टाटा मूलभूत संशोधन संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

टाटा मूलभूत संशोधन संस्था "(इंग्लिश-टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च)"

टाटा मूलभूत संशोधन संस्थाचे मुंबईतील प्रांगण

१९४५ साली जे. आर. डी. टाटा आणि डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या पुढाकाराने मुंबई येथे झाली. १९६२ साली दक्षिण मुंबईतील नेव्ही नगर परिसरात या संस्थेचे स्थलांतर करण्यात आले. देशातील आजपर्यंतचे अनेक नामवंत शास्त्रज्ञ याच संस्थेतून घडलेले आहेत. आज संस्थेच्या तीन मुख्य विद्याशाखेतून ४०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ संस्थात्मक संशोधन आणि मार्गदर्शन करतात. या तीन शाखांमध्ये विश्वकिरण-आवकाशातून येणारे अतिशय भेदक किरण, उच्चउर्जा भौतिकी व गणिती यांचा समावेश होतो. मुंबईची देवनार येथील होमी भाभा सेंटर फॉर सायन्स ॲंड एज्युकेशन, पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स, बेंगलूरची इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरॉटिकल सायन्सेस आणि नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस या संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्याच कार्याचा भाग आहेत. या संस्थेचे ग्रंथालय भारतातील सर्वांत मोठे ग्रंथालय असल्याचे सांगितले जाते.

संस्थेची उद्दिष्टे[संपादन]

पदार्थविज्ञानामधील नवनवीन शाखांमध्ये संशोधन करणे. मानवी ज्ञानाच्या विस्तारलेल्या कक्षात संशोधन करून वैज्ञानिक प्रगती साध्य करण्यासाठी हुशार भारतीय तरुणांना त्यादृष्टीने प्रशिक्षण देणे

बाह्य दुवे[संपादन]