जेष्ठराज जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जेष्ठराज भालचंद्र जोशी (२८ मे, १९४९:मसूर, सातारा जिल्हा, महाराष्ट्र - ) हे एक भारतीय रसायन अभियंता, परमाणु वैज्ञानिक, सल्लागार आणि शिक्षक आहेत. अणुभट्टींच्या रचनेमधे त्यांनी काही सुधारणा मांडलेल्या आहेत. ते होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबईचे डीएई-होमी भाभा चेर प्रोफेसर आहेत. त्यांच्या अभियांत्रिकी विज्ञानातील योगदाना साठी त्यांना पुरस्कारांसाठी शांतीस्वरुप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व त्यांना रसायन अभियांत्रिकी आणि परमाणु विज्ञान क्षेत्रातील कार्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींकडून २०१४ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जोशी यांचा जन्म भारतीय राज्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मसूर गावात, २८ मे १९४९ रोजी झाला. १९७१ मध्ये ते केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.ई झाले आणि १९७२ मध्ये मुंबईच्या केमिकल टेक्नॉलॉजी विद्यापीठातून एम्.ई. झाले. त्यानंतर त्यांनी संशोधक व रासायनिक अभियंता मन मोहन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. १९७७ मध्ये त्यांना पीएचडी मिळाली.[१]

संदर्भ[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.