Jump to content

मंगला नारळीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मंगला सदाशिव राजवाडे या पानावरून पुनर्निर्देशित)
मंगला नारळीकर
मंगला जयंत नारळीकर
जन्म नाव मंगला राजवाडे
जन्म १७ मे १९४३
मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू १७ जुलै, २०२३ (वय ८०)[]
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखिका व गणितज्ज्ञ
विषय गणित (शिक्षण मुंबई विद्यापीठ)
पती जयंत नारळीकर
अपत्ये ३ मुली : गीता, गिरिजा आणि लीलावती

डॉ. मंगला नारळीकर (पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे) (१७ मे, १९४३ - १७ जुलै, २०२३) या एक भारतीय मराठी गणितज्ज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.[]

शिक्षण

[संपादन]
११ ऑक्टोबर २०१७ रोजी मराठी विकिपीडियावर संपादन करताना नारळीकर

मंगला राजवाडे यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले.[]

अध्यापकीय कारकीर्द

[संपादन]
  • इ.स. १९६४ ते १९६६ : इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले.[][]
  • इ.स. १९६७ ते १९६९ : केंब्रिज विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत गणिताचे अध्यापन केले.[ संदर्भ हवा ]
  • मुंबई विद्यापीठात व नंतर पुणे विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापिका म्हणून कार्य केले.[ संदर्भ हवा ]
  • इ.स. १९७४ ते १९८० : या कालावधीत परत टाटा इन्स्टिट्यूटल येथे संशोधन करून त्यांनी १९८१ साली त्यांनी प्राध्यापक के. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विषयातली पीएच.डी. मिळवली.[][] संश्लेषणात्मक अंक सिद्धान्त हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता.[]
  • इ.स. १९८२ ते १९८५ या काळात टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गणित विद्यालयात पूल ऑफिसर म्हणून काम केले.[] याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठांतील एम.फिल. करणाऱ्या गणिताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.[]
  • इ.स. १९८९ ते २००२ दरम्यान पुणे विद्यापीठांतील एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना गणिताचे अध्यापन दिले.[]
  • इ.स. २००२ ते २००६ या कालावधीत भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवले.[]
  • सद्‌ आणि सदसत्‌ विश्लेषण (Real and Complex Analysis), संश्लेषणात्मक भूमिती, अंकसिद्धान्त, प्रगत बीजगणित आणि संस्थितिशास्त्र (Topology) हे मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय आहेत.[]
  • त्यांनी बालभारतीच्या गणित विषयाच्या समितीच्या अध्यक्षा म्हणून काम केले.[]

विवाह आणि कुटुंब

[संपादन]

इ.स. १९६५ मध्ये मंगला राजवाडेंचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ रँग्लर जयंत नारळीकर यांच्याशी झाला.[] संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत.[]

मृत्यू

[संपादन]

नारळीकर यांचे पुणे येथे राहत्या घरी १७ जुलै २०२३ रोजी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.[]

विवादास्पद उदाहरण

[संपादन]

मंगला नारळीकर यांनी एक विवादास्पद सूचना केली आहे. ती अशी : संख्येचे वाचन करताना पहिला अंक आधी आणि बाकीचे नंतर उच्चारावेत, म्हणजे लोकांचा घोटाळा (??) होत नाही. उदा० बत्तीस म्हणायच्या ऐवजी तीन-दोन म्हणायचे. या सूचनेवर प्रचंड टीका झाली आहे.

लिहिलेली पुस्तके

[संपादन]

डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:[ संदर्भ हवा ]

  • A Cosmic Adventure (अनुवादित, मूळ मराठी - आकाशाशी जडले नाते, लेखक प्रा. जयंत नारळीकर)[]
  • An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)
  • गणितगप्पा (भाग १, २)
  • गणिताच्या सोप्या वाटा (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)[]
  • नभात हसरे तारे (सहलेखक - डॉ. अजित केंभावी व डॉ. जयंत नारळीकर) : (खगोलविज्ञानविषक)[१०][११]
  • पहिलेले देश, भेटलेली माणसं (प्रवासवर्णन)
  • Fun and fundamentals of mathematics, Universities press.[१२]

संशोधनात्मक लेख व पत्रिका

[संपादन]

प्रकाशित संशोधनात्मक लेख आणि संशोधन पत्रिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:[ संदर्भ हवा ]

  • Hybrid mean Value Theorem of L-functions (Hardy Ramanujan Journal - १९८६)
  • On a theorem of Erdos and Szemeredi (Hardy Ramanujan Journal - १९८०)
  • On orders solely of Abelian Groups (Bulletin of London Mathematical Society - १९८८)
  • On the Mean Square Value theorem of Hurwitz Zeta function (Proceedings of Indian Academy of Sciences - १९८१)
  • Science Age या मासिकात सामान्य माणसांना आकर्षित करतील असे अनेक गणितविषयक लेख
  • Theory of Sieved Integers (Acta Arithmetica)

पुरस्कार

[संपादन]
  • बी.ए. (गणित) मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम १९६२[ संदर्भ हवा ]
  • एम.ए. (गणित) पदवीसाठी कुलगुरूंचे सुवर्णपदक, मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम १९६४[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b "वयाच्या ७७ व्या वर्षी जेष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन". दैनिक लोकमत. १७ जुलै २०२३ रोजी पाहिले. no-break space character in |title= at position 22 (सहाय्य)
  2. ^ a b c d e f g h "Dr. Mangala Narlikar | E-learning in Mathematics at Undergraduate and Postgraduate Level". web.archive.org. 2014-04-20. 2014-04-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-09 रोजी पाहिले.
  3. ^ Author, Heramb Email (2012-07-09). "Mangala Narlikar: The Journey of an Informal Mathematician!". BrainPrick (इंग्रजी भाषेत). 2015-11-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-09 रोजी पाहिले.
  4. ^ a b c Narlikar, Mangala (9th August 2020). "A career in mathematics" (PDF). https://www.ias.ac.in/public/Resources/Initiatives/Women_in_Science. 9th August 2020 रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |website= (सहाय्य)
  5. ^ "Indian Women In Science | Chemical & Engineering News: Books". pubsapp.acs.org. 2020-08-09 रोजी पाहिले.
  6. ^ "Balbharati panel will review new number reading method". www.sakaltimes.com (इंग्रजी भाषेत). 2019-06-26. 2020-08-09 रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ^ Dadhich, Naresh (९ ऑगस्ट २०२०). "LIVING LEGENDS IN INDIAN SCIENCE" (PDF). https://www.currentscience.ac.in/. ९ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  8. ^ Roy, Manabendra Nath (2003). The Radical Humanist (इंग्रजी भाषेत). Maniben Kara.
  9. ^ "गणिताच्या सोप्या वाटा - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2020-08-09 रोजी पाहिले.
  10. ^ Loke, Priyanka (2019-07-19). "भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म दिवस". कोकण नाऊ (इंग्रजी भाषेत). 2020-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-09 रोजी पाहिले.
  11. ^ नारळीकर, मंगला. नभात हसरे तारे. राजहंस प्रकाशन. ISBN 9788174344175.
  12. ^ Narlikar, J. V.; Narlikar, M. (2002-03). Fun and Fundamentals of Mathematics (इंग्रजी भाषेत). Universities Press. ISBN 978-81-7371-398-9. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
विकिस्रोत
विकिस्रोत
मंगला नारळीकर हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.