वंजारी
| वंजारी | |
|---|---|
![]() श्री संत भगवानबाबा | |
| वर्गीकरण | भटक्या जमाती-(ड) |
| गोत्र | अत्री, गौतम, कश्यप, भारद्वाज, वशिष्ठ, |
| वेद | ऋग्वेद, यजुर्वेद |
| कुल दैवत | खंडोबा |
| कुल देवी | रेणुका देवी |
| गुरु | भगवानबाबा |
| धर्म |
हिंदू |
| भाषा | मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू |
| देश |
|
| मूळ राज्य | राजस्थान |
| लोकसंख्या_राज्ये |
राजस्थान • गुजरात • मध्य प्रदेश • हरियाणा • |
| उल्लेखनीय_सदस्य | गोपीनाथ मुंडे |
| ऐतिहासिक_समूह | राजपूत |
| स्थिती |
इतर मागास वर्ग |
| शिक्षण_आरक्षण |
|
| रोजगार_आरक्षण |
|
वंजारी ही भारतातील हिंदू धर्मातील एक जात आहे. महाराष्ट्रात वंजारी समाज भटक्या जमाती-(ड) (NT-D म्हणजेच NT-3) मधे वर्गीकृत आहे. यवन आक्रमकांच्या त्रासाला कंटाळून इसवी सनाच्या १५-१६ व्या शतकात राजस्थान मधून दक्षिणेकडे स्थलांतरित झालेल्या विविध ३० (तीस) क्षत्रिय जाती जमाती पैकी ही एक जात होय. हा समाज ईशान्य भारत सोडून भारतातील सर्वच राज्यांत कमी जास्त लोकसंख्येत आढळतो. महाराष्ट्र राज्या बाहेरील वंजारी समाजाला तेथिल भाषेतील विविधते मुळे वंजारा, वंजरी संबोधले जाते. स्व. गणपत पांडुरंग संखे यांच्या महाराष्ट्र सरकार विरुद्ध मुंबई उच्च न्यायालया मधील प्रदीर्घ लढ्यामुळे [१] वंजारी समाज OBC मधून (NT-3) म्हणजेच (NT-D) मधे वर्गीकृत केला गेला.
उत्पत्ती
वंजारी समाजाची उत्पत्ती ही रेणुका देवीच्या सन्तानींपासून झाली असे मानल्या जाते. रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी यांना पाच पुत्र होते, ते अनुक्रमे: वशूमंत, वस्तू, सूशौन, विश्ववस्तू व परशूराम हे होत. वशुमंतापासून कमण्डूक ऋषींना अनुक्रमे रघुपती, अधिपती, कानुपती आणि सुभानुपती हे पुत्र झाले.
यातील रघुपती पासून १) रावजीन,
अधिपती पासून २) लाडजीन,
कानिपती पासून ३) मथुरजन आणि
सुभानुपती पासून ४) भूसारजीन
अशा क्रमवार चार शाखांची उत्पत्ती झाली. आज या चारही शाखा एक आहेत व वंजारी म्हणून परिचित आहेत.[२]
परंपरागत पूर्वीचा व्यवसाय
राजस्तान मध्ये वंजारी समाज हा महाराणा प्रतापसिंघ यांच्या सैन्यात प्रधान सेनापती म्हणून कार्यरत होता. श्री भल्लसिंघ वंजारी व श्री फत्तेसिंघ वंजारी हे महाराणा प्रतापसिंघचे प्रधान सेनापती होते. त्यांच्या समाधी आजही उदयपूर राजस्तान मध्ये आहे.राजस्थानात असतांना हा समाज कडवा लढवय्या क्षत्रिय म्हणून ओळखला जात होता. आजही राजस्थानात हा समाज मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यवन आक्रमणांमुळे त्रस्त होऊन दक्षिणे कडे स्थलांतरित झाला. आणि व्यापार उदीम करू लागला. दळणवळण साधनांचा शोध लागण्यापूर्वी पुरातन काळापासून मालवाहतुक/मालपुरवठा करण्याचे काम वंजारी समाज करत असे. महाराष्ट्रात आल्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात वंजारी होते.पूर्वीच्या काळी वंजारी समाज मालवाहतूकीसह व्यापारही करत असे.
वंशज
वंजारी हे वीर असुन ते महाराणा प्रताप यांच्या सैनिक होते. महाराणा प्रताप यांचे सैनापती मल्ला हे जातीचे वंजारी होते.
यादव काळ, मराठा साम्राज्य व शिवकालीन वंजारी
वंजारी समाजाचे स्थलांतर हे यादव काळाच्या अगोदर पासून राजस्थान मधून आताच्या विविध भागात होत राहिला विशेष गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक दक्षिणेकडे महाराष्ट्र मध्ये विशेषतः रेणुका माता, माहूर गड हे या समाजाचे कुलदैवत असल्याने व मुख्य व्यवसाय बैलगाडी दळणवळ व विविध सैन्याला माल पुरवणे व विविध राज घराण्यात महत्वपूर्ण पदावर व सैन्य म्हणून सहभाग. यादव काळाचे मुख्य राजधानी दौलताबाद असून यांचे प्रमूख सरदार जाधव घराणे सिंदखेडराजा राजमाता जिजाबाई शहाजी भोसले यांचे माहेर येथे आजही वंजारी समाज मोठ्या प्रमाणात आढळतो.
फलटणचे संस्थान निंबाळकर घराण्यात म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज च्या आई महाराणी सईबाई भोसले निंबाळकर कडील घराण्यातील सत्ता संघर्षात वंजारी प्रधान (पेशवा) हनुमंत वंजारी व सहकाऱ्यांची मुख्य भूमिका आढळून येते. बंडखोरी व नंतरच्या काळात निंबाळकर घराण्या चे वारसदार भूपालचा मुलगा वणंगोजी ने आपले साथीदार लाकडी लिबोडी जाशी पळशी, तडावले, मांडवे बालेघाट भागातील वंजारी समाजातील लाड वंजारी, रामेशी, हटकर धनगर यांनी सहकार्य करून बाजारच्या दिवशी फलटनमध्ये शिरुने कौचे पाटील देशपांडे यांची कत्तल केली. पूर्वीचे प्रधान हनुमंत वंजारी यांची बंडखोरीत अगोदर हत्या झाली होती नंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. पुढे जयवंता बाईला फलटनला आणून वणंगोजीला फलटणच्या गादीवर बसविले. इ.स.१३९० या विजयाप्रित्यर्थ मदत करणारे लाड वंजारी, हटकर धनगर, रामोशा यांना इनाम देण्यात आले. अशा प्रकारे फलटण संस्थानात लाड वंजारी जातीच्या लोकांना पाटीलक्या, इनाम, वतने मिळाली. इ.स. १३९० साली त्यावेळी फलटण संस्थान बरेच मोठे होते. [३]
छत्रपती संभाजी महाराज यांच्या कठीण कार्यकाळात मुघलांनी जवळपास मराठवाडा काबीज तर पश्चिम महाराष्ट्रावर जोरदार हल्ले चढवले होता, या काळात औरंगजेब शक्तीने दख्खन मध्ये आला होता त्याने दिल्ली सल्तनतचे बुड आदिलशाही सुद्धा संपवत आणली होती मराठवाडा सुरुवातीपासून आदिलशाही व नंतर मुघलांचा गड राहिला जुने औरंगाबाद हे त्यांचे मुख्य लष्कर ठिकाण. येथील अनेक जमीनदार, वतनदार अगोदर आदिलशाही व नंतर मुघलांसोबत एकनिष्ठ राहिले. याला येथील भौगोलिक स्थिती पण कारणीभूत.
छत्रपती संभाजी महाराज यांचे विश्वासू सरदार धाकू (थाकू) वंजारी त्यांचे पूर्ण कुटुंब मुलगा जागोजी वंजारी, चुलता वसंत वंजारी, नातेवाईक शिवाजी नाईक यांनी पुणे प्रांत ते बालाघाट रांगेत स्वराज्यासाठी कठीण काळात अनेक मोहिमा मध्ये सहभाग घेतला, मुघलांना व महत्वाच्या पदावर लष्कराचे कामकाज पाहणाऱ्या औरंगजेबाच्या नातवाला शह्याजादा मुईजृद्दीन ला बालाघाट रांगेत, बीड परगना,पेडगाव (बहादूरगड) इलाका मध्ये सळो की पळो करून सोडले होते. अनेक जमीनदार, वतनदार स्वराज्याला चौथ देण्यास मनाई करणाऱ्या कडून वसुली चे काम यांच्याकडे असे. त्याची गढी बीड जिल्ह्यातील दाबी या गावात आढळून येते.[४]
छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्या नंतर मराठा साम्राज्य मध्ये वारसदार हक्काची लढाई सुरू झाली ज्यात पुढे साताऱ्या ची गादी त्या काळातील पेशव्याच्या सहकाऱ्यांनी पुढे आली. त्यानंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी मल्हारराव होळकर यांच्या सोबत घेऊन अनेक जुन्या सरदारांना एकीकरण करून स्वराज्याची गुढी पुन्हा उभा केली, त्यात वंजारी सरदारांचे उल्लेखनीय सहभाग दिसून येतो: राजश्री नरोजी नाईक वणजारे, नरसोजी वणजारे विवळेकर, शिवाजी वणजारे, उदाजी वणजारे रिपूरकर, इतर सरदार विठु वणजारा, बहिरु वणजारा, खंडू वणजारा. [५]
इ. स. १७४०-१७८० विशेष पेशवे माधवराव पेशवे यांच्या काळात अप्पाजी मुंढे, बलवंत मुंढे आणि महिमाजी मुंढे सरदार म्हणून कार्यकर्त होते. सरदार अप्पाजी मुंढे यांनी पुण्यातील सदाशिव पेठ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला, हैदर अली विरुद्ध झालेल्या युद्धात त्यांचा बंगलोर येथे लढाई मध्ये मृत्यू झाला. पेशवा काळात वंजारी सरदारांची संख्या उल्लेखनीय आहे. [६]
सुभेदार मल्हारराव होळकर व विशेष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दरबारात विश्वासू सरदार म्हणून अनेक वंजारी व्यक्तीचा उल्लेख येतो राजश्री आप्पाजी गिते, राजश्री मकाजी गिते. मराठ्यांनी उत्तरेकडील पहिल्या 7 खंडण्या वसूल केल्या त्यात होळकर यांच्याकडून राजश्री आप्पाजी गिते, राजश्री मकाजी गिते यांच्या मार्फत करण्यात आली. [७][८]
पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 या लढाईत भाग घेणारे वंजारी सरदार: गोदाजी थोरवे, कालेवार आयरेकर. [९]
आजची स्थिती
आज महाराष्ट्रातील मुठभर गर्भश्रीमंत लोक सरकारी अधिकारी कर्मचारी व्यावसायिक सोडले तर वंजारी समाजाची अवस्था अवांच्छित समाजघटक अशी बनली आहे.
चार पोटजातीत विभागलेला हा वंजारी समाज संत श्री भगवानबाबा (भगवानगड, ता पाथर्डी जी अहमदनगर) व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे संघटित झाला आहे.या महापुरुषन मुळे आज संपूर्ण वंजारी समाज एक झाला आहे. व येणाऱ्या काळात संपूर्णन भारतभरात असलेला वंजारी समाज एक होताना दिसत आहे. मुंडे यांना वंजारी समाज नेता मानतो. [१०][११].
व्यक्तिमत्त्वे
संत
कीर्तनकार व प्रवचनकार
- ह.भ.प. स्वामी डॉ तुळशिराम महाराज गुट्टे
- ह. भ.प.विक्रमशास्त्री बडदे महाराज
- राधाताई सानप
- नामदेवशास्त्री सानप
- अर्जुन महाराज लाड
- हरिहर महाराज दिवेगावकर
- नथुराम बाबा केहाळकर
- ह.भ.प. श्री रानबा (रामेश्वर) महाराज गुट्टे
- ह.भ.प.गोदावरीताई मुंडे
राजकारणी
- क्रांतिवीर वसंतराव नाईक
- बबनराव दादाबा ढाकणे
- गोपीनाथ मुंडे
- पंकजा पालवे
- केशवराव आंधळे
- पंडितराव दौंड
- तुकाराम दिघोळे
- तुकाराम कायडे
- पंडितअण्णा मुंडे
- प्रताप बबनराव ढाकणे
- फुलचंद कराड
- टी.पी. मुंडे
- प्रीतम गोपीनाथ मुंडे
- उषाताई दराडे
- मंगेश सागले
- गजाननराव घुगे
- मोहन फाड
- अशोक मुर्तडक
- धनंजय मुंडे
- मधुसुदन केंद्रे
- सुदामती गुट्टे
- जितेंद्र आव्हाड
- सुरेंद्र शिरसाट
- भानुदासराव केंद्रे
- बाळसाहेब सानप
- गोविंद केद्रे
इतर
- गणपत पांडुरंग संखे [१४]
- धर्माजी प्रताप मुंडे[१५]
- तात्याराव लहाने
- भास्करराव आव्हाड
- सुधाकर आव्हाड
- विश्वनाथ कराड
- हर्षवर्धन नव्हाते
- संजय बांगर
- कैलास दौंड
- मच्छिंद्र चाटे
- अतुल बेदाडे (क्रिकेट)
- श्रीकांत मुंढे (क्रिकेट)
- रमिला लटपटे(पायलट) पहिली वंजारी महिला पायलट
नाट्यकर्मी
लोककलावंत
- तुकाराम खेडकर,
- रघुवीर खेडकर
- हरिभाऊ बडे-नगरकर,
- प्रितम कागने (Actress)
- पंडित यादवराज फड (गायक)
- राजेंद्र वामनराव सानप (शिवशाहीर)
सामाजिक संघटना
- रावजीन वंजारी ज्ञातगंगा, मुंबई (स्थापना 1870)
- भगवान सेना
संदर्भ
- ^ "गणपत पांडुरंग संखे विरुद्ध महाराष्ट्र शासन" (इंग्रजी भाषेत).
- ^ (ग्रंथ- वनजारी बनजारी भाग-१, लेखक- पांडुरंग कचेश्वर आंधळे, भाषा- मराठी, प्रकाशक- सुरकिर्ती प्रकाशन नाशिक-४२२००१, दिनांक- ३१ डिसेंबर १९९९)
- ^ Parasanis, Dattatraya Balavant. Itihāsa saṁgraha,nimbalkarachi kaifiyat. p. 439.
- ^ kamal Gokhale. Shivputra Sambhaji. p. 266,281,531,.CS1 maint: extra punctuation (link)
- ^ Parasanis, Dattatraya Balavant. Itihāsa saṁgraha. p. 567.
- ^ THE LATE R B GANESH CHIMNAJI VAD B A. selections from satara and the peshwa diaries and Peshwa Madhavrao 1. p. 91,225,226,231,310.
- ^ Dr Devidas Pote,Dattatray Balwant Parsanis. Maheshwar Darbarchi Batamipatre Volume Five Newsletters. p. 27, 33,84,107, 186,195,248,287,339,390.
- ^ Parasanis, Dattatraya Balavant. Itihāsa saṁgraha. p. 140,183,490.
- ^ Yaadav Raghunaath. Paanipatachii Bakhar. p. 29.
- ^ "वंजारी समाजाच्या आमदारांचा आज ठाण्यात सत्कार[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य) - ^ "Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper,Marathi News Paper in Mumbai". www.loksatta.com. 2018-03-20 रोजी पाहिले.
- ^ "संत आवजीनाथ महाराज".
- ^ "वंजारी संत - भगवान बाबा". ४ मार्च २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३१ जुलै २०१२ रोजी पाहिले.
- ^ "जी. पी. संखे यांच्या निधनाने वंजारी समाजाची प्रचंड हानी". 2018-09-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-08-30 रोजी पाहिले.
- ^ "आज आद्य क्रांतिकारक धर्माजी मुंडे पुण्यतिथी". ३१ जुलै २०१२ रोजी पाहिले. line feed character in
|दिनांक=at position 13 (सहाय्य)[permanent dead link]
