आवजीनाथ महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री संत आवजीनाथ महाराज

मूळ नाव आवजी गोरे
संप्रदाय नाथ संप्रदाय
गुरू कानिफनाथ महाराज
संबंधित तीर्थक्षेत्रे मिरपूर लोहारे

[१]

संत आवजीनाथ बाबा हे वंजारी समाजात गोरे घराण्यात जन्माला आलेले एक थोर संत होते. त्यांचा जन्म विरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र येथे झाला होता. लहानपणीच त्यांचे आई-वडील वारल्या मुळे त्यांच्या मिरपूर लोहारे, तालुका संगमनेर, जि अहमदनगर येथील रणमाळे मामांनी त्यांचे पालन पोषण केले.

प्रचलित अख्यायिके नुसार त्यांना तरुणपणीच संत कानिफनाथ महाराजांचा दृष्टांत आणि गुरूग्रह झाला. लवकरच आवजीनाथ बाबांनी मिरपूर लोहारे येथे नवरात्रीत संजीवन समाधी घेतली. बरोबर दसऱ्याच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली आणि तेव्हा पासून ते आजतागायत म्हणजे गेल्या ३५० वर्षांपासून मिरपूर लोहारे येथे आवजीनाथ महाराजांची दसऱ्याला जत्रा भरते.[२] येथे विविध जाती धर्माचे भाविक मोठ्या उत्साहाने हजेरी लावतात. दरवर्षी रंगपंचमीला श्रीक्षेत्र मढी (कानिफनाथ महाराजांचे स्थान) येथील जत्रेत आवजीनाथ महाराजांच्या काठीचा मान असतो, [३] त्याशिवाय जत्रा सुरू होत नाही.

संदर्भ[संपादन]

  1. ^ [१][permanent dead link]
  2. ^ "संताची माहिती मिरपूर लोहारे यात्रा उत्सव विजयादशमी". Archived from the original on 2020-10-29. 2020-10-26 रोजी पाहिले.
  3. ^ ShriAavjinath Baba Mandir Lohare