जैत रे जैत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जैत रे जैत
300px|center
निर्मिती वर्ष १९७७
दिग्दर्शक जब्बार पटेल
कथा लेखक गो.नी. दांडेकर
पटकथाकार सतीश आळेकर, अनिल जोगळेकर
संवाद लेखक सतीश आळेकर, अनिल जोगळेकर
संकलन एन. एस. वैद्य
छायांकन विनोद प्रधान
गीतकार ना.धों. महानोर
संगीत हृदयनाथ मंगेशकर
ध्वनी दिग्दर्शक
पार्श्वगायन लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, वर्षा भोसले, रविंद्र, चंद्रकांत काळे
वेशभूषा सुरेश बसाळे
रंगभूषा निवृत्ती दळवी
प्रमुख अभिनेते डॉ. मोहन आगाशे, स्मिता पाटील, निळू फ़ुले, सुलभा देशपांडे, नारायण पै, सुशांत रे

जैत रे जैत हा इ.स. १९७७ मधील जब्बार पटेल दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे.

कथानक[संपादन]

चित्रपटाची कथा ठाकर अदिवासींवर बेतलेली आहे. नाग्या (मोहन आगाशे) हा भगताचा मुलगा असतो. त्याला पुण्यवंत व्हायचे असते. एकदा त्याला मधमाशी चावते आणि त्याचा डोळा निकामी होतो. म्हणून त्याला लिंगोबाच्या डोंगरावर जाऊन तिथली राणी माशी मारायची आहे. चिंधी (स्मिता पाटील) हिचा आधी विवाह झाला असतो. परंतु धाडसी चिंधीचा नवरा दारूबाज आणि भित्रा आहे. त्यामुळे ती माहेरी परत येते. आदिवासी रितीप्रमाणे तिच्या बापाला नवऱ्याला नुकसानभरपाई द्यायला लागते. चिंधी आणि नाग्या प्रेमात पडतात. याला नाग्याच्या आईचा (सुलभा देशपांडे) विरोध असतो. चिंधी नाग्याला सराव करण्यासाठी मदत करते. दरम्यान चिंधी नाग्यापासून गरोदर राहते. शेवटी नाग्या लिंगोबाचा डोंगर सर करतो. चिडलेल्या मधमाश्या चिंधीवर हल्ला करतात व त्यात चिंधी मरते. नाग्या राणी माशीला मारण्यात यशस्वी होतो.

जैत रे जैत झालं (राणी माशी मेली) तरी हाती काहीच लागत नाही कारण त्याच्या आयुष्यातली राणीदेखील मरते.

गीते[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • मी रात टाकली
  • नभं उतरु आलं
  • आम्ही ठाकर ठाकर
  • जांभूळ पिकल्या झाडाखाली
  • असं एखादं पाखरु वेल्हाळ
  • डोंगर काठाडी ठाकरवाडी