Jump to content

रिसॅट १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिसॅट १
रिसॅट १
रिसॅट १
उपशीर्षक रिसॅट १
मालक देश/कंपनी भारत
निर्मिती संस्था इस्रो
कक्षीय माहिती
कक्षा भूस्थिर रेखांश
कक्षीय गुणधर्म भूस्थिर
कक्षेचा कल ९७.५°
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान पीएसएलव्ही सी-१९
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा भारत
प्रक्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक २६ -एप्रिल-२०१२
इंधन मोनो मिथेन हायड्रयाझिन
निर्मिती माहिती
वजन १८५८ किलोग्रॅम
उपग्रहावरील यंत्रे सी बॅंड एस.आर.ए.
निर्मिती स्थळ/देश भारत
कालावधी ५ वर्ष
अधिक माहिती
कार्यकाळ ५ वर्षे
बाह्य दुवे
संकेतस्थळ

रिसॅट १ हा भारताचा देशांतर्गत बनवलेला १८५८ किलोग्रॅम वजनाचा उपग्रहाच्या पहिला हवामानाचा अंदाज घेणारा उपग्रह आहे. हा उपग्रह २६ एप्रिल रोजी सकाळी ७ .४७ वाजता "पीएसएलव्ही' ह्या अग्नी बाणाच्या माध्यमातून सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा भारत येथून प्रक्षेपित करण्यात आला. या उपग्रहाद्वारे सर्व ऋतूंमध्ये चोवीस तास पृथ्वीची छायाचित्रे काढणे शक्य होणार आहे. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज घेणे शक्य होणार आहे.[]

ढगाळ वातावरण असताना भारताचे पूर्वीचे रिमोट सेन्सिंग उपग्रह जमिनीवरील छायाचित्रे घेऊ शकत नाहीत. रिसॅट-१ च्या द्वारे ढगाळ वातावरणातही जमिनीवरील स्पष्ट छायाचित्रे घेता येतात.

४९८ कोटी रुपयांच्या या मोहिमेत ३७८ कोटी रुपये रिसॅट-१ च्या निर्मितीवर खर्च करण्यात आले आणि १२० कोटी रुपये पीएसएलव्ही या रॉकेटच्या बांधणीचा खर्च झाले.

संदर्भ

[संपादन]