सतीश धवन
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
| सतीश धवन | |
| जन्म | सप्टेंबर २५, १९२० श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर (संस्थान), ब्रिटिश भारत |
| मृत्यू | ३ जानेवारी, २००२ (वय ८१)जानेवारी ३, २००२ बेंगळुरू, कर्नाटक |
| नागरिकत्व | भारतीय |
सतीश धवन (२५ सप्टेंबर, १९२० – ३ जानेवारी, २००२) हे एक भारतीय गणितज्ञ आणि अवकाश अभियंता होते. त्यांनी १९७२ ते १९८४ पर्यंत भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि त्यांना भारतातील प्रायोगिक द्रव गतिमान संशोधनाचे जनक मानले जाते. यांचे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे १९७२ साली अध्यक्ष झाले. त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले.
त्यांनी ग्रामीण शिक्षण, रिमोट सेन्सिंग तसेच उपग्रह संप्रेषणच्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांनी भारतीय राष्ट्रीय उपग्रह - दूरसंचार उपग्रह, IRS - दूरसंवेद उपग्रह आणि पी.एस.एल.व्ही. - ध्रुवीय उपग्रह लँच वाहन यासारखे प्रकल्प भारत यशस्वी करू शकला.
त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केंद्र असे नामकरण करण्यात आले.