ जळगाव ६ डिसेंबर २०२२ पासून रिक्त (जागेचा कार्यकाळ संपला व स्थानिक प्राधिकरणांच्या निवडणूका प्रलंबित असल्याने जोवर जिल्यांतील सर्व स्थानिक प्राधिकरणांच्या निवडणूका होत नाहीत तोपर्यंत विधान परिषदेची निवडणूक होऊ शकत नाही)
१५ भंडारा-गोंदिया
१६ पुणे
१७ सांगली-सातारा
१८ नांदेड
१९ यवतमाळ
२० ठाणे-पालघर
२१ अहमदनगर २ जानेवारी २०२२ पासून रिक्त (जागेचा कार्यकाळ संपला व स्थानिक प्राधिकरणांच्या निवडणूका प्रलंबित असल्याने जोवर जिल्यांतील सर्व स्थानिक प्राधिकरणांच्या निवडणूका होत नाहीत तोपर्यंत विधान परिषदेची निवडणूक होऊ शकत नाही)
२२ सोलापूर

शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले (७)

[संपादन]
क्र. मतदारसंघ आमदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले
पुणे जयंत आसगावकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ७ डिसेंबर २०२० ६ डिसेंबर २०२६
अमरावती किरण सरनाईक अपक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ७ डिसेंबर २०२० ६ डिसेंबर २०२६
कोकण ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ फेब्रुवारी २०२३ ७ फेब्रुवारी २०२९
औरंगाबाद विक्रम वसंतराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ फेब्रुवारी २०२३ ७ फेब्रुवारी २०२९
नागपूर सुधाकर गोविंद आडबाले अपक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ फेब्रुवारी २०२३ ७ फेब्रुवारी २०२९
मुंबई जगन्नाथ अभ्यंकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ८ जुलै २०२४ ७ जुलै २०३०
नाशिक किशोर दराडे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ जुलै २०२४ ७ जुलै २०३०

पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले (७)

[संपादन]
क्र. मतदारसंघ आमदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले
नागपूर अभिजीत वामनराव वंजारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ७ डिसेंबर २०२० ६ डिसेंबर २०२६
औरंगाबाद सतीश भानूदास चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ७ डिसेंबर २०२० ६ डिसेंबर २०२६
पुणे अरुण गणपती लाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ७ डिसेंबर २०२० ६ डिसेंबर २०२६
अमरावती धिरज रामभाऊ लिंगाडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ८ फेब्रुवारी २०२३ ७ फेब्रुवारी २०२९
नाशिक सत्यजित सुधीर तांबे अपक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ फेब्रुवारी २०२३ ७ फेब्रुवारी २०२९
कोकण निरंजन डावखरे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ८ जुलै २०२४ ७ जुलै २०३०
मुंबई अनिल परब शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी ८ जुलै २०२४ ७ जुलै २०३०

राज्यपाल नामनिर्देशित (१२)

[संपादन]
क्र. आमदार पक्ष आघाडी कार्यकाळ सुरुवात कार्यकाळ समाप्ती नोंदी
मनोनित आमदार
चित्रा वाघ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १६ ऑक्टोबर २०२४ १५ ऑक्टोबर २०३०
विक्रांत पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १६ ऑक्टोबर २०२४ १५ ऑक्टोबर २०३०
बाबूसिंह महाराज राठोड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १६ ऑक्टोबर २०२४ १५ ऑक्टोबर २०३०
हेमंत श्रीराम पाटील शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी १६ ऑक्टोबर २०२४ १५ ऑक्टोबर २०३०
मनीषा कायंदे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी १६ ऑक्टोबर २०२४ १५ ऑक्टोबर २०३०
पंकज छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १६ ऑक्टोबर २०२४ १५ ऑक्टोबर २०३०
इद्रिस नाईकवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १६ ऑक्टोबर २०२४ १५ ऑक्टोबर २०३०
२०२० पासून रिक्त
१०
११
१२

२०२६ सालच्या पोट-निवडणूका

[संपादन]
तारीख मतदारसंघ मूळ आमदार पक्ष मूळ कार्यकाळ सुरुवात मूळ कार्यकाळ समाप्ती पोट-निवडणूक कारण निर्वाचित आमदार पक्ष शेष कार्यकाळ सुरुवात शेष कार्यकाळ समाप्ती
१२ मे २०२६ विधानसभेच्या सदस्यांनी निवडलेले प्रज्ञा राजीव सातव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २८ जुलै २०२४ २७ जुलै २०३० राजीनामा प्रज्ञा राजीव सातव भारतीय जनता पक्ष १२ मे २०२६ २७ जुलै २०३०
१८ जून २०२६ नागपूर स्थानिक प्राधिकरण चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे भारतीय जनता पक्ष २ जानेवारी २०२२ १ जानेवारी २०२८ राजीनामा १८ जून २०२६

बाह्य दुवे

[संपादन]
  1. http://103.23.150.139/Home/Index
  2. https://www.mpscworld.com/bharatiy-nyayvyavashtebaddal-sampurn-mahiti/
  3. https://www.mpscworld.com/vidhanparishadebaddal-sampurn-mahiti/
  4. http://mls.org.in/pdf/Margdarshika.pdf

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. विधानमंडळ, महाराष्ट्र. "Maharashtra Legislature". mls.org.in. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  2. विधानमंडळ, महाराष्ट्र. "Maharashtra Legislature". mls.org.in. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  3. Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  4. Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  5. Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  6. Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  7. Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  8. http://mls.org.in/pdf2021/winter/list-of-council-member.pdf साचा:Bare URL PDF