"जयंत विष्णू नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८३: ओळ ८३:
== अन्य ==
== अन्य ==
* पाहिलेले देश भेटलेली माणसं
* पाहिलेले देश भेटलेली माणसं
* समग्र जयंत नारळीकर


=== पुरस्कार ===
=== पुरस्कार ===

०९:५३, ९ मार्च २०२० ची आवृत्ती

जयंत नारळीकर

श्री जयंत विष्णु नारळीकर
पूर्ण नावश्री जयंत विष्णू नारळीकर
जन्म जुलै १९, १९३८
कोल्हापूर
निवासस्थान पुणे
नागरिकत्व भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिन्दु
कार्यक्षेत्र खगोलभौतिकी
कार्यसंस्था केंब्रिज विद्यापीठ
टाटा मूलभूत संशोधन संस्था
आयुका
प्रशिक्षण बनारस हिंदू विद्यापीठ
केंब्रिज विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शक फ्रेड हॉईल
वडील विष्णू वासुदेव नारळीकर
आई सुमती विष्णू नारळीकर
पत्नी मंगला जयंत नारळीकर
अपत्ये गीता (कन्या), गिरिजा (कन्या), लीलावती (कन्या)

डॉ. जयंत विष्णू नारळीकर (जुलै १९, १९३८ - हयात) हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत.

जीवन

नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.

१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.

डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.

वाच.जयंत आणि वाच.मंगला नारळीकर

संशोधन

डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.

चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

साहित्यातील भर

विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.

विज्ञानकथा पुस्तके

  • अंतराळातील भस्मासुर
  • अंतराळातील स्फोट
  • अभयारण्य
  • चला जाऊ अवकाश सफरीला
  • टाइम मशीनची किमया
  • प्रेषित
  • यक्षांची देणगी
  • याला जीवन ऐसे नाव
  • वामन परत न आला
  • व्हायरस

इतर विज्ञानविषयक पुस्तके

  • अंतराळ आणि विज्ञान
  • आकाशाशी जडले नाते
  • गणितातील गमतीजमती
  • नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
  • नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान
  • Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
  • युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी)
  • विश्वाची रचना
  • विज्ञान आणि वैज्ञानिक
  • विज्ञानगंगेची अवखळ वळणे
  • विज्ञानाची गरुडझेप
  • विज्ञानाचे रचयिते
  • समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक)
  • Seven Wonders Of The Cosmos
  • सूर्याचा प्रकोप

आत्मचरित्र

  • चार नगरांतले माझे विश्व

अन्य

  • पाहिलेले देश भेटलेली माणसं
  • समग्र जयंत नारळीकर

पुरस्कार

  • १९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
  • २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
  • २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
  • त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम.पी. बिर्ला हे पुरस्कारही मिळाले आहेत.
  • २०१४साली मिळालेला तेनाली-हैदराबाद येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३
  • जयंत नारळीकर यांच्या 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
  • ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
  • अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
  • फाय फाऊंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार

चरित्र

डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

लघुपट

खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे.

हेही वाचा


बाह्य दुवे