इचलकरंजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?इचलकरंजी
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
राजवाडा
राजवाडा
गुणक: 16°42′N 74°28′E / 16.70°N 74.47°E / 16.70; 74.47
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा कोल्हापूर
तालुका/के हातकणंगले
लोकसंख्या २,५७,५७२ (2001)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१६११५
• +०२३०
• MH 09

गुणक: 16°42′N 74°28′E / 16.70°N 74.47°E / 16.70; 74.47

इचलकरंजी शहर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. हे शहर येथील वस्त्र उत्पादनासाठी खूप नावारूपास आले आहे.या गावाला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते.

इतिहास[संपादन]

इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील औद्योगिक शहर आहे. लोकसंख्या २,५७,५७२ (२००१). हे कोल्हापूरपासून सडकेने २३ किमी. पूर्वेस पंचगंगा नदीच्या काठी आहे. इचलकरंजी संस्थानची ही एकेकाळची राजधानी नंतर वस्त्रोद्योगामुळे पुढे आली.इचलकरंजी महाराष्ट्रामधील एक मोठी आणि श्रीमंत नगरपरिषद म्हणून ओळखली जाते. देशभक्‍त डॉ. रत्नाप्पा कुंभार हे इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक व पहिले खासदार होते.

वस्त्रोद्योग[संपादन]

येथील यंत्रमागावरील कापड हे उर्वरित भारतात व भारताबाहेर पाठवले जाते. हातरुमाल, परकर, सदरे, धोतरे असे अनेक वस्त्रांचे प्रकार येथे तयार होतात. येथे अंदाजे १ लाख यंत्रमाग व अंदाजे १०,००० अत्याधुनिक धोटे विरहित यंत्रमाग आहेत. दररोज १ कोटी २५ लाख मीटर कापडाचे उत्पादन येथे होते. वस्त्रोद्योगातील वार्षिक उलाढाल अंदाजे २५ हजार कोटी आहे.

त्यांशिवाय इचलकरंजी येथे साखर, तेल, यंत्रे इत्यादींचे कारखाने निघाले आहेत. शहरातील तंबाखू, शेंग, गूळ इत्यादींची ही बाजारपेठ असून शिक्षणक्षेत्रातही पुढे आहे.

वस्त्रोद्योगाचा इतिहास[संपादन]

इचलकरंजीमध्ये पहिला यंत्रमाग कारखाना कै. श्री. विठठ्लराव दातार यांनी १९०४मध्ये व्यंकटेश रंग तंतू मिल या नावाने स्थापन केला. इचलकरंजीच्या विकासातील मैलाचा दगड ठरलेली सहकारी इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटची स्थापना कै. श्री. कृष्णदेव साळुंखे आणि कै. श्री. फुलचंदशेठ शहा या दोन द्रष्ट्या नेत्यांनी केली.

साहित्य, कला आणि इचलकरंजी माहिती[संपादन]

इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी आपल्या कारकिर्दीत लोकहिताची अनेक कामे केली.त्यांच्याच काळात इचलकरंजीमध्ये पहिले हातमाग आणण्यात आले.साचा:दुजोरा हवा आहे. त्यांच्या स्मृत्यर्थ इचलकरंजीतील नाट्यगृहाला कै.नारायणराव घोरपडे नाट्यगृह असे नाव देण्यात आले. या नाट्यगृहाजवळ त्यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा आहे. संगीत कला जपणारे पंडीत बाळकृष्ण बुवा स्मृती मंदिर येथे आहे. सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पंडीत बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या स्मृत्यर्थ हे बांधले गेले. १९७४ साली प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांचा अध्यक्षतेखाली अखिल भारतीय साहित्य सम्मेलन इचलकरंजी येथे पार पडले.इचलकरंजीचे वैभव असलेला राजवाडा येथे सध्या डी. के. टी ई. टेक्सटाईल अँड इंजिनीरिंग इन्स्टिटयूट हे कॉलेज सुरु आहे.

१८७० साली नेटीव्ह जनरल लायब्ररी या नावाने सुरु झालेले आणि आता आपटे वाचन मंदिर या नावाने ओळखले जाणारे वाचनालय महाराष्ट्रातील अतिशय जुन्या वाचनालयांपैकी एक आहे.

शिक्षणसंस्था[संपादन]

सामाजिक संस्था[संपादन]

भौगोलिक माहिती[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

इचलकरंजीतील खाद्यालये

 • हिरापन्ना लस्सी, मराठा मंडळासमोर.
 • दत्त भेळ, D.K.T.E. कॉलेजसमोर.
 • अवंती वडा, शाहू पुतळ्याजवळ.
 • मधुरा मिसळ, गोविंदराव कॉलेजसमोर
 • इचलकरंजी चौपाटी, सुंदर बाग
 • हनुमान डोसा, सुंदर बाग
 • मटण थाळी,
  • कांबळे खाणावळ, निरामय हॉस्पिटलसमोर
  • जाधव खाणावळ, गांधी कॅम्प.
  • धुत्रे खाणावळ, नगरपालिकेच्या जुन्या इमारतीजवळ
  • विजया केटरर्स, जवाहर नगर
  • बुगड खाणावळ,गांधी कॅम्प
  • सरकार वाडा,बस स्थानका जवळ
  • सोनटक्के खाणावळ,गांधी कॅम्प
  • गजानन जाधव खाणावळ,गांधी कॅम्प
  • बुगड खानावळ : डेक्कन समोर**